
नऊ रुग्णालयांत अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष
अद्ययावतीकरणांतर्गत मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्ष उभारण्यात येणार असून, संसर्ग रोखण्यासाठी विशेष यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक शस्त्रक्रिया मेज आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणे बसविण्यात येणार आहेत. रुग्णालयातील हवा शुद्ध व जंतुरहित ठेवण्यासाठी आधुनिक हवा शुद्धीकरण आणि वातानुकूलन व्यवस्था, मध्यवर्ती वैद्यकीय वायू पाइपलाइन, परिचारिका कॉल प्रणाली आणि विद्युत सक्शन यंत्रणा उपलब्ध होणार आहे.
ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप
प्रसूतीगृहांमध्ये माता आणि नवजात बालकांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला आहे. आधुनिक प्रसूती खाटा, नवजात बालकांसाठी आवश्यक उपकरणे, हवा शोषक यंत्रणा आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाची सुविधा उभारण्यात येणार आहे. महिला कक्षांमध्ये आधुनिक फर्निचर, स्वतंत्र साठवणूक व्यवस्था आणि स्वच्छताविषयक सुविधाही करण्यात येणार आहेत.
रुग्णालयातील प्रशासकीय आणि वैद्यकीय कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी संगणकाधारित एकात्मिक प्रभाग व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.
बोपोडीतील कै. संजय गांधी रुग्णालयात दहा खाटांचा स्वतंत्र मॉड्युलर अतिदक्षता विभाग उभारण्यात येणार आहे. यात केंद्रीय निरीक्षण व्यवस्था, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि श्वसन उपचाराच्या सुविधा असतील. तर कमला नेहरू रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाची क्षमता वाढविण्यात आली असून, गंभीर नवजात बालकांसाठी दहा आधुनिक श्वसनयंत्रे आणि दहा सीपॅप यंत्रांची सुविधा देण्यात आली आहे.
समाविष्ट रुग्णालये
संजय गांधी रुग्णालय, बोपोडी
भारतरत्न राजीव गांधी रुग्णालय, येरवडा
मुरलीधर लायगुडे दवाखाना, धायरी
महात्मा फुले दवाखाना, घोरपडी
कै. काशिनाथ अनाजी धनकवडे प्रसूतिगृह, बालाजीनगर; कै. चंद्रमामा सोनवणे रुग्णालय, भवानी पेठ
राजमाता जिजाऊ प्रसूतिगृह, मित्रमंडळ चौक
कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतिगृह, कोथरूड
कै. सखाराम कुंडलिक कोद्रे प्रसूतिगृह, मुंढवा आणि कै. द्वारकाबाई मुरलीधर खेडकर प्रसूतिगृह, बोपोडी यांचा समावेश आहे.