Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळातील शेतकरी पुन्हा आक्रमक, रिंगरोडला तीव्र विरोध; प्रशासनाला दोन महिन्यांचा अल्टिमेटम

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित अंतर्गत रिंगरोड प्रकल्पाविरोधात मावळ तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 19, 2026 | 11:21 AM
मावळातील शेतकरी पुन्हा आक्रमक, रिंगरोडला तीव्र विरोध; प्रशासनाला दोन महिन्यांचा अल्टिमेटम

मावळातील शेतकरी पुन्हा आक्रमक, रिंगरोडला तीव्र विरोध; प्रशासनाला दोन महिन्यांचा अल्टिमेटम

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित अंतर्गत रिंगरोड प्रकल्पाविरोधात मावळ तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. रिंगरोडच्या मूळ आराखड्यात फेरबदल करून काही धनदांडग्या आणि विकासकांना फायदा पोहोचवल्याचा गंभीर आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. प्रकल्पाच्या रचनेत आणि टाउन प्लॅनिंग (टीपी) स्कीममध्ये पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली असून, अन्यथा व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

 

मावळातील सांगवडे, दारुंब्रे, साळुंब्रे, नेरे, धामणे आणि गोडुंबरे या गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच ‘पीएमआरडीए’च्या अधिकार्‍यांची भेट घेतली. या वेळी ग्रामस्थांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त करत, प्रकल्पाची मूळ आखणी आणि त्यातील बदलांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली. संपूर्ण मार्गात तब्बल १६ ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. हे बदल नेमके कोणाच्या हितासाठी केले? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

आधीच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच नवे संकट

यापूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडसाठी मावळातील अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्या धक्क्यातून शेतकरी अजून सावरलेले नसतानाच, आता पीएमआरडीएच्या अंतर्गत रिंगरोडमुळे पुन्हा हजारो एकर सुपीक जमीन आणि अनेक घरे बाधित होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. “आधीच महामार्ग, औद्योगिक प्रकल्प आणि विविध विकास योजनांसाठी आमच्या जमिनी गेल्या आहेत. आता पुन्हा नव्याने भूसंपादन झाल्यास अनेक कुटुंबे भूमिहीन होतील. विकासाच्या नावाखाली आमचे अस्तित्वच संपवले जात आहे,” अशी खंत बाधित ग्रामस्थांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा : ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

प्रकल्पाचा संक्षिप्त आढावा

एकूण लांबी : ८३ किलोमीटर

सध्याची प्रस्तावित रुंदी : ६५ मीटर (मूळ प्रस्ताव: ११० मीटर)

मार्गातील बदल : १६ ठिकाणी

बाधित गावांची संख्या : १३

रिंगरोडच्या मुख्य आराखड्यात नेमका का बदल करण्यात आला, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. बाधित शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. आमचा सध्याच्या टीपी स्कीमला स्पष्ट विरोध आहे. मी सर्व शेतकर्‍यांच्या वतीने पीएमआरडीए प्रशासनाला दोन महिन्यांची मुदत देत आहे. या काळात प्रकल्पाची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे जाहीर करावी. — सुनील शेळके, आमदार, मावळ.

Web Title: Farmers in maval taluka have become aggressive against the ring road project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • maval news

संबंधित बातम्या

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
1

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त
2

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई
3

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई

तिकोना गडाचा इतिहास आता क्यूआर कोडवर; पर्यटकांना मिळणार ऑडिओ स्वरूपात माहिती
4

तिकोना गडाचा इतिहास आता क्यूआर कोडवर; पर्यटकांना मिळणार ऑडिओ स्वरूपात माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.