पुण्यात मुसळधार पावसाला सुरूवात
परतीच्या पावसाने पुण्याला जोडपले
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ
Pune Rain News: गेल्या एक ते दोन दिवसांपासून पुणे शहरात पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याचे दिसून आले होते. हवामान विभागाने महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र पावसाने काहीशी उसंत घेतल्याचे दिसून येत होते. त्यानंतर आज दुपारी अचानक मुसळधार पावसाने पुण्यात हजेरी लावली आहे. दरम्यान पुणे शहरात अचानक पवसाजे हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडल्याचे दिसून आले.
हवामान विभागाने दोन दिवस महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात अलया होता. आज पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. लोकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्वतःचे पावसापासून रक्षण केले.
पुणे शहरात आलेल्या अचानक पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे सातारा रास्ता, सिंहगड रास्ता, पेठ भागात आणि अन्य उपनगर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक सखल भागात पाणी देखील साचल्याचे दिसून आले.
Pune Rain News: सावधान! खडकवासल्यातून १४ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद अन् शाळांना थेट…
पावसाचा परती प्रवास सुरु झाला असून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह पुण्यामध्ये आणि राज्यातील विविध भागांमध्ये काल सायंकाळपासून तुफान पाऊस बरसला आहे. रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून अजूनही राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार सुरु आहे. यामुळे आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज दिला असून पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यात मुसळधार
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होत आहे. तर मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस होताना दिसत आहे. रविवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने दैना उडवली असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह कोकणपट्ट्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.
राज्याला मुसळधार पावसाने झोडपले; मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र अतिमुसळधार पाऊस, आता पुढील 48 तास…
हिंगोली, अहिल्यानगरलाही पावसाने झोडपून काढले. हिंगालीत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने चार दिवसांपासून 10 गावांचा संपर्क तुटला, तर आष्टी-पाथर्डी तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला असून, 30 गावांचा संपर्क तुटला आहे. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 42 महसूल मंडळांपैकी 24 मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, आतापर्यंत अडीच लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत.