Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport : पुरंदर विमानतळ भूसंपादन प्रक्रियेत अधिकाऱ्यांची मनमानी; शेतकऱ्यांची बँक खाती गोठवली

पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु असून, शेतकऱ्यांकडून अंतिम संमती घेवून त्यांच्या बँक खात्यावर पैसे वर्ग करण्यात येत आहेत. मात्र याच प्रक्रियेदरम्यान अनेक शेतकऱ्यांकडून दिलेले पैसे पुन्हा वसूल केल्याच्या घटना घडल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 14, 2026 | 02:12 PM
Purandar Airport News : पुरंदरमधील वनपुरीसह चार गावांतील जमिनी संपादनाची अधिसूचना जारी; एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाला गती

Purandar Airport News : पुरंदरमधील वनपुरीसह चार गावांतील जमिनी संपादनाची अधिसूचना जारी; एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाला गती

Follow Us
Follow Us:

सासवड/संभाजी महामुनी : पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु असून, शेतकऱ्यांकडून अंतिम संमती घेवून त्यांच्या बँक खात्यावर पैसे वर्ग करण्यात येत आहेत. मात्र याच प्रक्रियेदरम्यान अनेक शेतकऱ्यांकडून दिलेले पैसे पुन्हा वसूल केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही शेतकऱ्यांना तर जादा पैसे दिल्याचे कारण सांगून पुन्हा व्याजासह वसूल केल्याच्या चर्चा जोरदारपणे सुरु आहेत. भूसंपादन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसून अधिकाऱ्यांची मनमानी सुरु आहे, असे दिसून येत आहे.

 

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या निमित्ताने जमिनीची संपादनाची प्रक्रिया सुरु आहे. आता शेतकऱ्यांच्या जमिनीची संमती घेवून त्यांना त्यांच्या क्षेत्राचे त्यातील विविध बांधकामे, इतर गोष्टींचे नुकसानापोटी एकरकमी परतावा देण्यात येत आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत माहिती घेवून आणि खात्री झाल्यानंतर रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे.

मे महिन्यात शेतकऱ्यांच्या संमती घेण्यास सुरुवात करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला १० जूनपर्यंत स्वच्छेने परवानगी देणाऱ्यांना प्राधान्य राहील, अशा आशयाची नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्या जमिनीची संमती दिली आहे. आपापसातील भाऊबंदकीतील वाद तसेच कौटुंबिक वाद मिटविण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात करून संमती देण्यास सुरुवात केल्याने पहिल्या काही दिवसातच संमती देणाऱ्या शेतकऱ्यांची आकडेवारी वाढली.

मागील आठवड्यात जवळपास ६० टक्के संमती मिळाल्याने अधिकाऱ्यांनी शासनाला कळवले. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी याबाबत चिंताही व्यक्त केली. काही गावच्या सरपंचानी तर एकीकडे विरोधाची भूमिका घेत दुसरीकडे १० जूनची मुदत संपत असल्याचे लक्षात येताच लेखी पत्राद्वारे एक महिन्याची मुदतवाढ देखील मागितली. आणि तसे पत्र सोशेल मिडीयावर व्हायरल करीत शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.

मात्र या प्रक्रिया दरम्यान भूसंपादन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली जात असल्याचे दिसून आले आहे. ज्यांच्याकडे कमी क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांना लाभ दिला असला तरी ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र मोठे आहे, अशा शेतकऱ्यांकडून मोठ्या रकमेची वसुली केली जात असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. काही शेतकऱ्यांना तुमचा पूर्वीचा सर्व्हे चुकला असून परताव्याची रक्कम जादा लागली आहे, पुन्हा सर्व्हे करून घ्या असे सांगून काही कोटींची रक्कम पुन्हा वसूल केली जात आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्यावर त्यांची खातीच बंद केली असून त्यांना बँकेतील पैसे काढण्यास मनाई केली असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : देहूतील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत; आषाढी वारीपूर्वी पर्यावरणीय संकट

भूसंपादनाचे क्षेत्र आणि पैसे वाटपातील आकड्यात मोठी तफावत

एकीकडे ७० ते ८० टक्के क्षेत्राला शेतकऱ्यांच्या संमती मिळाल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. ३ हजार एकर साठी सहा हजार कोटींची सोय केल्याचे शासन सांगत आहे, मात्र ७० टक्के क्षेत्रासाठी केवळ ९०० कोटी वाटप हा विचार करायला लावणारा आकडा आहे. तसेच शेतकऱ्यांच्या संमती घेवूनही त्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत, केवळ संमतीची आकडेवारी वाढवली असल्याने पैसे न मिळाल्याने शेतकरी अधिकारी यांच्याकडे आताच हेलपाटे मारीत असल्याचे चित्र पुरंदरच्या तहसील कार्यालयात दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे! रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम; पेरणीची कामे खोळंबली

Web Title: Farmers have alleged that officials are acting arbitrarily in the land acquisition process for the purandar airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
1

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
2

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
3

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
4

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.