प्रोजेक्ट मुंबईकडून झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी 2025 मेळाव्याचे आयोजन
कार्यक्रमाची सुरुवात ‘झिरो वेस्ट स्कूल्स’ फिल्मच्या स्क्रिनिंगने, दीपप्रज्वलनाने आणि हवामान व शाश्वतता क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मान्यवरांच्या स्वागताने झाली. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित माझी वसुंधरा अभियानाचे मिशन संचालक सुधाकर बोबडे यांनी चार दशकांपासूनची सार्वजनिक सेवा आणि हवामान-प्रतिक्रिया प्रशासनातील त्यांच्या योगदानाविषयी माहिती दिली. प्रोजेक्ट मुंबई आणि मुंबई क्लायमेट वीकचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी नागरिकांच्या हवामान कृतीचे महत्त्व स्पष्ट केले. चिल्ड्रन्स अकॅडमीचे रोनित भट यांनी शाळांमध्ये अनुभवात्मक, शाश्वतता-केंद्रित शिक्षणाची गरज व्यक्त केली, तर झिरो वेस्ट स्कूल्सचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी आणि मरीन बायोलॉजिस्ट कोणार्क बोरकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि हवामान जबाबदारी विकसित करण्यावर भर दिला. दोन तरुण विद्यार्थी चॅम्पियन्सनी मंचावर विद्यार्थी-केंद्रित हवामान नेतृत्त्वाचे प्रतिनिधित्व केले.
मेळाव्याची खासियत म्हणजे सस्टेनेबल गिफ्ट रॅपिंग, ग्रीन रिडिंग आणि प्लास्टिक-फ्री डेकॉर या तीन प्रत्यक्ष कार्यशाळांचे एकाचवेळी आयोजन. यासोबत प्रदर्शन झोनही होता, जिथे विद्यार्थ्यांनी दहा परस्परसंवादी शाश्वतता गेम स्टॉल्स, चक्रिय अर्थव्यवस्थेची प्रदर्शने, एनजीओ बूथ्स आणि प्रोजेक्ट मुंबईचे कंपोस्टिंग, रिसायकलिंग, अपसायकलिंग व लो-वेस्ट लिव्हिंगच्या प्रात्यक्षिके पाहिली. या अनुभवातून त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून शिकल्यास शाश्वततेची उद्दिष्टे सहज गाठता येतात, हे जाणले.
दुपारच्या सत्रात युनिसेफ इंडियाचे वॉश CCES स्पेशलिस्ट युसुफ कबीर यांनी प्रेरणादायी मुख्य भाषण केले. त्यानंतर तरुण पर्यावरणवादी राहुल बागवे यांच्या सूत्रसंचालनाखाली लेव्हल २ शाळांच्या विद्यार्थ्यांसह पॅनेल चर्चा झाली, ज्यात हवामान उपक्रमांशी निगडित आव्हाने आणि संधींवर संवाद झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे यूएन एन्व्हायरन्मेंट गुडविल ॲम्बेसेडर अभिनेत्री दिया मिर्झा यांनी तरुणांसोबत केलेली प्रेरणादायी चर्चा. हवामान जबाबदारीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी तरुण हे केवळ भविष्य नसून ‘आजचे नेतृत्व’ असल्याचे सांगितले.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी जाहीर! ‘ही’ आहे दावे-हरकती दाखल करण्याची मुदत
पुरस्कार सोहळ्यात ९ लेव्हल २ शाळा, २० लेव्हल १ शाळा आणि विलक्षण कटिबद्धता दाखवणाऱ्या २० फॅसिलिटेटर्सना गौरवण्यात आले. कंपोस्टिंग, कचरा विलगीकरण, प्लास्टिक पुनर्वापर आणि विद्यार्थी-केंद्रित हवामान उपक्रमांद्वारे शाळा झिरो-वेस्ट झोन्समध्ये रूपांतरित होत असल्याचा विश्वास या पुरस्कारांनी व्यक्त केला.
सस्टेनेबिलिटी मेळा २०२५ हा विद्यार्थी, शिक्षक, नागरी अधिकारी आणि सामुदायिक सहयोगी यांच्यातील उत्तम टीमवर्कचे उदाहरण ठरला. सामुदायिक कंपोस्टिंग, प्लास्टिक कमी करण्याच्या मोहीमा आणि चक्रिय अर्थव्यवस्थेचे उपाय यांसारख्या उपक्रमांवर प्रकाश टाकत, या कार्यक्रमाने शालेय स्तरावरील कृती आणि शहरातील हवामान स्थिरता यांना जोडणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विद्यार्थी नेतृत्व केल्यास शहर प्रगतीकडे वाटचाल करते, हा ठोस संदेश मेळाव्यातून देण्यात आला.
शेवटी, स्वच्छ, हरित आणि शून्य-कचरा मुंबईच्या दिशेने चाललेल्या या चळवळीत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. अधिक माहितीसाठी किंवा स्वयंसेवक/सहयोगी म्हणून जोडण्यासाठी info@projectmumbai.org या ईमेलवर किंवा ९६५३३ ३०७१२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.






