Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी हेमा माडगे यांना संधी द्या; भिगवणकरांची आग्रही मागणी

इंदापूर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर आता सभापती आणि उपसभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 18, 2026 | 12:30 AM
इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी हेमा माडगे यांना संधी द्या; भिगवणकरांची आग्रही मागणी

इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी हेमा माडगे यांना संधी द्या; भिगवणकरांची आग्रही मागणी

Follow Us
Follow Us:
  • इंदापूर पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व
  • उपसभापतीपदी हेमा माडगे यांना संधी द्या
  • भिगवणकरांची आग्रही मागणी
भिगवण : इंदापूर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर आता सभापती आणि उपसभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने, उपसभापती पदावर भिगवण गणातील नवनिर्वाचित सदस्या हेमा माडगे यांची वर्णी लागावी, अशी जोरदार मागणी भिगवण परिसरातील ग्रामस्थांकडून केली आहे. आता या मागणीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील काय निर्णय घेतात. याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

हेमा माडगे यांनी इंदापूर तालुक्यातून दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी मताधिक्य मिळवून विजय संपादन केला आहे. निवडून येण्यापूर्वी त्यांनी भिगवण गावचे सरपंच पद भूषवले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे. त्यांना प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

राजकीय समीकरण

राजकीय समीकरणांमुळे भिगवण जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असतानाही, तालुक्यातील जातीय गणिते जुळवण्यासाठी ती जागा ओबीसी प्रवर्गासाठी सोडण्यात आली होती. जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असूनही पक्षाच्या आदेशाचा मान राखून हेमा माडगे यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली. त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यांच्या या त्यागाची आणि निष्ठेची दखल घेऊन त्यांना उपसभापती पदाची संधी मिळावी, असा सूर ग्रामस्थांमध्ये उमटत आहे.

राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र

भिगवण हे इंदापूर तालुक्याचे आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र मानले जाते. या भागातील लोकसंख्या आणि जातीय समीकरणे पाहता, सुरुवातीच्या काळात का होईना, पण हेमा माडगे यांना संधी मिळावी, अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे. “हेमा माडगे यांच्याकडे प्रशासकीय अनुभव आणि जनशक्ती दोन्ही आहे. भिगवणच्या विकासासाठी आणि तालुक्याच्या राजकारणातील समतोलासाठी त्यांना उपसभापती पद मिळणे आवश्यक आहे, असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा : शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

Web Title: Demand is being made to give hema madge an opportunity as the deputy chairperson of indapur panchayat samiti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Dattatray Bharne
  • Harshvardhan Patil
  • indapur news

संबंधित बातम्या

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश
1

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश

Indapur News: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; इंदापुरात काँग्रेस आक्रमक
2

Indapur News: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; इंदापुरात काँग्रेस आक्रमक

पिके करपली, शेतकरी संकटात; इंदापुर तालुक्यात कृषिमंत्री भरणेंनी घेतला नुकसानीचा आढावा
3

पिके करपली, शेतकरी संकटात; इंदापुर तालुक्यात कृषिमंत्री भरणेंनी घेतला नुकसानीचा आढावा

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
4

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.