
DCM eknath shinde katraj sabha for PMC elections 2026 political news
कात्रजच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पुणे महानगरपालिका अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्यामुळे पुणे शहराला विकासाचा अमृत द्यायचं आहे . गावी जात असताना चांदणी चौकत आल्यावर नागरिकांनी वाहतुकीच्या समस्या मांडल्या, तो प्रश्न मी कायमस्वरूपी सोडवला आहे, आमचा अजेंडा सर्वसामान्यांचा विकास आहे. शहरातील वाहतूक, पाणीपुरवठा, एस आर ए, कचरा या सर्व समस्या सोडवण्यासाठी पन्नास वर्षाच्या दूरदृष्टीकोनातून कात्रज विकास आराखडा तयार केला आहे. 500 फुटापेक्षा कमी असणाऱ्या घरांचे टॅक्स माफ करणार असा कोणीतरी संकल्प केला आहे, मी संकल्प नाही आपण ती करून टाकू, तीन पट टॅक्स, गुंठेवारी टॅक्स, शास्ती कर हे रद्द केले जातील, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : ‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल
सत्तेत आल्यावर किती पैसे मिळतील…
पुणे शहर ट्राफिक मुक्त करण्याचे, त्याचबरोबर कात्रज येथील कामातील प्रशासकीय त्रुटी दूर करून या कामामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करून कायमस्वरूपी यावर तोडगा काढू .जे जे नगर विकास खात्याच्या , गृहनिर्माण खात्याच्या अखत्यारीत येतील अशा सर्व गोष्टी तातडीने मार्गी लावू, असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले. आचारसंहिता जाहीर होण्याआधी प्रभाग 38 साठी दहा कोटी रुपये, जांभुळवाडी तलाव सुशोभीकरणासाठी 58 कोटी रुपये तसेच त्या भागातील गावांसाठी 159 कोटी रुपयांची ड्रेनेज लाईन मंजूर केली आहे, सत्तेत येण्याआधीच 252 कोटी रुपये निधी जर आपल्याला मिळत असेल तर सत्तेत आल्यावर किती पैसे मिळतील, असे शिंदे म्हणाले.
पुणे तिथे काय उणे, पण शहरातील विकासाच्या उणिवा शिवसेनाच भरून काढेल
लाडक्या बहिणींची संख्या विधानसभेपासून वाढतच चालली आहे, ज्यांच्या पाठीशी महिला त्यांचा नंबर मतपेटीत पहिला असे शिंदे म्हणाले आहेत. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली, मी गरीब घरातून आलो आहे मला सगळ्यांच्या समस्या समजतात म्हणून मी ही योजना आणली, अनेकांनी याला विरोध केला , परंतु कोणता माईका लाल जरी आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ‘एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मे खुद की भीं नही सुनता’ असा इशारा त्यांनी दिला.
हे देखील वाचा : कोण आहेत IPAC प्रमुख प्रतीक जैन? ज्याच्या घरी ED ची धाड पडताच ममता बॅनर्जींचा चढला पारा
शिवसेनेचे वाघ घाबरत नाहीत
नाना भानगिरे आणि सारिका पवार यांच्यावर प्रचारादरम्यान झालेल्या हल्ल्याविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले डरपोक राजकारण करू नका. हे बाळासाहेबांचे वाघ आहेत घाबरणार नाहीत. कार्यकर्त्यांचा मान सन्मान करा, ज्या पद्धतीने महिला लाडकी बहीण योजनेमुळे आत्मनिर्भर झाल्या त्यांना मानसन्मान मिळाला. असाच मानसन्मान कार्यकर्त्याला देखील मिळाला पाहिजे. कुणी आमदार, नगरसेवक झाले म्हणून हवेत जाऊ नका कार्यकर्ता म्हणूनच काम करा.
कात्रज उड्डाणपणामुळे होणाऱ्या ट्रॅफिक संदर्भात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले एवढ्या वर्षे सत्तेत होते त्यांनी समस्यांकडे का पाहिलं नाही. मी तुम्हाला ट्राफिक मुक्त पुणे , ट्राफिक मुक्त कात्रज करून दाखवेल. आपल्या नावाच्या पुढे आईचं नाव तसेच ज्येष्ठांसाठी युवकांसाठी वेगवेगळे निर्णय मी घेतलेले आहेत.