Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वसाधारण सभेतील संकेतांचा सत्ताधाऱ्यांना विसर; विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर बिडकरांकडून दखल

पुणे महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत संकेत न पाळल्याची खंत विराेधी पक्षातील नगरसेवकांनी शुक्रवारी व्यक्त केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 14, 2026 | 12:08 PM
सर्वसाधारण सभेतील संकेतांचा सत्ताधाऱ्यांना विसर; विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर बिडकरांकडून दखल

सर्वसाधारण सभेतील संकेतांचा सत्ताधाऱ्यांना विसर; विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर बिडकरांकडून दखल

Follow Us
Follow Us:
  • सर्वसाधारण सभेतील संकेतांचा सत्ताधाऱ्यांना विसर
  • विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर बिडकरांकडून दखल
  • सभागृहात नेमकं काय घडलं?
पुणे : पुणे महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत संकेत न पाळल्याची खंत विराेधी पक्षातील नगरसेवकांनी शुक्रवारी व्यक्त केली आहे. तसेच सर्वच पक्षातील नगरसेवकांना सभागृहाच्या कामकाजाविषयी प्रशिक्षण द्या, अशी मागणी केली गेली. त्यावर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे.

 

गेल्या आठवड्यात महापाैर, उपमहापाैर निवडणुकीसाठी नवाेदित सभागृहाची पहीली सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी नवाेदीत आणि जुन्या नगरसेवकांकडून अनेक संकेत पाळले गेले नाही. याविषयी माजी महापाैर प्रशांत जगताप यांनी शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत खंत व्यक्त केली. महापालिकेचे सभागृहातील संकेत हे पाळले गेले पाहीजे. काेणीही उठते, बाहेर जाते, काेण गाॅगल घालून सभागृहात येते असे प्रकार घडत आहे. वास्तविक महापाैर आसनावर असताना, त्यांना बाहेर जाताना किंवा सभागृहात येताना नमस्कार करणे आवश्यक आहे. तसेच महापाैर सभागृहात आल्यानंतर सर्व सदस्यांनी उभे राहणे गरजेचे आहे. असे अनेक संकेत असून, त्याची माहीती नवीन सदस्यांना नाही, तर काही जुने नगरसेवकांना याचा विसर पडला असावा, त्यामुळे सभागृहाच्या कामकाजाविषयी नगरसेवकांचे एक प्रशिक्षण वर्ग घेण्यात यावा, अशी मागणी जगताप यांनी केली.

याची दखल घेत सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, सभागृहात नवाेदित नगरसेवकांची संख्या अधिक आहे. पहिल्या सभेला काही गाेष्टी घडल्या असतील, यापुढील सर्वसाधारण सभेत संकेत पाळले जातील. याविषयी सर्वच नगरसेवकांना याेग्य ते प्रशिक्षण देण्यात येईल.

हे सुद्धा वाचा : पुणे महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्याची नावे जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी?

आयुक्त तुम्हाला हात जाेडून विनंती!

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी विषय समितींच्या सदस्यांची निवड झाली. तत्पुर्वी आयत्या वेळचे विषय म्हणून अर्चना पाटील यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, ग्रॅच्युएटीचा विषय मांडला. तसेच वर्षा तापकीर यांनी महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थींनीच्या स्वच्छतागृहाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. तसेच कर्मचाऱ्यांची पदाेन्नती आणि भरतीचा विषय यावेळी मांडला गेला. याविषयावर महापाैर मंजुषा नागपुरे यांनी आयुक्त नवल किशाेर राम यांना निवेदन करण्यास सांगितले. तेव्हा आयुक्त हे खुर्चीवर बसुनच निवेदन करू लागले. ही बाब लक्षात आल्यानंतर काॅंग्रेसचे माजी गटनेते अरविंद शिंदे यांनी हात जाेडून आयुक्त नवल किशाेर राम यांना तुम्ही उभे राहून निवेदन करावे, अशी विनंती केली. महापाैरांसमाेर निवेदन करताना प्रशासनाने उभे राहूनच केले पाहीजे असे संकेत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आयुक्तांनी देखील मला ही बाब माहीती नाही असे नमूद करीत दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी उभे राहून निवेदन केले.

Web Title: Ganesh bidkar has taken note of the demands of the opposition corporators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Naval Kishore Ram
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.