Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Election 2026 : मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यावरुन वाद; पिंपरी चिंचवडमधील मतदार केंद्रावरील प्रकार

PCMC Elections 2026 : पहिल्या टप्प्यामध्ये मतदान करण्यासाठी पिंपरीमध्ये मतदारांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. 

  • By प्रीति माने
Updated On: Jan 15, 2026 | 12:24 PM
dispute over carrying mobile phones into polling stations Pimpri Chinchwad PCMC elections 2026

dispute over carrying mobile phones into polling stations Pimpri Chinchwad PCMC elections 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानामध्ये गोंधळ
  • मतदान केंद्रामध्ये फोन घेऊन जाण्यावरुन वाद
  • अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्याचा प्रकार
PCMC Election 2026 : पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. पुणे महापालिका (PMC Election 2026) आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडे (PCMC Election 2026) संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांची मोठी गर्दी झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मतदान करण्यासाठी पिंपरीमध्ये मतदारांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.

मतदान केंद्रामध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोबाईल घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल, पर्स, पिशवी असे सामान घेऊन जाण्यास मनाई आहे. यासाठी मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून मोबाईल घेऊन जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. मात्र याच कारणावरुन पिंपरी चिंचवडमधील काही मतदार केंद्राबाहेर वाद झाल्याचे देखील दिसून आले आहे.

हे देखील वाचा : लोकशाहीचा कणा कमकुवत; मतदानाच्या दिवशीच EVM बंद पडल्याने संशय

पिंपरी चिंचवडमधील काही भागांमध्ये मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी द्यावी असे काही जणांनी सांगितले. यासाठी त्यांची केंद्रावरील कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची देखील झाली. यामुळे अनेक केंद्राबाहेर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई असल्याचे देखील स्पष्टपणे सांगितले आहे.

हे देखील वाचा : नागपुरात राजकीय वातावरण तापलं! काँग्रेस उमेदवाराचं कार्यालय जाळलं, भाजपकडे संशयाची सुई

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मतदार मोठ्या उत्साहाने आले होते. मात्र काही मतदारांचा हिरमोड झाला. कारण काही मतदार केंद्रावर मशीन बंद पडल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. नेहरुनगर, चिंचवडगाव येथील मतदार केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला. तसेच प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

पुणे महापालिका निवडणुकीमध्ये देखील मशीन बंद पडल्याचा प्रकार

पिंपरी चिंचवडप्रमाणे पुण्यामध्ये देखील ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार घडला आहे. प्रभाग २६ अंतर्गत स्वारगेट पोलिस लाईन, सेंट हिल्डाज स्कूलमधील दोन मतदान केंद्रे, सावित्रीबाई फुले स्मारक, घोरपडे पेठ उद्यान वसंतदादा अभ्यासिका आणि महात्मा गांधी उर्दू शाळा या ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. सकाळच्या वेळेत मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार रांगेत उभे असताना यंत्रे अचानक ठप्प झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही मतदारांनी अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रतीक्षा केल्याचे सांगितले, तर काहींनी नाराजी व्यक्त करत मतदान केंद्र सोडल्याचीही चर्चा आहे.

Web Title: Dispute over carrying mobile phones into polling stations pimpri chinchwad pcmc elections 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • PCMC Election 2026
  • PMC Election 2026

संबंधित बातम्या

Maharashtra Election Commission:  शाईबाबतचा गोंधळ आणि निवडणूक आयोगाचा खुलासा; तीच शाई, जी लोकसभा…
1

Maharashtra Election Commission: शाईबाबतचा गोंधळ आणि निवडणूक आयोगाचा खुलासा; तीच शाई, जी लोकसभा…

KMC Elections 2026: एक स्टेटस पडलं महागात! प्रचाराची वेळ संपली तरी देखील सोशल मीडियावर प्रचार सुरुच; 66 उमेदवारांना नोटीस
2

KMC Elections 2026: एक स्टेटस पडलं महागात! प्रचाराची वेळ संपली तरी देखील सोशल मीडियावर प्रचार सुरुच; 66 उमेदवारांना नोटीस

PMC Election 2026 : मतदानाऐवजी पुणेकरांची सिंहगडावर गर्दी; लोकशाहीपेक्षा विरंगुळ्याला पसंती?
3

PMC Election 2026 : मतदानाऐवजी पुणेकरांची सिंहगडावर गर्दी; लोकशाहीपेक्षा विरंगुळ्याला पसंती?

Chandrakant Patil : ‘पैज लावून सांगतो, मुंबईत भाजपला 90 जागा मिळतील’, चंद्रकांत पाटलांनी पुन्हा सांगितली भविष्यवाणी
4

Chandrakant Patil : ‘पैज लावून सांगतो, मुंबईत भाजपला 90 जागा मिळतील’, चंद्रकांत पाटलांनी पुन्हा सांगितली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.