Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकरी संकटावर काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी सरकारला दिला इशारा

ठाण्यासह राज्यातील अनेक शहरात पिण्याचे पाणी मिळत नाही. काँग्रेस पक्ष दुष्काळाच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 20, 2026 | 05:46 PM
दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकरी संकटावर काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी सरकारला दिला इशारा

दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकरी संकटावर काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी सरकारला दिला इशारा

Follow Us
Follow Us:
  • राज्यात तीव्र दुष्काळ आणि पाणीटंचाई
  • शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली नसल्याचा आरोप
  • काँग्रेस हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरणार
मुंबई : राज्यातील जनतेला दुष्काळाचे भयंकर चटके बसत आहेत, ग्रामीण भागासह शहरातही पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रचंड आहे, शेतकरी संकटात आहे पण सरकार मात्र काहीही करत नाही. दुष्काळ निवारणासाठी भाजपा महायुती सरकारडे कसलेही नियोजन नसून केवळ पोकळ घोषणा केल्या जात आहेत. ठाण्यासह राज्यातील अनेक शहरात पिण्याचे पाणी मिळत नाही. काँग्रेस पक्ष दुष्काळाच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

 

काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे आज प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विभाग व सेलच्या अध्यक्षांसोबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव रेहाना चिस्ती, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस अभिजीत सपकाळ आदी उपस्थित होते. आगामी काळात आक्रमकपणे काम करण्याचे तसेच सहा महिन्याचा कृती कार्यक्रम पुढील चार दिवसात सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांचे शहर ठाण्यातही पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई आहे, अनेक शहरात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. टँकर लॉबीला पाणी मिळते, या टँकर लॉबीचा फायदा करुन देण्यात सरकारला अधिक रस दिसत असून ‘दुष्काळ आवडे सरकारला’ अशी अवस्था आहे. शेतकरी प्रचंड संकटात आहे पण ५ हजार रुपयावर शेतकऱ्याची बोळवण केली आहे, भरीव मदत अद्याप मिळालेली नाही. केंद्र सरकारनेही मदतीच्या नावाखाली महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत. महायुती सरकारने ३१० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला पण मदत करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

भाजपा आमदार महेश बालदीचे सदस्यत्व रद्द करा

भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश बालदी यांना अलिबाग न्यायालयाने तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या आमदाराचे सदस्यत्व विधानसभा अध्यक्षांनी तातडीने रद्द केले पाहिजे. काँग्रेस आमदार सुनिल केदार यांना एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावताच त्यांचे विधानसभा सदस्यत्व तातडीने रद्द करण्यात आले. राहुल गांधी यांना एका खोट्या प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावताच त्यांचे लोकसभा सदस्यत्व २४ तासात रद्द केले, त्यांचे शासकीय निवासस्थानही खाली केले. पण भाजपाच्या आमदारांना शिक्षा होऊनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही शिक्षा झाली असता त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली नाही. भाजपा सरकार स्वताच्या आमदारांना एक न्याय लावते तर विरोधकांना दुसरा न्याय. विधानसभेचे अध्यक्ष अलिबागमध्ये आदिवासींच्या जमिनी बळावण्यात व्यस्त असल्याने त्यांना बालदींचे सदस्यत्व रद्द करण्यास वेळ मिळत नसावा, असा खोचक टोलाही सपकाळ यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा : जायकवाडी कालव्यात फेकलेल्या श्यामचाही मृतदेह सापडला; दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा

NSUI चे सोशल मीडिया अभियान

तरुणाई व विद्यार्थ्यांच्या आवाजाला व्यासपीठ देण्यासाठी  NSUI ने सोशल मीडियावर एका अभियानाची सुरुवात केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे व आकाश रजावत यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रातून सुरु करण्यात आलेले हे अभियान देशभर राबविले जाणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला कोणता इशारा दिला?

    Ans: राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या प्रश्नावर काँग्रेस हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

  • Que: दुष्काळाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर काय आरोप केला?

    Ans: दुष्काळ निवारणासाठी सरकारकडे ठोस नियोजन नसून केवळ घोषणा केल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली नसल्याचेही त्यांनी म्हटले.

  • Que: भाजप आमदार महेश बालदी यांच्याबाबत काँग्रेसची मागणी काय आहे?

    Ans: अलिबाग न्यायालयाने महेश बालदी यांना तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याने त्यांचे विधानसभा सदस्यत्व तातडीने रद्द करावे, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

Web Title: Harshvardhan sapkal has warned the government regarding the crisis faced by farmers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

Maharashtra drought 2026: दुष्काळी परिस्थितीचा राज्यपालांकडून आढावा; बलसूरमध्ये शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती
1

Maharashtra drought 2026: दुष्काळी परिस्थितीचा राज्यपालांकडून आढावा; बलसूरमध्ये शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

दुष्काळात रोटी गावाला मोठा दिलासा; जनाई शिरसाई योजनेचे पाणी अखेर तलावात दाखल
2

दुष्काळात रोटी गावाला मोठा दिलासा; जनाई शिरसाई योजनेचे पाणी अखेर तलावात दाखल

Ujani Dam: माणूस आणि जनावरे तहानेने व्याकूळ; धारशिवला उजनी तारणार; ‘इतके’ पाणी मिळणार?
3

Ujani Dam: माणूस आणि जनावरे तहानेने व्याकूळ; धारशिवला उजनी तारणार; ‘इतके’ पाणी मिळणार?

अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? पुण्यात झळकले बॅनर
4

अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? पुण्यात झळकले बॅनर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.