Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET पेपरफुटी प्रकरणावरुन मावळ काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि.२२) मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 23, 2026 | 11:31 AM
NEET पेपरफुटी प्रकरणावरुन मावळ काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

NEET पेपरफुटी प्रकरणावरुन मावळ काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि.२२) मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मावळ तालुका काँग्रेस अध्यक्ष यशवंत मोहोळ, माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, तळेगाव शहराध्यक्ष विशाल वाळुंज, तालुका संपर्क प्रमुख राजू शिंदे, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. खंडूजी तिकोणे, राजीव फलके, किरण मोकाशी, नितीन माने, सुधीर गायकवाड, युवक अध्यक्ष संदीप सातकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

निवेदनात म्हटले आहे की, देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असलेल्या NEET परीक्षेमध्ये झालेल्या कथित पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष, मानसिक ताण आणि अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम घेऊन या परीक्षेची तयारी करत असतात. अशा महत्त्वाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार घडल्याने विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असून, शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, या प्रकरणामुळे मानसिक तणावाखाली येऊन चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले असून, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य या प्रकरणामुळे धोक्यात आल्याची चिंता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा : कराड अर्बन बँकेला राज्यभर विस्ताराचा हिरवा कंदील; रिझर्व्ह बँक व सहकार विभागाची मान्यता

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या काय?

  • NEET पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी.
  • संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
  • भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत कडक सुधारणा करण्यात याव्यात.
  • प्रभावित विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा.
  • विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण लक्षात घेऊन समुपदेशन व मदत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
  • नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. तसेच या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित प्रकरणात त्वरीत कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

Web Title: Congress workers in maval taluka have become aggressive over the neet paper leak issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • Congress
  • maval news
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
1

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
2

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

खचू नका,सुनील शेळके तुमच्या पाठीशी! आंध्रा धरणाच्या प्रश्नावर शेळकेंचा भावनिक संवाद
3

खचू नका,सुनील शेळके तुमच्या पाठीशी! आंध्रा धरणाच्या प्रश्नावर शेळकेंचा भावनिक संवाद

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
4

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.