पुण्यात मुसळधार पाऊस सुरू (फोटो- सोशल मीडिया/ट्विटर)
मध्यरात्रीपासून पुण्यात मुसळधार पाऊस
पुण्यात शाळांना सुट्टी जाहीर
नदीपात्र बंद झाल्याने वाहतुकीवर परिणाम
Pune Rain Update: पुणे जिल्ह्यात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीच्या सुमारास तर पुणे शहरासह उपनगरात विजा, गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासाह पाऊस झाला. पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. वरसगांव, पानशेत, टेमघर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. दरम्यान आज मुठा नदीपत्रात खडकवासला धरणातून १४ हजार ५४७ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला जात आहे.
पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागात पानी साचले आहे. काही ठिकाणी ढगफूटीसदृश पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हडपसर भागात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे. गरज असल्याच घराबाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पुढील काही तास अत्यंत महत्वाचे समजले जात आहेत. पुण्याला तीन तास ऑरेंज अलर्ट दिला आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असलेल्या विसर्गात सकाळी १० वा. १४ हजार ५४७ क्यूसेक करण्यात येत आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
– मोहन भदाणे उपविभागीय अभियंता,
मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट
पुढील तीन तास ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
पावसाचा परती प्रवास सुरु झाला असून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह पुण्यामध्ये आणि राज्यातील विविध भागांमध्ये काल सायंकाळपासून तुफान पाऊस बरसला आहे. रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून अजूनही राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार सुरु आहे. यामुळे आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज दिला असून पुढील तीन तास अत्यंत धोक्याची घंटा असल्याचे सूचवले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील काही तासांत वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने जोरदार वारेही वाहू शकतात. या काळात लोकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. विविध विभाग हे एक्शन मोडमध्ये आले आहे. काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे स्थानिकांना सुरक्षित जागी स्थलांतरित केले जात आहे.