Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

पुण्यातील श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टने यंदाच्या गणेशोत्सवात चिमुकल्यांच्या याच आनंदाला मूर्त रूप देत ‘चॉकलेटचा बंगला’ हा अनोखा देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 22, 2026 | 03:31 PM
चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

Follow Us
Follow Us:
  • चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’!
  • श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
  •  चिमुकल्यांचा आनंद गगनात
पुणे : चॉकलेट म्हटले की चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटते. पण चॉकलेटपासून साकारलेला चक्क बंगला पाहायला मिळाला तर? पुण्यातील श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टने यंदाच्या गणेशोत्सवात चिमुकल्यांच्या याच आनंदाला मूर्त रूप देत ‘चॉकलेटचा बंगला’ हा अनोखा देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी होत असून, विशेषतः लहान मुलांच्या उत्साहाने परिसर अक्षरशः फुलून गेला आहे.

 

१९३९ मध्ये स्थापना झालेल्या श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टचे यंदा ८८ वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष धनंजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली यंदा हा आगळावेगळा देखावा साकारण्यात आला आहे. मागील वर्षी मंडळाने ‘अंदरबन अभयारण्य’ हा देखावा सादर केला होता. त्या देखाव्याला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुलांना निसर्ग आणि जंगलाची सफर घडवून आणणारी ही संकल्पना लक्षात घेऊन यंदा त्यांच्या आवडीच्या चॉकलेटभोवती देखावा उभारण्याची कल्पना पुढे आली.

विशेष म्हणजे, ‘चॉकलेटचा बंगला’ ही संकल्पना मंडळाच्या एका व्यक्तीची नसून सर्व कार्यकर्त्यांच्या सामूहिक विचारातून साकारली आहे. हा देखावा प्रत्यक्षात आणण्यासाठी तब्बल दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागला. बारकावे, सजावट आणि चिमुकल्यांना आकर्षित करणारी रचना यामुळे हा बंगला सध्या गणेशोत्सवातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. देखावा पाहण्यासाठी येणारी मुले चॉकलेटच्या बंगल्यात फेरफटका मारताना दिसत आहेत. चॉकलेटच्या दुनियेत प्रवेश केल्याचा अनुभव मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा आहे. पालकही मुलांचा हा आनंद आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. परंपरा आणि चिमुकल्यांचा आनंद यांचा सुंदर मेळ घालत श्रीकृष्ण मंडळाने साकारलेला ‘चॉकलेटचा बंगला’ पुणेकरांच्या भेटीला विशेष ठरत आहे. मंडळाचे अध्यक्ष धनंजय मोरे, उपाध्यक्ष अमर शर्मा , खजिनदार विराज चव्हाण, सेक्रेटरी अनिल रणधीर, उत्सवप्रमुख पवन दवे यांनी देखाव्याचे आयोजन केले होते.

हे सुद्धा वाचा : अपघातग्रस्तांच्या मदतीला पुणे महापालिका धावणार? नगरसेवक अमोल बालवडकरांचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

Web Title: Punes shrikrishna mandal trust has created a unique chocolate bungalow display for this years ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • ganesh utsav
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!
1

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!

श्रीगणेशाच्या कृपेसाठी गणेशयाग का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि विधी
2

श्रीगणेशाच्या कृपेसाठी गणेशयाग का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि विधी

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना
3

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने
4

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.