पुण्याला पावसाने झोडपले (फोटो- तेजस भागवत)
पुण्यात पावसाचे कमबॅक
मुसळधार पावसाला सुरुवात
वाहतुकीवर काही अंशी परिणाम
Maharashtra Rain Update: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत होते. दरम्यान आज अखेर पावसाने विश्रांतीपासून आराम घेतल्याचे दिसून आले. संध्याकाळच्या सुमारास पावसाने पुण्यानगरीत जोरदार हजेरी लावली आहे. गेले काही दिवस पावसाने पुण्यात विश्रांती घेतली होती.
पुणे शहरात गेले काही दिवस पावसाने उघडीप घेतली होती. तीन ते चार दिवस कडक ऊन पडल्याचे चित्र पुणे शहरात पाहायला मिळत होते. मात्र आज दुपारनंतर पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहर आणि उपनगर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.
पुणे शहरात सकाळपासूनच थोडेसे ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा यबंदज व्यक्त केला होता. आज दुपारनंतर पुण्यात पावसाला सुरुवात झाली. थोडाच वेळ झालेल्या पावसाचा जोर प्रचंड होता. जोरदार पावसाचा परिणाम पुण्यातील वाहतुकीवर देखील काही अंशी झाल्याचे पाहायला मिळाले.
राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने भंडारा जिल्ह्यासाठी १४ सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानुसार या काळात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय, विजा पडण्याची आणि जोरदार वाऱ्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा आपदा व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पावसामुळे वीज तारे तुटल्यास किवा वीज पुरवठा बाधित झाल्यास त्वरित कारवाई करण्यासाठी वीज विभागाला सतर्क ठेवण्यात आले आहे. तसेच, आरोग्य विभागालाही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अलर्टवर ठेवण्यात आले आहे. हवामान विभागानुसार येलो अलर्ट म्हणजे हवामानाच्या परिस्थितीमुळे संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. मात्र, घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. येलो अलर्ट संभाव्य जोखमीची सूचना देतो, ज्यामुळे लोक आपले कार्य आणि हालचाली काळजीपूर्वक करू शकतात.
राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. पुणे, ठाणे, रायगड, घाटमाथा भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे. यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणाला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने राज्यातील बरीचशी धरणे देखील पूर्ण क्षमतेने भरली आहेत.