Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; नारळाचे झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू, दोन महिला जखमी

अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी हरिभाऊ थोरात हे घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये गेले होते. त्याच वेळी शेजारील नारळाचे झाड उन्मळून पडले आणि झाडासह पत्र्याचा काही भाग त्यांच्या अंगावर कोसळला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 03, 2026 | 11:08 AM
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; नारळाचे झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू, दोन महिला जखमी

आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; नारळाचे झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू, दोन महिला जखमी

Follow Us
Follow Us:

मंचर : चांडोली बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी गारांच्या पावसाने चांडोली बुद्रुक परिसरात मोठी दुर्घटना घडली. घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये आश्रयासाठी गेलेल्या ७० वर्षीय शेतकरी हरिभाऊ रघुनाथ थोरात यांच्यावर नारळाचे झाड कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली गेली. दुसऱ्या घटनेत, सुलाबाई काशिनाथ सुकाळे (वय ७५) व शांता अर्जुन थोरात (वय ५५) या दोन महिला जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी हरिभाऊ थोरात हे घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये गेले होते. त्याच वेळी शेजारील नारळाचे झाड उन्मळून पडले आणि झाडासह पत्र्याचा काही भाग त्यांच्या अंगावर कोसळला. गंभीर जखमी झालेल्या हरिभाऊ थोरात यांनी मदतीसाठी आर्त हाक दिली. त्यांचा आवाज ऐकताच परिसरातील शेतकरी धावत घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू केले. कुऱ्हाडीच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या तोडून आणि पत्रे बाजूला करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, जवळपास अर्धा तास चाललेल्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाची शवविच्छेदन करण्यात आले.

मान्सूनबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; यंदाचा मान्सून कमकुवत राहणार, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार

दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा परिषद सदस्या प्रीती प्रवीण थोरात, बाजार समिती संचालक संदीप थोरात, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रवीण थोरात पाटील, पोलीस पाटील सुजाता थोरात, सामाजिक कार्यकर्ते अक्षय खरमाळे यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. हरिभाऊ थोरात यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, सून व नातवंडे असा परिवार आहे.

चांडोली गावाचे मोठे नुकसान

“हरिभाऊ थोरात हे कष्टाळू, मनमिळावू आणि सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अकाली निधनाने चांडोली गावाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी असून, संपूर्ण गाव त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे,” असे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप थोरात यांनी सांगितले.

यंदाचा मान्सून कमकुवत राहणार

भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या २०२६ च्या नैऋत्य मोसमी पावसाच्या अद्ययावत दीर्घकालीन अंदाजानुसार, यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात देशभरातील पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ९० टक्के राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून, सरासरीपेक्षा कमी मान्सूनची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अंदाजात चार टक्के त्रुटीची मर्यादाही नमूद करण्यात आली आहे.

Web Title: Heavy rains and gusty winds lash ambegaon taluka elderly man dies after coconut tree collapses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Ambegaon taluka
  • heavy rains
  • Rain News

संबंधित बातम्या

जून महिन्याची ‘थकबाकी’ भरून काढतोय जुलैचा पाऊस; केवळ एका दिवसातच 152.5 मिमी पावसाची नोंद
1

जून महिन्याची ‘थकबाकी’ भरून काढतोय जुलैचा पाऊस; केवळ एका दिवसातच 152.5 मिमी पावसाची नोंद

देशातील अनेक राज्यांत पावसाचा जोर कायम; उत्तर प्रदेशातील 63 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट जारी
2

देशातील अनेक राज्यांत पावसाचा जोर कायम; उत्तर प्रदेशातील 63 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.