
महाराष्ट्र विकास केंद्र या सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘जलमित्र पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय जलाशय संवर्धन समितीचे अध्यक्ष, ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथील चिलिका विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व निवृत्त आयएफएस अधिकारी डॉ. अजित पटनाईक यांना डॉ. सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला सांगलीचे निवृत्त जिल्हाधिकारी व यशदा, पुणेचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटिअर विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक व सचिव डॉ. अरूणचंद्र पाठक, महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील तसेच जलमित्र पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी उपस्थित होते.
डॉ. सुरेश प्रभू पुढे म्हणाले की, पाण्याचा प्रश्न सर्वच घटकांना कमी-अधिक प्रमाणात भेडसावत आहे. या प्रश्नाशी निगडित जमीन, जंगल, जैवविविधता, पक्ष्यांचे स्थलांतर असे अनेक पैलू असून त्यांचा समग्र विचार करून वैयक्तिक, सार्वजनिक आणि संस्थात्मक पातळीवर काम होणे आवश्यक आहे. परागीभवनामुळे शेतीची सुपीकता वाढते आणि आजवर कोणतेही विज्ञान परागीभवनाला पर्याय ठरू शकलेले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
प्रोजेक्ट मुंबईकडून झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी 2025 मेळाव्याचे आयोजन