Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Payal Zambare Suicide Case: “घरातून जप्त केले ३५ तोळे सोने अन् मोबाईल!” अभियंता पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट…

Payal Zambare Suicide Case: अभियंता पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; घरातून ३५ तोळे सोने आणि महत्त्वाचे मोबाईल जप्त. उर्वरित १५ तोळे सोन्याचा सुगावा फरार नणंदेच्या दिशेने; पतीसह सासरच्या कोठडीत वाढ!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 08, 2026 | 11:25 AM
Payal Zambare Suicide Case: "घरातून जप्त केले ३५ तोळे सोने अन् मोबाईल!" अभियंता पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट...

Payal Zambare Suicide Case: "घरातून जप्त केले ३५ तोळे सोने अन् मोबाईल!" अभियंता पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट...

Follow Us
Follow Us:
  • अभियंता पायल झांबरे प्रकरणात ३५ तोळे सोने, दागिने व मोबाईल जप्त
  • पती-सासऱ्यासह सासूच्या कोठडीत वाढ; १५ सोन्यासाठी फरार नणंदेचा शोध
  • मोबाईल्सचे विश्लेषण सुरू; अक्षताच्या अटकपूर्व जामिनावर उत्तर मागितले
Payal Zambare Suicide Case: अभियंता पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन आणि खळबळजनक अपडेट्स समोर येत आहेत. हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपींच्या घरातून तब्बल ३५ तोळे सोने, चांदीचे दागिने, पती अक्षय आणि सासरे अरविंद यांचे मोबाईल, तसेच मृत पायलचा मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. याप्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा: Pune Police Crime: “न्याय मागणाऱ्याला खाकीची लाठी!” पुण्यात मद्यधुंद पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच पोलीस ठाण्यात बेदम तुडवले…

कोठडीत वाढ, १५ ताेळे सोन्याचा शोध सुरू

पती अक्षय अरविंद झांबरे (वय ३५), सासरा अरविंद वसंतराव झांबरे (वय ६८) आणि सासू मंगल अरविंद झांबरे (वय ५८, सर्व रा. मुकुंदनगर) यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी आणि तक्रारदारांच्या वकिलांनी जप्त केलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्यातील संभाषणे व संदेशांची पडताळणी करण्यासाठी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली, जी न्यायालयाने मान्य करत आरोपींच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपी आणि पायलची नणंद अक्षता झांबरे-निम्हण हिचा पोलीस कसून शोध घेत आहेत. पोलिसांच्या तपासात ३५ तोळे सोने हाती लागले असले, तरी उर्वरित १५ तोळे सोने अद्याप मिळालेले नाही; ते फरार अक्षताकडे असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.

हेही वाचा: Accident News: दिवाळीचा सण ठरला काळ! ५ डिसेंबरच्या लग्नाआधीच दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू!

आरोपी अक्षताचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

दुसरीकडे, या गुन्ह्यात नाव आल्यापासून फरार असलेली आरोपी अक्षता झांबरे-निम्हण हिने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर न्यायालयाने पोलीस आणि सरकार पक्षाचे म्हणणे मागितले असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी काय जप्त केले आहे?

    Ans: पोलिसांनी आरोपींच्या घरातून ३५ तोळे सोने, चांदीचे दागिने, पती व सासऱ्याचे मोबाईल, मृत पायलचा मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे.

  • Que: आरोपींच्या पोलीस कोठडीत किती दिवसांची वाढ करण्यात आली आहे?

    Ans: पती, सासू आणि सासऱ्याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे.

  • Que: उर्वरित सोन्याबाबत पोलिसांना काय संशय आहे?

    Ans: गुन्ह्यातील उर्वरित १५ तोळे सोने फरार असलेली नणंद अक्षता झांबरे-निम्हण हिच्याकडे असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Web Title: Engineer payal zambare suicide case police custody extended gold seized sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • crime news delhi
  • Latest pune news update
  • pune crime news
  • pune news update
  • Sucide News

संबंधित बातम्या

Pune Police Crime: “न्याय मागणाऱ्याला खाकीची लाठी!” पुण्यात मद्यधुंद पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच पोलीस ठाण्यात बेदम तुडवले…
1

Pune Police Crime: “न्याय मागणाऱ्याला खाकीची लाठी!” पुण्यात मद्यधुंद पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच पोलीस ठाण्यात बेदम तुडवले…

Heart Attack News: दिवाळी पहाट मैफलीत वादन करताना आला तीव्र हृदयविकाराचा झटका; प्रसिद्ध मृदंगवादकांच्या निधनाने संगीत जगात शोककळा!
2

Heart Attack News: दिवाळी पहाट मैफलीत वादन करताना आला तीव्र हृदयविकाराचा झटका; प्रसिद्ध मृदंगवादकांच्या निधनाने संगीत जगात शोककळा!

Pune Pitbull Attack: सोसायटीत सायकल चालवताना निष्पाप मुलावर जीवघेणा प्रसंग, परिसरात भीतीचे वातावरण
3

Pune Pitbull Attack: सोसायटीत सायकल चालवताना निष्पाप मुलावर जीवघेणा प्रसंग, परिसरात भीतीचे वातावरण

Cosmetic Shop Drug Racket: बाहेरून साधी ज्वेलरी, आत ड्रग्सचा बाजार! पुण्यात २२ वर्षीय तरुणीच्या कृत्याने खळबळ
4

Cosmetic Shop Drug Racket: बाहेरून साधी ज्वेलरी, आत ड्रग्सचा बाजार! पुण्यात २२ वर्षीय तरुणीच्या कृत्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.