
Pune Sports News
शिंदे हायस्कूल मैदानावर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एरॉन बिनूच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्टार्स क्रिकेट क्लबने युनायटेड क्रिकेट क्लबचा सात गडी राखून पराभव केला. एरॉन बिनूने पाच गडी बाद करत युनायटेडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्यानंतर विश्वजीत जगतापने नाबाद ५० धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला.
Cricket News: असिम मुजावरचा ‘पॉवर शो’! फॅन्टम क्रिकेट ॲकॅडमीने उंचावला मान्सून करंडक
आर्यन्स क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात आर्यन घोडकेने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर आर्यन्स संघाने २२ यार्ड्स संघावर आठ गडी राखून मात केली. आर्यन घोडकेने चार गडी बाद करत प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला लगाम घातला. त्यानंतर फलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत संघाला सहज विजय मिळवून दिला.ट्रिनिटी मैदानावर झालेल्या लढतीत आर्यन हिंगणेच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर पूना क्लबने ट्रिनिटी संघाचा ५७ धावांनी पराभव केला. आर्यन हिंगणेने तीन गडी बाद करत पूना क्लबच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह पूना क्लबने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
ताश्मी गोसावी मैदानावर झालेल्या सामन्यात अँबिशियस संघाने झोराष्ट्रीयन्स संघाचा तब्बल २६५ धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. अँबिशियसच्या विजयात गुंजन सावंतची शतकी खेळी निर्णायक ठरली. त्याने आक्रमक फलंदाजी करत १३१ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर अँबिशियसने प्रतिस्पर्ध्यासमोर मोठे आव्हान उभे केले आणि त्यानंतर गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला.
Cricket News: पुण्यात उद्यापासून क्रिकेटचा थरार; ‘या’ करंडकासाठी तब्बल 20 संघ भिडणार
असिम मुजावरचा ‘पॉवर शो’
Ans: गुंजन सावंतने अँबिशियस संघाकडून १३१ धावांची शानदार खेळी केली.
Ans: स्टार्स, अँबिशियस, आर्यन्स, पूना क्लब या संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.