Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंहगड एक्सप्रेससह अनेक लोकल रद्द, काही गाड्या उशिराने धावणार; रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम

तांत्रिक कामांमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्याचे मार्ग बदलून त्या इतर पर्यायी स्थानकांवरून चालवल्या जाणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 28, 2026 | 04:38 PM
भारतीय रेल्वे: १० सप्टेंबरपासून ३६ दिवसांचा ब्लॉक

भारतीय रेल्वे: १० सप्टेंबरपासून ३६ दिवसांचा ब्लॉक

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील यार्डात ‘डबल डायमंड स्विच’ (डीडीएस) पॉइंट्सच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पायाभूत सुविधा आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवार (दि. ५) रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ९ तास हा ब्लॉक राहणार आहे. या तांत्रिक कामांमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्याचे मार्ग बदलून त्या इतर पर्यायी स्थानकांवरून चालवल्या जाणार आहेत.

 

पुणे- लोणावळा विभागातील पुणे यार्डमध्ये असलेले डीडीएस पॉइंट क्रमांक २०७ आणि २०८ बदलून त्या जागी नवीन आधुनिक पॉइंट बसवण्याचे काम केले जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ५२ किलो क्षमतेच्या लेआउटचे ६० किलो क्षमतेच्या अत्याधुनिक डीडीएस लेआउटमध्ये अपग्रेडेशन केले जाईल. यासाठी रेल्वेचे अभियांत्रिकी, सिग्नल आणि दूरसंचार तसेच ओव्हरहेड इक्विपमेंट विभागांचे कर्मचारी आणि अभियंते संयुक्तपणे काम करणार आहेत. भविष्यातील रेल्वे प्रवासाची सुरक्षा, वेग आणि एकूण कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे काम अत्यंत गरजेचे असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या ब्लॉकच्या कालावधीत रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १ (अप आणि डाउन मेन लाईन) वरून कोणतीही रेल्वे धावणार नाही. तसेच मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून येणाऱ्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक २ उपलब्ध नसेल. याव्यतिरिक्त, प्लॅटफॉर्म क्रमांक २, ३ आणि ४ वरून मुंबई सीएसएमटीच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद राहील. प्रवाशांना आग्रहाने सूचित करण्यात येते की, त्यांनी आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी,गाड्यांची अचूक सद्य:स्थिती आणि अद्ययावत वेळापत्रक जाणून घेण्यासाठी इंडियन रेल्वेच्या अधिकृत चौकशी पोर्टलला भेट द्यावी.

रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या

गाडी क्र. ९९९०२ पुणे – तळेगाव लोकल, गाडी क्र. ९९९०३ तळेगाव – पुणे लोकल, गाडी क्र. ७१४०७ पुणे – दौंड डेमू, गाडी क्र. ७१४२० सातारा – पुणे डेमू, गाडी क्र. ११००७ मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस, गाडी क्र. ११००८ पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस.

शार्ट टर्मिनेट गाड्या

खडकी स्थानकात थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्या गाडी क्र. १२९४० जयपूर – पुणे एक्सप्रेस पुणे ऐवजी खडकी स्थानकावर थांबेल. गाडी क्र. १२१२७ मुंबई सीएसएमटी – पुणे एक्सप्रेसचा प्रवास खडकी स्थानकावर समाप्त होईल. हडपसर स्थानकात थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्या गाडी क्र. ११०७८ जम्मू तवी-पुणे एक्सप्रेस पुणेऐवजी हडपसर स्थानकावर थांबेल. गाडी क्र. ११४०६ अमरावती – पुणे एक्सप्रेस हडपसर स्थानकावर थांबेल. गाडी क्र. १२१३६ नागपूर – पुणे एक्सप्रेस हडपसर स्थानकावर थांबेल. दौंड स्थानकात थांबणारी गाडी.. गाडी क्र. ७१४०६ बारामती – पुणे डेमू केवळ दौंड स्थानकापर्यंतच धावेल.

हे सुद्धा वाचा : ‘म्हाडा’ उभारणार 10 हजार घरे, पुणे मंडळाची मोठी घोषणा; ‘या’ वर्षीपर्यंत मिळणार घरांचा प्रत्यक्ष ताबा

उशिराने धावणाऱ्या गाड्या

खालील गाड्यांना प्रवासादरम्यान विशिष्ट वेळेसाठी मार्गस्थ थांबवून ठेवले जाईल. त्या लोणावळा – पुणे विभागात सुमारे अर्धा तास उशिराने धावतील. गाडी क्र. ०१०१३ एलटीटी मुंबई – एसएमव्हीटी बंगळूरू स्पेशल, गाडी क्र. २२१९४ ग्वाल्हेर-दौंड एक्सप्रेस, गाडी क्र. २२१५९ मुंबई सीएसएमटी-एमजीआर चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस, गाडी क्र. १७२२२ एलटीटी मुंबई – काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस.

Web Title: Railway traffic will be significantly affected on sunday due to technical work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Local Trains
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी
1

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती
2

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
3

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह
4

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.