Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नगरपंचायतीच्या नोटिशीला ठेकेदाराची केराची टोपली! इंद्रायणी नदीपात्रातील राडारोडा अद्यापही कायम

भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाचे काम करताना इंद्रायणी नदीपात्रात टाकण्यात आलेला राडारोडा अद्याप हटविण्यात आलेला नसल्याचे उघड झाले आहे. नदीपात्र पूर्ववत करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेणार का, याकडे देहूगावमधील नागरिक आणि येलवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 31, 2026 | 12:30 AM
नगरपंचायतीच्या नोटिशीला ठेकेदाराची केराची टोपली! इंद्रायणी नदीपात्रातील राडारोडा अद्यापही कायम

नगरपंचायतीच्या नोटिशीला ठेकेदाराची केराची टोपली! इंद्रायणी नदीपात्रातील राडारोडा अद्यापही कायम

Follow Us
Follow Us:
  • इंद्रायणी नदीपात्रातील राडारोडा अद्याप हटवलेला नाही
  • देहू नगरपंचायतीची जावळे कन्स्ट्रक्शनला नोटीस
  • येलवाडीतील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार
देहूगाव : भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाचे काम करताना इंद्रायणी नदीपात्रात टाकण्यात आलेला राडारोडा अद्याप हटविण्यात आलेला नसल्याचे उघड झाले आहे. देहू नगरपंचायतीने संबंधित जावळे कन्स्ट्रक्शनला राडारोडा हटवून नदीपात्र पूर्ववत करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतरही नदीपात्रातील राडारोडा कायम असल्याचे सध्या नदीचे पाणी आटल्याने दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर नगरपंचायतीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

देहू नगरपंचायत हद्दीतील साई चौक ते वडाचा माळदरम्यान असलेल्या पुलाजवळ भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पांतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम जावळे कन्स्ट्रक्शनला देण्यात आले होते. हे काम सुरू असताना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर माती, गोटे आणि मुरूम टाकण्यात आला होता. तसेच, जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रात खोलवर खोदकाम करण्यात आले होते.

पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नदीपात्रात टाकलेला राडारोडा आणि बांधकामातील अवशेष पूर्णपणे हटविणे आवश्यक होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने केवळ काही प्रमाणात माती काढून तिचे ढीग नदीकाठावर ठेवले. नदीपात्रातील संपूर्ण माती आणि अन्य अवशेष हटविण्यात आले नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नदीचे पाणी आटल्यावर नदीपात्रातील राडारोडा उघडपणे दिसू लागला आहे.

नदीच्या प्रवाहात बदल; शेतकऱ्यांचे नुकसान

नदीपात्रात टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे इंद्रायणी नदीच्या नैसर्गिक प्रवाहात बदल होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. परिणामी, येलवाडी परिसरातील शेतजमिनीत पाणी शिरत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार आहे. जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीला महापूर आला होता. या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठावर टाकलेली माती पुन्हा वाहून नदीपात्रात मिसळल्याचेही दिसून आले. त्यामुळे नदीपात्रातील राडारोडा हटविण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

ठेकेदाराला दोन दिवसांची मुदत

इंद्रायणी नदीपात्रातील राडारोडा, बांधकाम साहित्य आणि अन्य अवशेष तातडीने हटवून नदीपात्र स्वच्छ करण्याचे निर्देश देहू नगरपंचायतीने संबंधित ठेकेदाराला २४ जून २०२६ रोजी नोटीसद्वारे दिले होते. नोटीस मिळाल्यापासून दोन दिवसांच्या आत काम पूर्ण करून, केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल छायाचित्रांसह नगरपंचायतीकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

नदीपात्रातील राडारोडा आणि बांधकाम साहित्य अद्याप हटविण्यात आले नसल्याने नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होण्याची शक्यता नगरपंचायतीने नोटिशीत नमूद केली होती. नदीपात्रातील सर्व अवशेष हटवून ते पूर्ववत करणे ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, नोटीसीला ठेकेदाराने केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. नदीपात्रातील राडारोडा अद्याप कायम असल्याचे प्रत्यक्ष परिस्थितीवरून दिसत आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सतर्क; बांधकामस्थळांना बजावण्यात आल्या नोटिसा

प्रशासनाच्या कारवाईकडे नागरीकांचे लक्ष

इंद्रायणी नदीचे नैसर्गिक पात्र आणि जलप्रवाह अबाधित ठेवण्यासाठी नदीपात्रातील राडारोडा तातडीने हटविणे गरजेचे आहे. त्यामुळे नोटिशीतील निर्देशांचे पालन न झाल्यास संबंधित ठेकेदारावर नगरपंचायत कोणती कारवाई करणार, तसेच नदीपात्र पूर्ववत करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेणार का, याकडे देहूगावमधील नागरिक आणि येलवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंद्रायणी नदीपात्रात राडारोडा कोणी टाकला आहे?

    Ans: भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाच्या पाइपलाइन कामादरम्यान जावळे कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराकडून नदीपात्रात माती, गोटे आणि मुरूम टाकण्यात आला होता.

  • Que: देहू नगरपंचायतीने ठेकेदाराला काय आदेश दिले होते?

    Ans: २४ जून २०२६ रोजी नोटीस बजावून दोन दिवसांत नदीपात्रातील राडारोडा हटवून नदीपात्र पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते.

  • Que: नदीपात्रात राडारोडा कायम राहिल्याने काय नुकसान होत आहे?

    Ans: इंद्रायणी नदीच्या नैसर्गिक प्रवाहात बदल होत असून, येलवाडी परिसरातील शेतजमिनीत पाणी शिरून शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार आहे.

Web Title: Farmers are suffering losses because the debris in the indrayani riverbed is still present nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Indrayani River
  • maharashtra

संबंधित बातम्या

Ashokkumar Rankhamb: मुंबई-ठाणे कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर; वसई-विरार परिवहन समितीच्या सभापतीपदी रणखांब विराजमान
1

Ashokkumar Rankhamb: मुंबई-ठाणे कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर; वसई-विरार परिवहन समितीच्या सभापतीपदी रणखांब विराजमान

‘तुम मेरे हो’च्या प्रमोशनसाठी ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन
2

‘तुम मेरे हो’च्या प्रमोशनसाठी ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन

प्रवाशांच्या सुविधांमध्ये पुणे विमानतळ देशात अव्वल; 5 पैकी 4.98 गुणांसह पटकावला पहिला क्रमांक
3

प्रवाशांच्या सुविधांमध्ये पुणे विमानतळ देशात अव्वल; 5 पैकी 4.98 गुणांसह पटकावला पहिला क्रमांक

Navi Mumbai News: अहवाल येण्याआधीच अधिकाऱ्यांवर कारवाई! अवनी सोसायटी पुनर्विकास प्रकरणात सोमणाथ केकाण यांना प्रवेशबंदी
4

Navi Mumbai News: अहवाल येण्याआधीच अधिकाऱ्यांवर कारवाई! अवनी सोसायटी पुनर्विकास प्रकरणात सोमणाथ केकाण यांना प्रवेशबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.