राज्यात पावसाचा जोर वाढणार (फोटो- ai gemini)
#SatarkAlert #HeavyRain
२३ जुलै; १८:३५ (पुढील ६ तास)
• संततधार पावसासह मुसळधार सरी. जिल्हे: पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा राज्य | घाट आणि लगतचा पूर्व भाग- नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.
• घाट रस्त्यांनी प्रवास करताना काळजी घ्यावी. pic.twitter.com/AqzTna8bME — satark (@satarkindia) July 23, 2026
खडकवासला धरणात १.७५ टीएमसी (८८.५२ टक्के), वरसगाव धरणात ९.११ टीएमसी (७१.०५ टक्के), पानशेत धरणात ८.१४ टीएमसी (७६.४४ टक्के) आणि टेमघर धरणात २.०३ टीएमसी (५४.६८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच, पवना धरणात ७.८३ टीएमसी (९२.०१ टक्के) आणि मुळशी धरणात १६.८९ टीएमसी (८३.८१ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, सकाळी ६ वाजेपर्यंत कोणत्याही धरणातून सांडवा अथवा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू नव्हता.
Wardha : पावसाची सर्वदूर संततधार ! आणखी २ दिवस बरसणार; शुक्रवारीही ‘यलो अलर्ट’चा इशारा
खडकवासला धरण ९५ टक्के भरले
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा गुरुवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजेपर्यंत ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता असल्याने पाटबंधारे विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. हवामान आणि पर्जन्यमानाचा अंदाज लक्षात घेता धरण अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता असल्याने आवश्यकतेनुसार सांडव्यावरून पाणी सोडण्यात येणार आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढणार
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुहडील कह इवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 25 ते 26 जुलै महिन्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पुणे, सातारा, पालघर आणि घाटमाथ्यावर पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तानसा,विहार, तुळशी तलाव तुडुंब भरले. तलावांत एकूण ६१.९० टक्के जलसाठा
#खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून आज रात्री ९.३० वाजता #मुठानदी पात्रामध्ये सुरु असलेल्या ३ हजार ८२५ क्युसेकमध्ये वाढ करुन ९ हजार ४०५ क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरु नये, खबरदारी घ्यावी-जिल्हा प्रशासन — DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 23, 2026
पुढील 6 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये संततधार पुस आणि मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घाट आणि आणि लगतचा पूर्व भाग- नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये पण पावसाचा अंदाज आहे. घाट रस्त्यांनी प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






