Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुम मेरे हो’च्या प्रमोशनसाठी ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन

बहुप्रतीक्षित ‘तुम मेरे हो’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री ईशा मालवीय आणि अभिनेता गुरमीत चौधरी यांनी पुण्यात हजेरी लावली. या दोन्ही कलाकारांच्या उपस्थितीमुळे पुण्यातील चित्रपटप्रेमी आणि चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 30, 2026 | 02:38 PM
‘तुम मेरे हो’च्या प्रमोशनसाठी ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन

‘तुम मेरे हो’च्या प्रमोशनसाठी ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन

Follow Us
Follow Us:
  • ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात
  • दोन्ही कलाकारांनी दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन
  • चाहत्यांशी संवाद साधत काढले फोटो
पुणे : बहुप्रतीक्षित ‘तुम मेरे हो’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री ईशा मालवीय आणि अभिनेता गुरमीत चौधरी यांनी पुण्यात हजेरी लावली. या दोन्ही कलाकारांच्या उपस्थितीमुळे पुण्यातील चित्रपटप्रेमी आणि चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी कलाकारांनी चाहत्यांशी संवाद साधत चित्रपटाविषयी माहिती दिली. तसेच पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले.

 

‘तुम मेरे हो’ हा चित्रपट आकाश आणि तमन्ना यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. अभिनेता गुरमीत चौधरी हा चित्रपटात आकाशची भूमिका साकारत असून, अभिनेत्री ईशा मालवीय तमन्नाच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांच्या नात्यातील प्रेम, संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत चित्रपटाच्या कथानकातून उलगडणार आहे.

प्रेमकथेतील संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत

चित्रपटात आकाश आणि तमन्ना यांच्या नात्याची सुरुवातच अनेक आव्हानांनी भरलेली आहे. त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात अनपेक्षित अडचणी, भावनिक चढ-उतार आणि कठीण निर्णयांचा सामना करावा लागतो. या सर्व परिस्थितींवर मात करून त्यांचे प्रेम टिकून राहणार का, त्यांच्या नात्याला सुखद शेवट मिळणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष पांडा यांनी केले आहे. प्रेमकथेच्या माध्यमातून नात्यांमधील भावना, संघर्ष आणि एकमेकांवरील विश्वास यांचे चित्रण करण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : प्रवाशांच्या सुविधांमध्ये पुणे विमानतळ देशात अव्वल; 5 पैकी 4.98 गुणांसह पटकावला पहिला क्रमांक

दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन

पुणे दौऱ्यादरम्यान ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर चाहत्यांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत छायाचित्रेही काढली. आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. चित्रपटाच्या प्रमोशनची संपूर्ण जबाबदारी फ्रीकआऊट एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आकर्षण कटियार यांनी सांभाळली आहे. पुण्यातील या प्रमोशनल भेटीमुळे ‘तुम मेरे हो’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.

हे सुद्धा वाचा : 23 ऑक्टोबरला आईशी शेवटचे बोलणे, 28 ऑक्टोबरला मृतदेह आढळला; मुग्धा देशमुख प्रकरणाने खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘तुम मेरे हो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणते कलाकार पुण्यात आले होते?

    Ans: अभिनेत्री ईशा मालवीय आणि अभिनेता गुरमीत चौधरी हे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आले होते.

  • Que: ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी यांनी पुण्यात कोणत्या मंदिरात दर्शन घेतले?

    Ans: दोन्ही कलाकारांनी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

  • Que: ‘तुम मेरे हो’ चित्रपटाची कथा कशावर आधारित आहे?

    Ans: हा चित्रपट आकाश आणि तमन्ना यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. त्यांच्या नात्यातील संघर्ष, भावनिक चढ-उतार आणि प्रेम टिकवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष यात पाहायला मिळणार आहे.

Web Title: Actress isha malviya and actor gurmeet choudhary visited the dagdusheth ganpati temple to offer prayers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Hindi Movie
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

प्रवाशांच्या सुविधांमध्ये पुणे विमानतळ देशात अव्वल; 5 पैकी 4.98 गुणांसह पटकावला पहिला क्रमांक
1

प्रवाशांच्या सुविधांमध्ये पुणे विमानतळ देशात अव्वल; 5 पैकी 4.98 गुणांसह पटकावला पहिला क्रमांक

‘बनपाव आणि त्याच्या आकाला जशास तसे उत्तर देणार’; युवा सेनेच्या जावळकरांचा इशारा
2

‘बनपाव आणि त्याच्या आकाला जशास तसे उत्तर देणार’; युवा सेनेच्या जावळकरांचा इशारा

Navi Mumbai News: अहवाल येण्याआधीच अधिकाऱ्यांवर कारवाई! अवनी सोसायटी पुनर्विकास प्रकरणात सोमणाथ केकाण यांना प्रवेशबंदी
3

Navi Mumbai News: अहवाल येण्याआधीच अधिकाऱ्यांवर कारवाई! अवनी सोसायटी पुनर्विकास प्रकरणात सोमणाथ केकाण यांना प्रवेशबंदी

23 ऑक्टोबरला आईशी शेवटचे बोलणे, 28 ऑक्टोबरला मृतदेह आढळला; मुग्धा देशमुख प्रकरणाने खळबळ
4

23 ऑक्टोबरला आईशी शेवटचे बोलणे, 28 ऑक्टोबरला मृतदेह आढळला; मुग्धा देशमुख प्रकरणाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.