Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकवीरा आईच्या गडावर मधमाशांचा हल्ला; भाविकांनी जीव मुठीत धरुन काढला पळ, VIDEO व्हायरल

नवीन वर्षाला आशिर्वाद घेण्यासाठी आई एकवीरा गडावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र गडावर पालखी आणलेल्यांनी फटाके वाजवल्यामुळे मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 02, 2025 | 12:50 PM
Honey Bees attack devotees at Ekveera Aai Karla fort maval pune news update

Honey Bees attack devotees at Ekveera Aai Karla fort maval pune news update

Follow Us
Close
Follow Us:

कार्ला : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रावर मोठी गर्दी झाली होती. कार्ला येथील वेहरगाव एकवीरा गडावर नववर्षारंभाच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. एकवीरा आईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, काही भाविकांच्या खोटसाळपणामुळे अनेक भाविकांना त्रास सहन करावा लागला आहे. काही अतिउत्साही भाविकांनी मंदिराच्या आवारामध्ये मनाई असतानाही मंदिराजवळ रंगीत धुराचे फटाके फोडले. या रंगीत धुराच्या फटाक्यांमुळे मधमाशांच्या पोळ्यांना इजा पोहोचल्याने मधमाशांनी संतप्त होऊन भाविकांवर हल्ला केला. एकवीरा आईच्या मंदिराबाहेर भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला असून याचा व्हिडिए देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोणावळ्यातील एकवीरा गडावर नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी कार्ला गडावर गर्दी केली होती. यावेळी देवीची पालखी देखील काढण्यात आली. दरम्यान, काही हुल्लडबाज भाविकांनी फटाके फोडल्याने देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच काही भाविक जखमी झाले आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गडावर एकच गोंधळ उडाला, आणि अनेक भाविकांना मधमाश्यांनी चावा घेतला. अचानक झालेल्या या हल्ल्यामध्ये घेतल्याने ते जखमी झाले. यात चेंगराचेंगरी झाल्याने 20 ते 25 भाविक जखमी झाले. या सर्व भाविकांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मधमाशींचा हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या भाविकांना तातडीने एकविरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. मधमाशी हलल्यामध्ये जखमी झालेल्या भाविकांमध्ये महिला आणि  लहान मुलांचाही समावेश आहे.

मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी घेऊन आलेल्या भाविकांपैकी काहींनी हे फटाके वाजवले, ज्यामुळे इतर भाविकांनाही त्रास सहन करावा लागला. या आधीपासूनच एकविरा गडावर फटाके वाजविण्यास बंदी आहे, परंतु तरीही काही भाविक या नियमांकडे दुर्लक्ष करतात.या घटनेनंतर ग्रामस्थांनी गडावरील फटाक्यांवरची बंदी अधिक कडक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. कार्ला येथील ग्रामस्थ अशोक कुटे यांनी याबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे.

व्हायरल न्यूज वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी देखील या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उपद्रवी काही भाविकांमुळे इतर भाविकांना देखील त्रास झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी जखमी भाविकांची विचारपूस केली आहे. तसेच फटाके वाजवण्याबाबत पूर्ण बंदी असावी अशी देखील मागणी केली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नागरिक जीव वाचवून पळत असलेले दिसत आहे. तर काही भाविक खाली वाकून मधमाशांच्या हल्ल्या पासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर महिला भाविकांनी डोक्यावर पदर घेतले आहेत.

Web Title: Honey bees attack devotees at ekveera aai karla fort maval pune news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • maval news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.