Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आवश्यकता भासल्यास ‘Operation Sindoor…”; लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींचा शत्रूराष्ट्रांना थेट इशारा

युद्धातील बदलत्या गरजांचा उल्लेख करताना त्यांनी 'प्रत्येक जवानाकडे ड्रोन' ही संकल्पना मांडली. भविष्यात प्रत्येक सैनिकाला ड्रोन हाताळणे, त्यांचे संचालन करणे आणि ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 30, 2026 | 07:19 PM
“आवश्यकता भासल्यास ‘Operation Sindoor…”; लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींचा शत्रूराष्ट्रांना थेट इशारा
Follow Us
Follow Us:

ऑपरेशन सिंदूर 2.0 साठी भारतीय सेना सज्ज 
दोन ते तीन वर्षांत ‘थिएटर कमांड’ची अंमलबजावणी
तिन्ही सैन्यदलांच्या संयुक्त कारवाईसाठी नवी रचना

पुणे/सुनयना सोनवणे: तिन्ही सैन्यदलांमध्ये (Operation Sindoor) अधिक प्रभावी समन्वय साधण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ‘थिएटर कमांड’च्या उभारणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, यासंदर्भातील सविस्तर अहवाल संरक्षण मंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. विविध स्तरांवर त्याचे पुनरावलोकन सुरू असून, येत्या दोन ते तीन वर्षांत देशात ‘थिएटर कमांड’ची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल, असा विश्वास लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी व्यक्त केला.

खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १५० व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शनिवारी (ता.३०) ते बोलत होते. यावेळी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल संदीप जैन, एनडीएचे कमांडंट व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी आणि उपकमांडंट एअर व्हाइस मार्शल राजेश वर्मा उपस्थित होते.

द्विवेदी म्हणाले की, ‘थिएटरायझेशन’संदर्भातील सर्व चर्चा ‘चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी’मध्ये पूर्ण झाल्या आहेत. नव्या व्यवस्थेत सैन्यदल प्रमुखांकडे दलांची उभारणी, प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धीची जबाबदारी राहील, तर प्रत्यक्ष लष्करी कारवाया आणि संयुक्त मोहिमांचे नेतृत्व थिएटर कमांडरकडे असेल. तिन्ही दलांच्या हितांचा विचार करून हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, अधिक समन्वयासाठी काही प्रमाणात तडजोडीची भूमिकाही घ्यावी लागणार आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’बाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सध्या युद्धबंदी असली तरी हे अभियान संपलेले नाही. आवश्यकता भासल्यास ‘ऑपरेशन सिंदूर २.०’साठी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल पूर्णपणे सज्ज आहेत. आधुनिक युद्धक्षेत्र अधिक पारदर्शक झाले असून, प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य होत असल्याने जवानांची तैनाती आणि सीमावर्ती नागरिकांच्या सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर 
भविष्यातील युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरते मर्यादित राहणार नसून अंतराळ, सायबर आणि ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’ हीदेखील महत्त्वाची रणांगणे ठरणार असल्याचे द्विवेदी यांनी नमूद केले. ‘अश्नी ड्रोन बटालियन्स’, ‘दिव्यास्त्र बॅटरी’, ‘शक्तिमान रेजिमेंट्स’ आणि ‘भैरव बटालियन्स’ यांसारख्या तंत्रज्ञानाधारित नव्या संरचना उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. डीआरडीओ, उद्योग क्षेत्र, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने स्वदेशी तंत्रज्ञान युद्धसज्ज क्षमतांमध्ये रूपांतरित करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

युद्धातील बदलत्या गरजांचा उल्लेख करताना त्यांनी ‘प्रत्येक जवानाकडे ड्रोन’ ही संकल्पना मांडली. भविष्यात प्रत्येक सैनिकाला ड्रोन हाताळणे, त्यांचे संचालन करणे आणि ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी एनडीएच्या अभ्यासक्रमातही ड्रोन प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रीय सुरक्षेत महिलांची वाढती भूमिका –
राष्ट्रीय सुरक्षेत महिलांचा वाढता सहभाग हा बदलत्या भारताचा महत्त्वपूर्ण चेहरा असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले. लष्कराचे कार्य केवळ युद्धापुरते मर्यादित नसून सीमा सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, दुर्गम भागातील नागरिकांना मदत आणि ‘आर्मी गुडविल स्कूल’च्या माध्यमातून समाजघडणीतही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘थिएटर कमांड’ म्हणजे काय?
लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्या संयुक्त कारवायांसाठी एकात्मिक कमांड व्यवस्था उभारण्याची संकल्पना म्हणजे ‘थिएटर कमांड’. या व्यवस्थेत तिन्ही दलांचे मनुष्यबळ, शस्त्रसामग्री, दळणवळण, वाहतूक, रसद व देखभाल यांचे एकत्रित नियोजन केले जाईल. प्रत्येक थिएटर कमांडला विशिष्ट भौगोलिक क्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी दिली जाईल, ज्यामुळे युद्धकाळातील निर्णयप्रक्रिया आणि कारवाई अधिक वेगवान व प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.

 

Web Title: Indian army chief upendra dwiwedi said operation sindoor 2 o nda passing paradae pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • indian army
  • Operation Sindoor
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी
1

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी
2

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी

Amit Thackeray : मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा; चतु:शृंगी पोलिसांचा तपास सुरू
3

Amit Thackeray : मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा; चतु:शृंगी पोलिसांचा तपास सुरू

यंदा गणेशोत्सवात डीजे बंदी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे पुण्यातून मोठे वक्तव्य; ‘सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा’
4

यंदा गणेशोत्सवात डीजे बंदी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे पुण्यातून मोठे वक्तव्य; ‘सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.