Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान पुणेकर! डेंग्यू-चिकुनगुनियाचा नागरिकांना वेढा; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली, तब्बल १ हजार २६६…

Dengue: जानेवारी ते मे या पाच महिन्यांत डेंग्यूचे केवळ १७३ संशयित रुग्ण होते. मात्र, जूनपासून रुग्णसंख्येने वेग घेतला. जूनमध्ये १७५, जुलैमध्ये ३२३, तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक ४८४ संशयित रुग्णांची नोंद झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 07, 2026 | 09:31 PM
पुण्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला

पुण्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला

Follow Us
Follow Us:
  • पुणे शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला
  • डेंग्यूच्या संशयित रुग्णसंख्येने ओलांडला बाराशेचा टप्पा
  • ४७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट
पुणे/Dengue: पावसाळ्यामुळे शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यूच्या संशयित रुग्णसंख्येने बाराशेचा टप्पा ओलांडला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ७ सप्टेंबर २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात डेंग्यूचे १ हजार २६६ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. तर चिकुनगुनियाचे २१ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत.

जानेवारी ते मे या पाच महिन्यांत डेंग्यूचे केवळ १७३ संशयित रुग्ण होते. मात्र, जूनपासून रुग्णसंख्येने वेग घेतला. जूनमध्ये १७५, जुलैमध्ये ३२३, तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक ४८४ संशयित रुग्णांची नोंद झाली. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये संशयित रुग्णसंख्या जवळपास ५० टक्क्यांनी वाढली. सप्टेंबरच्या पहिल्या सात दिवसांतच आणखी १११ संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, वर्षभरातील एकूण संशयित रुग्णांपैकी तब्बल ८६ टक्के रुग्ण जून ते ७ सप्टेंबरदरम्यान आढळले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात साचणारे पाणी आणि वाढणारी डासोत्पत्ती डेंग्यूच्या प्रसाराला कारणीभूत ठरत असल्याचे आकडेवारीतून दिसते.

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

डेंग्यूच्या निश्चित रुग्णांमध्येही ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २१ रुग्णांची नोंद झाली. जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी १२, तर एप्रिलमध्ये दोन रुग्ण आढळले. जानेवारी ते मार्च तसेच मे महिन्यात एकही निश्चित रुग्ण नोंदविला गेला नव्हता. दिलासादायक बाब म्हणजे, डेंग्यूमुळे अद्याप एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. चिकुनगुनियाचे सर्वाधिक १४ रुग्ण ऑगस्टमध्ये आढळले. जूनमध्ये सहा आणि जुलैमध्ये एक रुग्ण नोंदविण्यात आला. सप्टेंबरमध्ये अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही.

डासोत्पत्तीप्रकरणी ४.०४ लाखांचा दंड

महापालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाने घरे, कार्यालये, महाविद्यालये आणि इतर आस्थापनांची पाहणी केली. त्यामध्ये २ हजार २३१ ठिकाणी डासांच्या अळ्या अथवा डासोत्पत्तीची ठिकाणे आढळली. संबंधितांना नोटिसा बजावून एकूण ४ लाख ४ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये सर्वाधिक ५२३ ठिकाणी डासोत्पत्ती आढळून १ लाख ३९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. जुलैमध्ये ५२४ ठिकाणी डासोत्पत्ती आढळली आणि १ लाख २२ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई झाली.

काळजी घ्या ! पुणे, पिंपरी-चिंचवडसह उपनगरांमध्ये स्वाईन फ्लू, डेंग्यूसह तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

आकडेवारी ७ सप्टेंबर २०२६ पर्यंतची महिनानिहाय डेंग्यूची स्थिती

महिना संशयित रुग्ण निश्चित रुग्ण
जानेवारी २५ ०
फेब्रुवारी २३ ०
मार्च २६ ०
एप्रिल ४१ २
मे ५८ ०
जून १७५ १२
जुलै ३२३ १२
ऑगस्ट ४८४ २१
सप्टेंबर* १११ ०
एकूण १,२६६ ४७

Web Title: Dengue and chikungunya increased significantly in pune city with 47 patients infected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • Dengue Virus
  • pune news

संबंधित बातम्या

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी
1

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण
2

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
3

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Table Tennis: राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा: मयुरेश सावंत अन् स्वरा करमरकर बनले ‘सुवर्ण’पदकाचे मानकरी!
4

Table Tennis: राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा: मयुरेश सावंत अन् स्वरा करमरकर बनले ‘सुवर्ण’पदकाचे मानकरी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.