Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये धुराळा; उपनगराध्यक्षपदी गणेश काकडे यांची बिनविरोध निवड

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नगरसेवक गणेश काकडे यांच्याकडे बिनविरोध सोपविण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 14, 2026 | 05:57 PM
Ganesh Kakade elected unopposed as Deputy Chairperson of Talegaon Dabhade Municipal Council

Ganesh Kakade elected unopposed as Deputy Chairperson of Talegaon Dabhade Municipal Council

Follow Us
Close
Follow Us:
  • तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षांची बिनविरोध निवड
  • उपनगराध्यक्षपदाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश काकडे यांच्याकडे
  • अनुभवी असल्याने बिनविरोध निवड
Maval Political News : वडगाव मावळ : सतिश गाडे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Local Body Elections) निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सध्या पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून लवकरच जिल्हा परिषदांचा निवडणूका होणार आहेत. तर यापूर्वी नगर पंयाचत आणि नगर परिषदांच्या निवडणूका पार पडल्या. यानंतर आता उपनगराध्यक्ष पदाची निवड केली जात आहे. (Maval News)

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नगरसेवक गणेश काकडे यांच्याकडे बिनविरोध सोपविण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी आगळे, बाबा मुलानी आणि भाजपचे सूरज सातकर यांच्या नावांना मंजुरी देण्यात आली. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

हे देखील वाचा : पुणे पोलिसांबाबतच दुजाभाव का? मुंबई, नागपूरच्या तुलनेत पुण्यात पोलिसांचे मनुष्यबळ अत्यंत कमी

नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुती झाली असून, त्यातून भाजपचे संतोष हरिभाऊ दाभाडे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १७, भाजपचे १० आणि १ अपक्ष, असे मिळून २८ नगरसेवक निवडून आले होते.
उपनगराध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी नगरपरिषद सभागृहात पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेस मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, गटनेत्या हेमलता खळदे, पक्षप्रतोद सत्यम खांडगे, भाजपचे गटनेते इंदरमल ओसवाल यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

हे देखील वाचा : लाडक्या बहिणींच्या हातात हप्ता अन् मनात प्रश्न! महिला मतदार कुणाच्या पारड्यात?

निवडीनंतर आमदार सुनील शेळके तसेच विविध पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्ष गणेश काकडे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. काकडे यांनी यापूर्वी तीन वेळा नगरसेवक, विरोधी पक्षनेते आणि उपनगराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली असून, महायुतीच्या ठरावानुसार अडीच वर्षांनंतर त्यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे.

यावेळी आमदार सुनील शेळके यांनी शहरहितासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. तर उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी येत्या काही महिन्यांत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. विरोधी पक्षनेते संतोष भेगडे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कडक लक्ष ठेवले जाईल, असे नमूद केले.

Web Title: Ganesh kakade elected unopposed as deputy chairperson of talegaon dabhade municipal council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • maval news
  • Maval Politics
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Pune Crime News : 9 वर्षांनंतर लागला तिहेरी हत्याकांडचा निकाल; अखेर त्या 10 आरोपींना जन्मठेपची शिक्षा
1

Pune Crime News : 9 वर्षांनंतर लागला तिहेरी हत्याकांडचा निकाल; अखेर त्या 10 आरोपींना जन्मठेपची शिक्षा

मावळ तालुक्यात ५ गट व १० गण यांची निवडणूक; ५ फेब्रुवारीला मतदान, १० फेब्रुवारीला निकाल
2

मावळ तालुक्यात ५ गट व १० गण यांची निवडणूक; ५ फेब्रुवारीला मतदान, १० फेब्रुवारीला निकाल

वडगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुनील ढोरे बिनविरोध
3

वडगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुनील ढोरे बिनविरोध

मावळात अवैध धंद्यांचा उच्छाद! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेमुळेच हातभट्टीचा व्यवसाय फोफावला?
4

मावळात अवैध धंद्यांचा उच्छाद! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेमुळेच हातभट्टीचा व्यवसाय फोफावला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.