
खडकवासला धरण साखळीत टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला अशा 4 धरणांचा समावेश होतो. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याची माहिती समोर येत आहे. धरणसाखळीत 28 टीएमसीच्या जवळपास पाणीसाठा जमा झाला असल्याचे समजते आहे. त्यामुळे खडकवासलामधून विसर्ग सुरू आहे.
भरलं रे भरलं! पुण्यावर वरुणराजाची अथांग कृपा! Khadakwasla धरणाच्या कालव्यातून थेट…
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून जवळपास 29 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. धरणसाखळीत गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाल्याचे म्हटले जात आहे.
मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केला गेला आहे. त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुठा नदीपात्रात काही गाड्या देखील पाण्यात अडकल्या असल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध असा भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे. शहरात पावसाने विश्रांती घेतली असल्याचे दिसून येत आहे. मात्र धरणसाखळी परिसरात पाऊस सुरू असल्याचे समोर येत आहे. धरणसाखळीत पाण्याची आवक सुरू असल्याने विसर्ग सुरू केला गेला. पाण्याची आवक लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग कमी किंवा जास्त केला जाणार आहे.
खडकवासला धरणातून विसर्गात मोठी वाढ; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार पुढील काळात विसर्गात पुन्हा वाढ अथवा घट केली जाऊ शकते, असेही कार्यकारी अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाने नागरिकांना मुठा नदीपात्रात अथवा नदीकाठच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदीपात्रात जनावरे, वाहने किंवा अन्य साहित्य असल्यास ते तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.