• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Preparations Are Underway To Welcome Members To Pune Zilla Parishad

Pune ZP News : सदस्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; पुणे जिल्हा परिषदेत रंगरंगोटीला सुरुवात

नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालानंतर नव्याने निवडून आलेल्या सदस्यांच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा परिषद इमारतीत स्वच्छता, दुरुस्ती आणि रंगरंगोटीच्या कामांना सुरुवात केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 24, 2026 | 12:42 PM
सदस्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; पुणे जिल्हा परिषदेत रंगरंगोटीला सुरुवात

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पुणे जिल्हा परिषदेत रंगरंगोटीला सुरुवात
  • सदस्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी
  • पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग
पुणे : नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालानंतर नव्याने निवडून आलेल्या सदस्यांच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा परिषद इमारतीत स्वच्छता, दुरुस्ती आणि रंगरंगोटीच्या कामांना सुरुवात केली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध विषय समित्यांच्या निवडीपूर्वीच प्रशासनाने कार्यालयीन परिसर सुशोभित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्य इमारतीसह सभागृह, अध्यक्ष कक्ष, उपाध्यक्ष कक्ष, समिती कक्ष आणि सदस्यांसाठी राखीव कार्यालयांची साफसफाई करण्यात येत आहे. भिंतींना नवीन रंग देणे, विद्युत दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची दुरुस्ती तसेच फर्निचरची निगा राखण्याची कामे वेगाने सुरू आहेत. जुन्या फाइल्स आणि अनावश्यक साहित्याची छाननी करून कार्यालय अधिक नीटनेटके करण्यावर भर दिला जात आहे.

प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या सदस्यांचा पहिला अधिकृत प्रवेश आणि शपथविधी सोहळा लक्षात घेऊन ही तयारी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात ध्वनीप्रणाली व आसनव्यवस्थेचीही तपासणी करण्यात येत असून, आवश्यक त्या ठिकाणी किरकोळ दुरुस्त्या करण्यात येत आहेत.

हे सुद्धा वाचा : स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमालेंची बिनवरोध निवड; राष्ट्रवादीचा अर्ज बाद

पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग

नव्या लोकप्रतिनिधींना कार्यभार स्वीकारताना सुसज्ज आणि स्वच्छ वातावरण मिळावे, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कारभारात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसोबतच कार्यालयीन परिसराचे देखणेपणही महत्त्वाचे असल्याची भावना प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्याआधीच सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नव्या सदस्यांच्या आगमनामुळे जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यपक्षपदासाठी हालचाली सुरु

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेला ३८ या बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादीला यावेळी कोणत्याही राजकीय कसरतीची गरज भासणार नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तब्बल ५१ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत संपादन केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुतीतील अन्य कोणत्याही पक्षाशी युती करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती पक्षाच्या अंतर्गत सूत्रांकडून समोर येत आहे. पुणे जिल्हा परिषदेतील एकूण जागांपैकी अध्यक्षपद मिळवण्यासाठी किमान ३८ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. राष्ट्रवादीकडे स्वतःच्या बळावरच ५१ सदस्यांचे भक्कम संख्याबळ असल्याने अध्यक्षपदासह स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांवरील नियंत्रणही पक्षाकडेच राहणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या निकालामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे एकतर्फी झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Preparations are underway to welcome members to pune zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी
1

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी

येरवड्यात मोकळ्या जागी असलेल्या वाहनांना भीषण आग; 50 गाड्या जळून खाक
2

येरवड्यात मोकळ्या जागी असलेल्या वाहनांना भीषण आग; 50 गाड्या जळून खाक

अजितदादांचा अपघात नसून घातपातच; आरोपांचा भडीमार सुरुच, आता…
3

अजितदादांचा अपघात नसून घातपातच; आरोपांचा भडीमार सुरुच, आता…

विविध समिती अध्यक्षपदांच्या निवडी बिनविराेधच; ‘या’ तारखेला नावे जाहीर करण्याची औपचारीकता
4

विविध समिती अध्यक्षपदांच्या निवडी बिनविराेधच; ‘या’ तारखेला नावे जाहीर करण्याची औपचारीकता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nalasopara Crime: नालासोपाऱ्यात पहाटेचा थरार! मनोरुग्ण भावाकडून बहिणीची कोयत्याने हत्या, आईलाही…

Nalasopara Crime: नालासोपाऱ्यात पहाटेचा थरार! मनोरुग्ण भावाकडून बहिणीची कोयत्याने हत्या, आईलाही…

Feb 24, 2026 | 02:02 PM
Mira Bhayander : मालमत्ता कर वाढीवरून शिवसेना आक्रमक; मनपा कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन

Mira Bhayander : मालमत्ता कर वाढीवरून शिवसेना आक्रमक; मनपा कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन

Feb 24, 2026 | 02:01 PM
धक्कादायक ! ओयो हॉटेल्स ठरताहेत देहव्यापाराचे अड्डे; सर्रासपणे तरुण-तरुणी येतात अन्…

धक्कादायक ! ओयो हॉटेल्स ठरताहेत देहव्यापाराचे अड्डे; सर्रासपणे तरुण-तरुणी येतात अन्…

Feb 24, 2026 | 01:59 PM
Thar EV ला तगडी फाईट! भारतात नवीन इलेक्ट्रिक SUV ची एन्ट्री; काय आहेत फीचर्स?

Thar EV ला तगडी फाईट! भारतात नवीन इलेक्ट्रिक SUV ची एन्ट्री; काय आहेत फीचर्स?

Feb 24, 2026 | 01:51 PM
Narendra Modi Israel Visit: इस्रायलच्या संसदेत मोदींचे भाषण धोक्यात? मुख्य न्यायाधीशांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक

Narendra Modi Israel Visit: इस्रायलच्या संसदेत मोदींचे भाषण धोक्यात? मुख्य न्यायाधीशांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक

Feb 24, 2026 | 01:44 PM
Subedaar Trailer: ‘सूबेदार’चा दमदार ट्रेलर रिलीज; ६९ व्या वर्षी ॲक्शन अंदाजात दिसले अनिल कपूर

Subedaar Trailer: ‘सूबेदार’चा दमदार ट्रेलर रिलीज; ६९ व्या वर्षी ॲक्शन अंदाजात दिसले अनिल कपूर

Feb 24, 2026 | 01:43 PM
WhatsApp New Rule: भारत सरकारने घेतला मोठा निर्णय! आता सिमशिवाय नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅप, काय आहे नवा नियम? जाणून घ्या

WhatsApp New Rule: भारत सरकारने घेतला मोठा निर्णय! आता सिमशिवाय नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅप, काय आहे नवा नियम? जाणून घ्या

Feb 24, 2026 | 01:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.