Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune: गणेश विसर्जनात ‘१०८’ची आपत्कालीन सेवा कुठे अडकली? महिला पत्रकारासाठी रुग्णवाहिका मिळवताना धावपळ

Pune Ganpati: राज्य शासनाने अपघात, हृदयविकाराचा झटका यांसह वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी २०१४ मध्ये डायल १०८ सेवा सुरू केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 27, 2026 | 02:35 AM
pune ganesh visarjan

pune ganesh visarjan

Follow Us
Follow Us:
  • डायल १०८वर फोन, तरी रुग्णवाहिकेसाठी दीड तासांची प्रतीक्षा
  • गणेश विसर्जन मिरवणुकीतील नियोजनाचा फटका
  • नवी पेठेतील प्रकाराने आपत्कालीन सेवेवर प्रश्नचिन्ह
सुनयना सोनवणे /Pune Ganpati: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरळीत राहावी, यासाठी मिरवणूक मार्गावर डायल १०८च्या रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री नवी पेठ परिसरात प्रकृती अचानक बिघडलेल्या महिला पत्रकाराला रुग्णवाहिका मिळविताना नागरिकांना धावपळ करावी लागली. डायल १०८वर वारंवार संपर्क करूनही सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही. संपर्क झाल्यानंतरही (pune) रुग्णवाहिका मिळण्यासाठी बराच वेळ लागला. त्यानंतर संपर्क झालेल्या डॉक्टरांनी घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल दीड तास लागेल, असे सांगितल्याने आपत्कालीन सेवेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

शुक्रवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास नवी पेठेत एका महिला पत्रकाराला अचानक पोटदुखी, चक्कर आणि घाम येण्याचा त्रास सुरू झाला. सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने डायल १०८वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीन ते चार वेळा फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा संपर्क साधल्यानंतर ऑपरेटरने फोन घेतला; मात्र रुग्णवाहिकेशी संपर्क करून देण्याच्या प्रक्रियेत सुमारे १० ते १५ मिनिटे फोन प्रतीक्षेत ठेवण्यात आला.

पहिले पाढे पंचावन्न! जनजागृती, बैठका, आंदोलने तरीही पुण्यात DJ चा आवाज १२ डेसिबलने वाढला; लक्ष्मी रस्त्यावरील…

अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिका न आल्याने अखेर संबंधित महिलेला दुचाकीवरून जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, डायल १०८च्या ऑपरेटरने पुन्हा संपर्क साधून नवी पेठेजवळील टिळक चौकातील रुग्णवाहिकेऐवजी शनिपार परिसरातील रुग्णवाहिकेतील डॉक्टरांशी संपर्क करून दिला. या डॉक्टरांनी घटनास्थळी पोहोचण्यासाठी दीड तास लागेल, असे सांगितले. तसेच तपासणीसाठी येताना दोन पोलिस कर्मचारी सोबत असणे आवश्यक असल्याचेही सांगितले.

राज्य शासनाने अपघात, हृदयविकाराचा झटका यांसह वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी २०१४ मध्ये डायल १०८ सेवा सुरू केली. पुण्यात या सेवेच्या ८२ रुग्णवाहिका असून, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर त्यापैकी काही रुग्णवाहिका मिरवणूक मार्गावर तैनात करण्यात आल्या होत्या. शहराच्या हद्दीत नागरिकांचा फोन आल्यानंतर साधारण २० मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचणे अपेक्षित आहे.

तुडुंब, तुडुंब नुसती गच्च भरली! गणेशोत्सवात Pune Metro मालामाल; 12 दिवसांत तब्बल 7 कोटी…

चौकशी करण्यात येईल

‘पुण्यात डायल १०८च्या ८२ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी काही रुग्णवाहिका गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर तैनात होत्या. टिळक चौकातही रुग्णवाहिका तैनात होती. या घटनेत रुग्णवाहिकेशी संपर्क का होऊ शकला नाही, तसेच नेमके काय घडले, याची चौकशी करण्यात येईल.’
– डॉ. विजय ताते, जिल्हा व्यवस्थापक, डायल १०८

Web Title: Lady journalist medical emergency pune 108 ambulance delay in pune ganesh visarjan 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Ambulance
  • pune ganpati
  • pune news

संबंधित बातम्या

पुणेकरांचे प्रचंड हाल! प्रशासन बेफिकीर? 35 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने नियोजनावर उठले गंभीर प्रश्न
1

पुणेकरांचे प्रचंड हाल! प्रशासन बेफिकीर? 35 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने नियोजनावर उठले गंभीर प्रश्न

पहिले पाढे पंचावन्न! जनजागृती, बैठका, आंदोलने तरीही पुण्यात DJ चा आवाज १२ डेसिबलने वाढला; लक्ष्मी रस्त्यावरील…
2

पहिले पाढे पंचावन्न! जनजागृती, बैठका, आंदोलने तरीही पुण्यात DJ चा आवाज १२ डेसिबलने वाढला; लक्ष्मी रस्त्यावरील…

Ganesh Visarjan 2026: थायलंडच्या पर्यटकांनी केली बाप्पाची आरती; गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्याने परदेशी पाहुणे भारावले
3

Ganesh Visarjan 2026: थायलंडच्या पर्यटकांनी केली बाप्पाची आरती; गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्याने परदेशी पाहुणे भारावले

तुडुंब, तुडुंब नुसती गच्च भरली! गणेशोत्सवात Pune Metro मालामाल; 12 दिवसांत तब्बल 7 कोटी…
4

तुडुंब, तुडुंब नुसती गच्च भरली! गणेशोत्सवात Pune Metro मालामाल; 12 दिवसांत तब्बल 7 कोटी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.