Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Shahu Maharaj: शाहू महाराजांच्या न्यायनिवाड्याचा साक्षीदार जोगवडीचा भोसले घराणा; 1733 चा ताम्रपट आजही जपला

Chhatrapati Shahu Maharaj: जोगवडीतील भोसले घराण्याने जपलेला ऐतिहासिक वारसा मराठा इतिहासाच्या महत्त्वपूर्ण पाऊलखुणांची साक्ष देतो. छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील 1733 चा ताम्रपट, न्यायनिवाड्याशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ आणि सुपा परगण्यातील भोसले घराण्याची जबाबदारी या माध्यमातून या घराण्याचा इतिहास समोर येतो.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 26, 2026 | 05:28 PM
शाहू महाराजांच्या न्यायनिवाड्याचा साक्षीदार जोगवडीचा भोसले घराणा; 1733 चा ताम्रपट आजही जपला

शाहू महाराजांच्या न्यायनिवाड्याचा साक्षीदार जोगवडीचा भोसले घराणा; 1733 चा ताम्रपट आजही जपला

Follow Us
Follow Us:
  • जोगवडीत इतिहासाच्या पाऊलखुणा
  • छत्रपती शाहू महाराज ते सुपा परगणा
  • जोगवडीच्या भोसले घराण्यात दडला शिवकालीन इतिहासाचा अनमोल ठेवा
अमोल तोरणे, बारामती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या इतिहासात भोसले घराण्याचे योगदान सर्वश्रुत आहे. मात्र याच भोसले घराण्याची बारामती तालुक्यातील जोगवडी शाखा आजही इतिहासाच्या मुख्य प्रवाहापासून काहीशी दूर राहिली आहे. मालोजी राजे भोसले यांच्या काळापासून सुपा परगण्याशी जोडलेल्या विठोजीराजे भोसले या घराण्यातील वंशज बारामती तालुक्यातील जिरायती भागात असलेल्या जोगवडी या गावात आज वास्तव्यास आहेत. इतिहासात छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या न्यायनिवाड्याची महत्त्वपूर्ण नोंद आहे.(Chhatrapati Shahu Maharaj)

सुपा परगणा पूर्वी भोसले घराण्याच्या अखत्यारित होता. पुढे शहाजीराजांनी त्याचा कारभार संभाजी बाजी मोहिते यांच्याकडे सोपविला. स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनीही सुपा परगण्याच्या कारभाराकडे लक्ष दिले. याच ऐतिहासिक परंपरेत जोगवडी गावची पाटीलकी राजजी भोसले यांच्या घराण्याकडे होती.

वणीत राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचा धडाका; अनधिकृत बांधकामांवर कारवाई

होळीच्या सणाला पोळी बांधण्याचा मान

राजजी भोसले, साखरोजी भोसले आणि खेलोजी भोसले यांच्यात पाटीलकी व जमिनीच्या हक्कावरून वाद निर्माण झाला. हा वाद थेट सातारा दरबारात छत्रपती शाहू महाराजांसमोर गेला. उपलब्ध सवाल-जवाबाच्या कागदपत्रांनुसार शाहू महाराजांनी पुरावे तपासून राजजी व साखरोजी यांना जोगवडीची पाटीलकी कायम केली. तसेच साडेसात चावर जमिनीपैकी दीड चावर खेलोजींना, तर उर्वरित सहा चावरांपैकी तीन-तीन चावर राजजी व साखरोजी यांना देण्याचा न्यायनिवाडा केला. होळीच्या सणाला पोळी बांधण्याचा मान राजजी भोसले यांना देण्यात आला.

या न्यायनिवाड्याची सनद ताम्रपटाच्या स्वरूपात देण्यात आली. विशेष म्हणजे इ.स. १७३३ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला हा ताम्रपट जोगवडीच्या भोसले घराण्याकडे होता. सवाल-जवाबाची कागदपत्रेही उपलब्ध आहे. छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले हे देखील या कुटुंबाशी वात्सल्य जपतात.

शिवकालीन पुरातन वस्तु

विठोजीराजे भोसले हे सातारा गादीच्या वतीने सुपा परगण्याचे प्रमुख म्हणून कारभार पाहत असल्याची माहिती देण्यात आली. आजही त्यांच्या घराण्याकडे होळीला पोळी बांधण्याचा पारंपरिक मान आहे. या घराण्यातील सध्याच्या पिढीतील व्यवसायाने उद्योजक असलेले सुनील राजे भोसले शेती उपयोगी यंत्रसामग्री निर्मितीच्या माध्यमातून कार्यरत आहेत.त्यांंचे चिरांजीव अमितराजे भोसले ही नवी पिढी आपल्या कुटुंबाचा ऐतिहासिक वारसा जपत आहे. त्यांनी आपल्या ऐतिहासिक घराण्याविषयी सविस्तर माहिती दैनिक नवराष्ट्रशी बोलताना दिली. त्यांच्याकडे शिवकालीन पुरातन वस्तूही आहेत. ताम्रपटाच्या सुरक्षितता व संवर्धनाच्या दृष्टीने तो प्रत्यक्ष दाखवला जात नसला तरी त्याचे छायाचित्र उपलब्ध आहे.

शिवकालीन परंपरा, शाहू महाराजांचा न्याय आणि चारशे वर्षांच्या इतिहासाच्या खुणा जपणाऱ्या जोगवडीच्या भोसले घराण्याचा हा वारसा संशोधक व इतिहासप्रेमींसाठी महत्त्वाचा ठेवा आहे. या दुर्लक्षित इतिहासाचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण होणे गरजेचे आहे.

Mumbai News: ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन

Web Title: Jogwadi bhosale family shahu maharaj 1733 tamrapat supa pargana maratha history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर
1

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी
2

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
3

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
4

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.