Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एफआरपीची चुकीची आकडेवारी देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा; साखर आयुक्तांकडे मागणी

मराठवाड्यातील काही साखर कारखान्यांमध्ये रिकव्हरी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा आरोपही करण्यात आला. हा प्रकार रोखण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने मराठवाड्यात स्वतंत्र तपासणी यंत्रणा उभारावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 08, 2026 | 11:31 AM
थकीत ऊसबिल, रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक

थकीत ऊसबिल, रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्य सरकारच्या दोन किंवा तीन टप्प्यांत एफआरपी देण्याच्या धोरणामुळे गेल्या तीन वर्षांत ज्या कारखान्यांनी एफआरपी दोन-तीन टप्प्यांत अदा केली, त्यांनी विलंबाच्या कालावधीचे व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी केली. थकीत ऊसबिलासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन चर्चा केली. 

साखर कारखान्यांकडून थकीत एफआरपीची चुकीची आकडेवारी साखर आयुक्त कार्यालयाला सादर केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. अशा कारखान्यांची प्रत्यक्ष थकबाकी तपासून संबंधितांवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी अॅड. योगेश पांडे, प्रभाकर बांगर उपस्थित होते.

कारखान्यांनी सादर केलेली थकीत एफआरपीची आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती यात मोठी तफावत असल्याचा दावा शेट्टी यांनी केला. कारखानदारांकडून प्रशासनाची दिशाभूल होत असल्याने संबंधित कारखान्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

Pune: MH-12 ची मालिका संपली ! पुण्यात आता वाहनांवर MH-12 1A सिरीज! गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात नवीन नंबर सिरीज

राज्य सरकारच्या दोन किंवा तीन टप्प्यांत एफआरपी देण्याच्या धोरणामुळे गेल्या तीन वर्षांत ज्या कारखान्यांनी एफआरपी दोन-तीन टप्प्यांत अदा केली, त्यांनी विलंबाच्या कालावधीचे व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली. तसेच उसाच्या वजनात होणारे गैरप्रकार आणि बनावट नोंदी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

प्रतिटन 300 रुपयांचा दुसरा हप्ता द्या

चालू गळीत हंगामात देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर आणि उपपदार्थांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे कारखान्यांचा नफा वाढला असून, शेतकऱ्यांना प्रतिटन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली. राज्याच्या सहकारमंत्र्यांच्या साखर कारखान्यानेच शेतकऱ्यांची एफआरपी थकवल्याचा आरोप करत, “सहकारमंत्रीच नियम पाळत नसतील, तर प्रशासन कायदेशीर कारवाई कोणावर करणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

वजन, रिकव्हरीतील गैरप्रकार रोखण्याची मागणी

ऊसाचे वजन आणि साखर उतारा अर्थात रिकव्हरीमध्ये होणारे गैरप्रकार हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. उसाच्या वजनातील काटामारीला आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व वजनकाटे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून ऑनलाइन जोडावेत, अशी मागणी करण्यात आली. मराठवाड्यातील काही साखर कारखान्यांमध्ये रिकव्हरी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा आरोपही करण्यात आला. हा प्रकार रोखण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने मराठवाड्यात स्वतंत्र तपासणी यंत्रणा उभारावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

Web Title: Demand for action against sugar mills providing incorrect frp figures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • Farmers Issue
  • pune news

संबंधित बातम्या

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!
1

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
2

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली
3

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी
4

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.