Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल

Daund News : दौंड तालुक्यात पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात एकाच दिवशी दोन ठिकाणी कारवाई केली. मसनेरवाडी येथे अवैध दारू विक्रीप्रकरणी एका व्यक्तीवर, तर शालिमार चौकात जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 02, 2026 | 08:21 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • किराणा दुकानाच्या आडोशाला अवैध दारू विक्री
  • शालिमार चौकात जुगार अड्ड्यावर छापा
  • सात जणांवर गुन्हे दाखल
Daund News :दौंड तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. मसनेरवाडी परिसरात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली, तर दौंड शहरातील शालिमार चौक परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही कारवायांमध्ये सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

किराणा दुकानाच्या आडोशाला अवैध दारू विक्री

दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसनेरवाडी, येडे वस्ती, लिंगाळी येथे दौंड शुगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका किराणा दुकानाच्या आडोशाला अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी भगवान महादेव येडे (वय ५०) हा देशी व विदेशी दारूची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून १,७४० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली.

Graduate Election : मुख्यमंत्री फडणवीस-शरद लाड भेटीने पुणे पदवीधरची चर्चा तापली!

शालिमार चौकात जुगार अड्ड्यावर छापा

दौंड शहरातील म्हसोबा चाळ, शालिमार चौक परिसरात बंद घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५२ पत्त्यांचा कॅट, जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ४,५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधितांकडून पैशांवर रमीचा जुगार खेळला जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.

Pune BJP : भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत ‘युवा निर्धार मेळावा’

सात जणांवर गुन्हे दाखल

या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस शिपाई पवन शंकर माने आणि गोरख बाबासाहेब हजारे यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध दारू विक्रीप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई), तर जुगारप्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Daund news police launch a major crackdown in a single day raids conducted on illegal liquor sales and gambling dens cases registered against 7 individualscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • Marathi News
  • pune news
  • Pune Police News

संबंधित बातम्या

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता
1

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता

Breaking News :अमेरिकेच्या रोजगार बाजाराला धक्का; नव्या नोकऱ्यांची भर केवळ २९ हजार, बेरोजगारी ४.२%
2

Breaking News :अमेरिकेच्या रोजगार बाजाराला धक्का; नव्या नोकऱ्यांची भर केवळ २९ हजार, बेरोजगारी ४.२%

Nagpur Sport :व्हीएचएला पुन्हा धक्का; हॉकी मैदानाचा भाडेपट्टा रद्द
3

Nagpur Sport :व्हीएचएला पुन्हा धक्का; हॉकी मैदानाचा भाडेपट्टा रद्द

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा
4

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.