या पार्श्वभूमीवर पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणीही नदीपात्रात उतरू नये, तसेच शेती अवजारे, पंप, जनावरे इत्यादी नदीकाठी असल्यास ती तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत. सखल भागातील रहिवाशांना स्थानिक प्रशासनाने सूचना देण्यास सुरुवात केली असून, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
PCMC News: पवना-मुळशीमधून पाण्याचा विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा, सध्याची स्थिती काय?
पवना धरण ८४.२८% भरले; १५०० क्युसेक्स विसर्ग
गेले काही दिवस पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील धरणसाखळी क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच होती. मात्र आता या पावसाचा पाणलोट क्षेत्रातील जोर वाढला असल्याने मुळशी आणि पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.