Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी?” ‘या’ पालखी मार्गावर वृक्षलागवड नाहीच? ठेकेदाराचे पर्यावरणाकडे दुर्लक्ष

पालखी मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, वारकरी आणि स्थानिक नागरिक झाडांच्या अनुपस्थितीमुळे हळहळ व्यक्त करत आहेत. या महामार्गाच्या कामांमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना नियमानुसार मोठा मोबदला शासनाने दिला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 21, 2026 | 02:35 AM
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी?” 'या' पालखी मार्गावर वृक्षलागवड नाहीच? ठेकेदाराचे पर्यावरणाकडे दुर्लक्ष

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी?” 'या' पालखी मार्गावर वृक्षलागवड नाहीच? ठेकेदाराचे पर्यावरणाकडे दुर्लक्ष

Follow Us
Close
Follow Us:
पालखी महामार्गावर वृक्षलागवडीकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष
रस्त्याच्या दुतर्फा असलेली शेकडो झाडे तोंडली गेली 
पर्यावरणपूरक विकासाचे मोठे दावे ठरले फोल

अमोल तोरणे/बारामती: संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू होत असताना पर्यावरणपूरक विकासाचे मोठे दावे करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा असलेली वड, पिंपळ, लिंब, चिंच, आंबा , नारळ यांसह अनेक महाकाय आणि शेकडो वर्षे जुनी झाडे तोडण्यात आली असून, त्याऐवजी नव्याने वृक्षलागवड करण्याबाबत ठेकेदार कंपनी अनुत्सुक असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.नियमानुसार रस्ते विकासासाठी झाडतोड झाल्यास त्या बदल्यात किमान तितकीच किंवा अधिक वृक्षलागवड करणे बंधनकारक आहे. मात्र बारामती ते इंदापूर दरम्यान सुरू असलेल्या पालखी महामार्गाच्या कामात हा नियम धाब्यावर बसवला गेला आहे काय, असा संतप्त प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.महामार्गाचे काम आधीच संथ गतीने सुरू असून, ज्या ठिकाणी रस्ता पूर्ण झाला आहे त्या भागातही एकही झाड लावण्यात आलेले नाही.काही ठराविक ठिकाणी केवळ दिखाव्यासाठी वृक्षलागवड केल्याचे चित्र दिसते, तर उर्वरित भागात संपूर्ण रस्ता ओसाड व रखरखीत अवस्थेत आहे.नवीन महामार्गासाठी गावोगावी उभारलेले उंच ब्रिज, सेवा रस्त्यांचा अभाव आणि शेतजमिनींचे तुकडे झाल्याने अनेक गावांचे सामाजिक व भौगोलिक विभाजन झाले आहे. त्यातच झाडे तोडल्यामुळे उन्हाळ्यात प्रचंड उष्णता, धुळीचे लोट आणि पर्यावरणीय असमतोल निर्माण होत आहे. पालखी मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, वारकरी आणि स्थानिक नागरिक झाडांच्या अनुपस्थितीमुळे हळहळ व्यक्त करत आहेत. या महामार्गाच्या कामांमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना नियमानुसार मोठा मोबदला शासनाने दिला.मात्र हा मोबदला घेऊन संबंधित लाभार्थी शेतकरी झाडांच्या लागवडीबाबत आवाज उठवत नसल्याचे चित्र आहे.

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी” असा संदेश देणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावरच आज “वृक्षवल्ली आम्हा ना सोयरी” अशी भूमिका ठेकेदार कंपनीची असल्याची टीका होत आहे. पर्यावरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासन याकडे डोळेझाक करत आहेत काय, असा सवाल उपस्थित होत आहे. वेळेत व्यापक वृक्षलागवड, देखभाल आणि जबाबदारी निश्चित न झाल्यास हा महामार्ग विकासाचा नव्हे तर पर्यावरणीय ऱ्हासाचा प्रतीक ठरेल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

महामार्गाचे काम धिम्या गतीने
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम लिमटेक पर्यंत पूर्ण झाले आहे, मात्र लिपस्टिक पासून पुढे ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. संबंधित ठेकेदार कंपनी अत्यंत धीम्या पद्धतीने, या महामार्गाचे काम करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. लिमटेक उड्डाणपूल, भवानीनगर येथील, तसेच सणसर या ठिकाणचे उड्डाणपूल अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा या ठिकाणी होत आहे

Web Title: Contractor neglects tree plantation along sant tukaram maharaj palkhi highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • baramati news
  • environment
  • highway news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.