Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाषाण–बाणेर लिंक रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करा; नगरसेवक सनी निम्हण यांची मागणी

पाषाण–बाणेर लिंक रोड येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या पासपोर्ट सेवा केंद्राच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतूक व सार्वजनिक व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 29, 2026 | 05:08 PM
पाषाण–बाणेर लिंक रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करा; नगरसेवक सनी निम्हण यांची मागणी

पाषाण–बाणेर लिंक रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करा; नगरसेवक सनी निम्हण यांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • पाषाण–बाणेर लिंक रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करा
  • नगरसेवक सनी निम्हण यांची मागणी
  • पुणे महानगरपालिका आणि वाहतूक विभागाकडे सादर केले निवेदन
पुणे : पाषाण–बाणेर लिंक रोड येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या पासपोर्ट सेवा केंद्राच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतूक व सार्वजनिक व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या गर्दीमुळे संभाव्य वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केली आहे.

 

निम्हण यांनी पुणे महानगरपालिका आणि वाहतूक विभागाकडे सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यानंतर दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा होणार आहे. त्यामुळे रिक्षा, कॅब आणि खाजगी वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेता या मार्गावर सतत ट्रॅफिक जॅम होण्याची शक्यता आहे. तसेच, परिसरात अनधिकृत फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते आणि झेरॉक्स दुकाने उभारली गेल्यास अतिक्रमण वाढून रस्ते अरुंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यास नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी राहून वाहतुकीचा वेग मंदावू शकतो, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती लक्षात घेता सुरक्षा आणि शिस्त राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्वनियोजन करून वाहतूक नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, नो-पार्किंग झोन आणि ड्रॉप-ऑफ पॉईंट निश्चित करावेत, स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था उभारावी, तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक पोलीस आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, अशीही सूचना करण्यात आली आहे.

महापालिका, वाहतूक पोलीस आणि संबंधित विभागांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करून समन्वयाने नियोजन केल्यास नागरिकांना सुलभ सेवा मिळेल आणि परिसरात शिस्त राखता येईल, असा विश्वास निम्हण यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : मनीषाला नऱ्हेत भेटायला बोलावले, गोड बोलून दाट झाडीत नेले अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

Web Title: Corporator sunny nimhan has demanded that measures be implemented to prevent traffic congestion on the pashanbaner link road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Police
  • Pune Traffic Issue

संबंधित बातम्या

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
1

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
2

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’
3

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार
4

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.