Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रभाग 25 मधील स्वच्छता अन् सफाईची कामे तातडीने पूर्ण करा; राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या प्रशासनाला सूचना

प्रभाग २५ मध्ये अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत असल्याने, तातडीने स्वच्छता व सफाईची कामे पूर्ण करण्याच्या सूचना विश्रामबाग वाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 30, 2026 | 07:20 PM
प्रभाग 25 मधील स्वच्छता अन् सफाईची कामे तातडीने पूर्ण करा; राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या प्रशासनाला सूचना

प्रभाग 25 मधील स्वच्छता अन् सफाईची कामे तातडीने पूर्ण करा; राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या प्रशासनाला सूचना

Follow Us
Follow Us:

पुणे : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रभाग २५ मधील विविध भागांत पावसाळी जलवाहिन्यांच्या स्वच्छतेचा प्रत्यक्ष आढावा दौरा आयोजित करण्यात आला होता. मुसळधार पावसात या प्रभागातील अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत असल्याने, तातडीने स्वच्छता व सफाईची कामे पूर्ण करण्याच्या सूचना विश्रामबाग वाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

 

या प्रभागातील विविध समस्यांच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांच्यासह विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या पाहणी दौऱ्यादरम्यान कचऱ्याचे क्रोनिक स्पॉट पूर्णपणे बंद करणे, ड्रेनेज सुधारणा, अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणे, नदीपात्र सीमाभिंत बांधणे, रस्त्यांचे समपातळीकरण करणे, बंद पथदिवे दुरुस्त करणे आणि ठिकठिकाणी साचलेला राडारोडा तातडीने उचलणे, याबाबत प्रशासनाला सद्यस्थितीची माहिती प्रभागातील लोकप्रतिनिधींनी दिली.

यावेळी नगरसेविका स्वरदा बापट, नगरसेवक कुणाल टिळक आणि नगरसेविका स्वप्नाली पंडित या देखील उपस्थित होत्या. ‘कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्या सूचनेनुसार सर्व नगरसेवकांनी नागरिकांच्या दारी जात समस्या जाणून घेतल्या. पावसाळा तोंडावर असल्याने या सर्व समस्यांवर ‘टीम वर्क’ म्हणून काम करून सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी ‘कालबद्ध’ पद्धतीने तातडीने कार्यवाही करावी’, अशा स्पष्ट सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्याचे राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : आता नुसता धो धो पाऊस बरसणार! राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसादरम्यान या भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नारायण पेठ आणि शुक्रवार पेठ येथील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला होता. तसेच दोन दिवस या भागातील विद्युत पुरवठा देखील खंडित राहिला होता. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने व्हाव्यात, या उद्देशाने या विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या महत्त्वाच्या सूचना आणि मागण्याही अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या.

Web Title: Corporator raghavendra bappu mankar has given important instructions to the administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Pune mahapalika
  • pune news
  • Raghavendra Bappu Mankar

संबंधित बातम्या

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
1

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव
2

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल
3

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
4

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.