Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हंड्या फुटल्या…आता वेध गणेशाेत्सवाचे! पुणेकरांनी अनुभवला डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

पुण्यात जल्लाेषाच्या वातावरणात दहीहंडीचा उत्सव शहरात साजरा केला. त्याचवेळी आता कार्यकर्त्यांना गणेशाेत्सवाचे वेध लागल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 17, 2025 | 12:34 PM
हंड्या फुटल्या...आता वेध गणेशाेत्सवाचे! डिजेमुक्त दहीहंडीचा उत्साह शिगेला

हंड्या फुटल्या...आता वेध गणेशाेत्सवाचे! डिजेमुक्त दहीहंडीचा उत्साह शिगेला

Follow Us
Close
Follow Us:

पुणेे : अधुन मधुन पडणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी… आकर्षक सजावट केलेल्या हंड्या… उडत्या चालीवरील गाण्यांवर धरलेला ठेका… मानवी मनाेरे रचताना निर्माण झालेली उत्सुकता… अशा जल्लाेषाच्या वातावरणात दहीहंडीचा उत्सव शहरात साजरा केला. त्याचवेळी आता कार्यकर्त्यांना गणेशाेत्सवाचे वेध लागल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह पाेलीस, प्रशासन यांना दहीहंडी उत्सव हा गणेशाेत्सवाची रंगीत तालीमच ठरत असताे. सकाळपासूनच दहीहंडी उत्सवासाठी कार्यकर्त्यांची तयारी सुरु हाेती. माेठ्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या साऊंड सिस्टीम्सचे मनाेरेच शहरात उभे राहण्यास पाहण्यास मिळाले.

दुपारनंतर क्रेनच्या माध्यमातून दहीहंड्या चढविण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी रस्त्याच्या दाेन्ही कडेच्या इमारतींवर दाेर लावून हंड्या बांधण्यात आल्या हाेत्या. फुलांप्रमाणेच इतर सजावटीच्या साहीत्यातून दहीहंड्याचे साैंदर्य खुलविण्यात आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. याच दरम्यान, साऊंड सिस्टीम्सचा दणदणाटही सुरु झाला. उत्साहाच्या वातावरणात अधुन मधुन पडणाऱ्या पावसाच्या हलक्या सरींमुळे आल्हाददायकता निर्माण झाली हाेती. सांयकाळनंतर मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शहराच्या इतर भागातील गाेविंदा पथकांकडून दहीहंडी फाेडण्यास सुरुवात झाली होती.

डिजे मुक्त दहीहंडी

उद्याेजक पुनीत बालन यांच्या पुढाकाराने यंदा ‘डिजेमुक्त दहीहंडी’ ही माेहीम सुरु झाली आहे. पंचवीसहून अधिक मंडळांनी या माेहीमेला पाठींबा दिला. या सर्वांच्या सहकार्याने लालमहाल चाैक येथे ‘डिजेमुक्त दहीहंडी’ उभारण्यात आली. यावेळी साऊंड सिस्टीमच्या ऐवजी रमणबाग, शिवमुद्रा, समर्थ, जय शिव, युवा या ढाेल ताशा पथकांनी सादरीकरण केले. तसेच प्रभात बॅंड यांचे वादनही झाले.

मध्यवर्ती भागाप्रमाणेच उपनगरातही उत्साह

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सुवर्णयुग तरुण मंडळ ( श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ), बाबु गेणू मंडळ, श्रीकृष्ण तरुण मंडळ, अखिल गणेशपेठ पांगुळआळी सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळ, पतित पावन संघटना तसेच इतर महत्वाच्या गणेश मंडळे, तसेच विविध प्रतिष्ठान, संस्थांकडून दहीहंडी उत्सवाचे आयाेजन केले हाेते. तसेच उपनगरातही माेठ्या प्रमाणावर दहीहंडीचा सण उत्साहात पार पडला. यामध्ये काेथरुड येथील शिवशाही प्रतिष्ठान (डी. पी. राेड ) आणि वनाज जवळील ओम चॅरिटेबल ट्रस्ट यांची महिलांची दहीहंडी या दरवर्षीप्रमाणे वैशिष्ठ्यपुर्ण ठरल्या. ओम चॅरिटेबल ट्रस्टची दहीहंडी ही महीलांसाठीच आणि महिला गाेविंदा पथकाकडूनच फाेडली जाते. कल्याणीनगर येथे आदीनाश शिंदे यांच्या पुढाकाराने राजयाेग प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडीचे आयाेजन केले हाेते. कात्रज येथे अजितदादा बाबर युवा मंचच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयाेजन केले हाेते.

Web Title: Dj free dahi handi celebrated with enthusiasm in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • Dahi Handi 2025
  • Ganesh Utsav 2025
  • pune news

संबंधित बातम्या

Pune human skeleton on road : भररस्त्यामध्ये आढळला मानवी सांगाडा; पुणेकर भयभीत तर पोलिसांची उडाली धांदल, नेमकं खरं काय?
1

Pune human skeleton on road : भररस्त्यामध्ये आढळला मानवी सांगाडा; पुणेकर भयभीत तर पोलिसांची उडाली धांदल, नेमकं खरं काय?

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत
2

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत

अभियोग्यता चाचणीत गोंधळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश; 187 विद्यार्थ्यांना शून्य मार्क…
3

अभियोग्यता चाचणीत गोंधळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश; 187 विद्यार्थ्यांना शून्य मार्क…

Pune News: लघुशंकेने केला घात! फिरण्यासाठी सिंहगडावर आला अन्…; तरुणासोबत नेमके घडले तरी काय?
4

Pune News: लघुशंकेने केला घात! फिरण्यासाठी सिंहगडावर आला अन्…; तरुणासोबत नेमके घडले तरी काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.