Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हडपसर-जेजुरी-नीरा पीएमपीएल सेवा दिवसभर ठप्प; बेजबाबदार कारभारावर प्रवाशांचा संताप

टोलच्या वादावर तातडीने तोडगा काढण्याऐवजी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय म्हणजे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे. टोलचा प्रश्न प्रशासनाने चर्चेतून सोडवावा; मात्र त्यासाठी प्रवाशांना वेठीस धरणे थांबवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 24, 2026 | 01:59 PM
नव्या गाड्यांच्या हडपसर-जेजुरी-नीरा पीएमपीएल सेवा दिवसभर ठप्प; बेजबाबदार कारभारावर प्रवाशांचा संतापपीएमपी सज्ज; डेपो अन् पार्किंगसाठी 100 एकर जागेची मागणी

नव्या गाड्यांच्या हडपसर-जेजुरी-नीरा पीएमपीएल सेवा दिवसभर ठप्प; बेजबाबदार कारभारावर प्रवाशांचा संतापपीएमपी सज्ज; डेपो अन् पार्किंगसाठी 100 एकर जागेची मागणी

Follow Us
Follow Us:

नीरा : बेलसर टोलनाका व्यवस्थापन आणि पीएमपीएल प्रशासन यांच्यात टोल शुल्काच्या आर्थिक वादाचा फटका अखेर सर्वसामान्य प्रवाशांना बसला. हडपसर-जेजुरी-नीरा मार्गावरील पीएमपीएलच्या बसफेऱ्या गुरुवारी दिवसभर अचानक बंद ठेवण्यात आल्याने हजारो नियमित प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा बंद करण्यात आल्यामुळे पीएमपीएलच्या नियोजनशून्य आणि बेजबाबदार कारभाराविरोधात प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाच्या रुंदीकरणानंतर जेजुरीजवळ बेलसर येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर गेल्या दोन महिन्यांपासून टोल वसुली सुरू आहे. या मार्गावर धावणाऱ्या पीएमपीएल बसांना अल्प अंतरासाठीही मोठ्या प्रमाणात टोल भरावा लागत असल्याने हा आर्थिक भार असह्य ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी टोल व्यवस्थापन आणि पीएमपीएल प्रशासन यांच्यात चर्चा होऊन सवलतीच्या दरात बस सोडण्याचा तात्पुरता तोडगा काढण्यात आला होता. त्यासाठी पीएमपीएलने प्रवाशांच्या तिकिटामागे एक रुपया अतिरिक्त आकारण्यासही सुरुवात केली होती.

दरम्यान, गुरुवारी पुन्हा टोल शुल्काच्या आर्थिक बोलणीत तिढा निर्माण झाल्याने संबंधित व्यवस्थापनाने बससेवा रोखल्याचे समोर आले. या वादात प्रवाशांचा काहीही संबंध नसताना त्यांनाच वेठीस धरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

बससेवा बंद राहणार असल्याची पूर्वसूचनाही नाही

हडपसर, सासवड, जेजुरी, वाल्हे, नीरा या मार्गावरील विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक यांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. अनेकांना खासगी वाहनांचा खर्च सोसावा लागला, तर काहींची महत्त्वाची कामेही खोळंबली. विशेष म्हणजे, बससेवा बंद राहणार असल्याची साधी पूर्वसूचनाही पीएमपीएलने दिली नाही. त्यामुळे बसस्थानकांवर तासन्‌तास प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या संस्थेकडून अशा प्रकारची निष्काळजी भूमिका अपेक्षित नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.

सामान्य नागरिकांवर अन्याय

टोलच्या वादावर तातडीने तोडगा काढण्याऐवजी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय म्हणजे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे. टोलचा प्रश्न प्रशासनाने चर्चेतून सोडवावा; मात्र त्यासाठी प्रवाशांना वेठीस धरणे थांबवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पीएमपीएल प्रशासनाने या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

राम मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या झाली कमी; दानचोरीचे प्रकरण बाहेर येताच दिसून आला फरक

Web Title: Hadapsar jejuri nira pmpl service stalled all day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • PMPML Bus
  • pune news

संबंधित बातम्या

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
1

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
2

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
3

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल
4

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.