Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: दोन दिवस महाभयंकर संकट! कोकणात धुमशान तर घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार…

पुणे शहरात बुधवारी दिवसभर ऊन आणि हलक्या सरींचा खेळ सुरू होता. काही भागांत हलका ते अतिहलका पाऊस पडला. शहराचे कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 29, 2026 | 08:31 PM
Maharashtra Rain Alert: दोन दिवस महाभयंकर संकट! कोकणात धुमशान तर घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार…
Follow Us
Follow Us:

कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रावर कायम
राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज
विदर्भातील तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

पुणे/सुनयना सोनवणे: उत्तर ओडिशा व लगतच्या दक्षिण झारखंड-छत्तीसगड परिसरावरील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी (ता.२९) सकाळी मध्य छत्तीसगड व लगतच्या उत्तर ओडिशावर केंद्रित असून, त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर कायम आहे. तसेच मान्सून द्रोणी (ट्रफ) या कमी दाबाच्या केंद्रातून पुरीमार्गे बंगालच्या उपसागराच्या मध्यभागापर्यंत विस्तारली आहे. या प्रणालीमुळे राज्यातील बहुतांश भागांत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने या चारही विभागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वारे वाहण्याचाही इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, घाटमाथा परिसरात पुढील दोन दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने तेथेही ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.

Rain Alert: पुण्याचा नाद नाही करायचा! जुलैमध्ये पावसाची विक्रमी नोंद; तब्बल 119 वर्षांनंतर….

पुणे शहरात बुधवारी दिवसभर ऊन आणि हलक्या सरींचा खेळ सुरू होता. काही भागांत हलका ते अतिहलका पाऊस पडला. शहराचे कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गुरुवारी (ता.३०) शहरात आकाश पूर्णपणे ढगाळ राहण्याची शक्यता असून हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पुणे जिल्ह्यातील पावसाची नोंद

गिरिवन – १०.५ मिमी
कुरवंडे – ९.५ मिमी
भोर – ८.० मिमी
माळीण – ५.५ मिमी
निमगिरी – ४.० मिमी
चिंचवड – १.० मिमी

Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट! ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस; खडकवासला धरणातून…

शिरूर – ०.५ मिमी
तळेगाव – ०.५ मिमी
दापोडी – ०.५ मिमी
हडपसर – ०.५ मिमी
पाषाण – ०.४ मिमी

Web Title: Imd alert to hevay rainfall in ghatmatha kokan vidarbha and all maharashtra latest westher updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • Heavy Rainfall
  • IMD alert of maharashtra
  • weather updates

संबंधित बातम्या

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना…
1

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना…

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस
2

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.