Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सव 2024 : सुबक लाडकी बांधणीचे मंदिर; गुपचूप वरद विनायक

पुण्यामध्ये अनेक ऐतिहासिक मंदिर आहेत. त्यापैकी अनेक मंदिरांची नावं आश्चर्यकारक आहे. या मंदिराला अशी हटके आणि वेगळी नाव का पडली असा प्रश्न पडतो. असेच एक पुण्यातील गणपती म्हणजे गुपचूप गणपती. शनिवार पेठेमध्ये असणाऱ्या या गुपचूप गणपतीबद्दल माहिती सांगणारा हा लेख.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 14, 2024 | 11:18 AM
pune gupchup ganapati information

pune gupchup ganapati information

Follow Us
Follow Us:

प्रिती माने : पुण्यामध्ये गणरायाची ऐतिहासिक आणि सुबक अशी अनेक मंदिरं आहे. या शहराला विद्येचे माहेरघर म्हटलं जातं यामुळे विद्येची देवता असलेल्या गणरायाची अनेक मंदिरं पुण्यामध्ये अस्तित्वात आहेत. या मंदिरांची नावं हटके असल्यामुळे त्यांना अशी नाव का पडली आहेत असा प्रश्न उपस्थित होतो. यापैकीच एक म्हणजे गुपचूप गणपती. पुण्यातील कौलारु बांधणीची लाकडी मंदिरं आहेत पण आपल्या नावामुळे वेगळेपणा जपणारा हा गणपती म्हणजे गुपचूप गणपती.

शनिवार पेठेमध्ये हे गुपचूप गणपती मंदिरं आहे. मुठा नदीच्या जवळच आपटे घाटाकडे जाणाऱ्या उजवीकडील रस्त्यावर हे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम लाकडी असून वाड्यामध्ये हे मंदिर आहे. मंदिराला गुपचूप गणपती असे नाव असल्यामुळे सर्वांना असे नाव का आहे याचा प्रश्न पडतो. या गणपतीची स्थापना चिंचवडचे गृहस्थ रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी केली आहे. त्यामुळे गणपतीला नाव देखील गुपचूप गणपती असे पडले. रामचंद्र गुपचूप हे मोरेश्वर शास्त्री आणि रावजी शास्त्री दीक्षित यांचे निष्ठावंत शिष्य होते. गुरुंनी सूचना केल्याप्रमाणे 1892 साली गुपचूप यांनी शनिवार पेठेमध्ये या मंदिराची स्थापना केली.

शनिवार पेठेतील गुपचूप गणपतीला वरद गणपती देखील म्हटले जाते. मंदिरामध्ये मोठ्या लाकडी दरवाज्यातून प्रवेश करता येतो. मंदिराला दिंडी दरवाजा आहे. मंदिरामध्ये गाभारा, सभागृह आणि प्रदक्षिणा मार्ग आहे. सभागृहामध्ये लाकडी असे खांब असून सुंदर असे नक्षीकाम कोरले आहे. 100 वर्षांहून पूर्वीच्या काळातील चित्र या मंदिरामध्ये आहेत. यामध्ये तीन वेगवेगळ्या युगातील गणपतीची चित्रं आहेत. पुण्यामध्ये पानशेत धरण फुटल्याची घटना घडली होती. त्यावेळी शहरात पूर आला होता. तेव्हा मंदिर 28 तास पाण्यामध्ये बुडालेले होते. यावेळी मंदिराचा सगळा भाग वाहून गेला पण गाभारा आणि देवाची मूर्ती त्यासोबतच लाकडी खांब तसेच राहिले. चार वर्षांनंतर मंदिराचा जीर्णौद्धार करण्यात आला.

या गुपचूप वरद गणपतीची गाभाऱ्यामध्ये सुबक अशी मूर्ती आहे. मूर्ती मूळ काळ्या पाषाणामध्ये साकारण्यात आली आहे. मात्र आता मूर्तीवर शेंदूर लेपण करण्यात असून ती पद्मासनामध्ये आहे. वरद विनायकाची मूर्ती डाव्या सोडेंची असून चतुर्भुज अशी तीन फुट उंचीची आहे. वरील दोन्ही हातांत परषू आहेत. खालचा उजवा हात अभयमुद्रेत असून डाव्या हातात मोदक आणि त्यावर सोंड आहे. देवाच्या गाभाऱ्यावर 4 लहान शिखरे आहेत. गणरायाची मूर्ती पाहून अतिशय प्रसन्न वाटते. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये नदी जवळ असणारे गुपचूप गणपती पुण्याच्या ऐतिहासिक आणि लाकडी बांधकामाच्या मंदिरापैकी एक आहे. आजही गुपचूप गणपती मंदिरामध्ये पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जपून आहे.

Web Title: Ganeshotsav 2024 information about gupchup varad vinayak mandir in shaniwar peth pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 11:18 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Tulsi Vivah 2026: आनंदाचे, मांगल्याचे पावन पर्व तुळशी विवाहाचे…! तुळशी विवाहाच्या नातेवाईकांना पाठवा खास शुभेच्छा
1

Tulsi Vivah 2026: आनंदाचे, मांगल्याचे पावन पर्व तुळशी विवाहाचे…! तुळशी विवाहाच्या नातेवाईकांना पाठवा खास शुभेच्छा

Tulsi Vivah 2026: घरच्या घरी तुळशी विवाह करताना कोणते विधी करावेत? जाणून घ्या संपूर्ण पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Tulsi Vivah 2026: घरच्या घरी तुळशी विवाह करताना कोणते विधी करावेत? जाणून घ्या संपूर्ण पूजा पद्धत आणि महत्त्व

Dev Diwali 2026: कार्तिक पौर्णिमेला का साजरी करतात देवदिवाळी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि पौराणिक महत्त्व
3

Dev Diwali 2026: कार्तिक पौर्णिमेला का साजरी करतात देवदिवाळी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि पौराणिक महत्त्व

Kartiki Ekadashi 2026: जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल..! कार्तिकी एकादशीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा
4

Kartiki Ekadashi 2026: जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल..! कार्तिकी एकादशीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.