Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रकिया अत्यंत वेगात सुरु; मोबदला लवकरच जाहीर होणार

भूसंपादन प्रक्रियेचा नोटीस आणि त्यावरील हरकती हा मुद्दा आता जवळपास पूर्ण झाला असून पुढील काळात आता महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत विभागाच्या सहाय्याने थेट बांधावरील सर्व्हे करण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 05, 2025 | 02:35 AM
Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रकिया अत्यंत वेगात सुरु; मोबदला लवकरच जाहीर होणार
Follow Us
Close
Follow Us:

संभाजी महामुनी /सासवड: पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेची भूसंपादन प्रकिया अत्यंत वेगात सुरु आहे. यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांना वेळोवेळी नोटीस पाठवून एक एक भूसंपादन प्रक्रियेचा टप्पा पूर्ण केला आहे. मागील आठवड्यात शेतकऱ्यांच्या हरकतीवरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता शेतकऱ्यांशी चर्चा करून बांधावरील सर्व्हे करण्यात येणार आहे. त्याच बरोबर संपूर्ण शेतकऱ्यांचे ज्याकडे लक्ष लागले आहे ,तो म्हणजे विमानतळ जागेचा मोबदला काय असेल ? त्याच उत्तर लवकरच मिळणार असून येत्या आठवडाभरात मोबदला जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी अशा सात गावांमध्ये २०२८ मध्ये शासनाने विमानतळ प्रकल्प जाहीर केला. त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी आज पर्यंत या प्रकल्पास कडवा विरोध केला आहे. वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने, निषेध मोर्चे, निवेदने अशा मार्गाने विमानतळ प्रकल्पाला विरोध करतानाच शासनाचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांचा प्रकल्पाला कडवा असल्याने महाविकास आघाडी सरकारने प्रकल्पाची जागा बदलून याच परिसरातील नायगाव, पिसर्वे, राजुरी, पांडेश्वर आणि बारामती तालुक्यातील काही गावात करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या होत्या.

Purandar Airport : विमानतळ भूसंपादनबाबतच्या हरकतींवर ‘या’ तारखेपासून होणार सुनावणी

मात्र महाविकास आघाडी सरकार जाऊन पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होताच पुन्हा पूर्वीच्याच जागेवर प्रकल्प करण्याचे जाहीर केले. त्याच बरोबर काही दिवसांतच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरंदरला दोन वेळ जाहीर सभा घेवून प्रकल्प लवकरच मार्गी लावण्याचे जाहीर केले होते. तर जेजुरी येथील शासन आपल्या दारी उपक्रमात तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांनीही विमानतळ प्रकल्पाबाबत संजय जगताप आणि विजय शिवतारे यांनी एकत्र यावे असे आवाहन केले होते.

विमानतळ जागेचे भूसंपादन प्रक्रिया अनेक वर्षे रखडल्याने याबाबत विमानतळ प्रकल्प होणार कि नाही ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतु लोकसभा निवडणूक झाल्यानंतर केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रथम विमानतळ प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे सांगून चर्चेला प्रथम तोंड फोडले होते. त्यानंतर काही दिवसांतच विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि महायुतीचे सरकार स्थापन होवून मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस येताच पुन्हा विमानतळ प्रकल्पाने वेग घेतला. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आजही कायम असल्याने पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी मात्र याबाबत गेली अनेक दिवसापासून बोलण्याबाबत मौन पाळले असले तरी वरिष्ठ पातळीवर त्यांचा पाठपुरवा सुरूच आहे.

दरम्यान काही दिवसापूर्वी शासनाने प्रकल्प बाधित गावात जाऊन ड्रोन द्वारे सर्व्हे करण्याचा प्रायत्न केला होता. मात्र शेतकऱ्यांनी कडवा विरोध करून शासनाचा प्रयत्न हाणून पाडला. त्याचवेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या जोरदार लाठीहाल्ल्यानंतर ड्रोनसर्व्हे रद्द करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. मात्र त्यानंतर काही दिवसांत भूसंपादन प्रक्रियेला वेगळ्या मार्गाने सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांची मते अजमावून घेण्यासाठी गागोवावी जाऊन बैठका घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी बैठकांना विरोध दर्शवला. त्यानंतर विमानतळ प्रकल्पासाठी जागेचे संपादन का करण्यात येवू नये अशा प्रकारच्या नोटीस शेतकऱ्यांना पाठवून देण्यात आल्या.

एकीकडे शेतकऱ्यांचा जाहीर विरोध असताना पुन्हा नोटीस पाठवून त्यांना म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले. त्यावेळी विरोध असताना पुन्हा जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनीवरील सातबारा उतारावर पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन अशा प्रकारचे शेरे मारण्यात आले. तसेच यावर हरकती देण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला. याकाळात शेतकऱ्यांनी दोन हजार पेक्षा जास्त हरकती दाखल केल्या. त्यावर पुन्हा सुनावणी घेण्यात आली. त्यामध्येही शेतकऱ्यांनी प्रकल्पाला विरोध दर्शवला. मात्र शासनाची शेतकऱ्यांना नोटीस आणि त्यावरील सुनावणी केवळ कागदोपत्री खेळ ठरला असून शासनाने पुढील रणनीती सुरूच ठेवली आहे.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाचा वाद विकोपाला; प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

भूसंपादन प्रक्रियेचा नोटीस आणि त्यावरील हरकती हा मुद्दा आता जवळपास पूर्ण झाला असून पुढील काळात आता महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत विभागाच्या सहाय्याने थेट बांधावरील सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांशी पुन्हा एकदा चर्चेची फेरी सुरु करण्यात येत आहे. मात्र हि प्रक्रिया सुद्धा केवळ कागदोपत्री दिखावा ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांनी कितीही विरोध केला तरी विविध माध्यमातून शासनाने शेतकऱ्यांची बऱ्यापैकी माहिती जमा केली आहे. यावर आता वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून यामध्ये पुरंदर विमानतळ हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला जाण्याची शकयता आहे. विशेष म्हणजे याबाबत आधीच निर्णय घेण्यात आला असून जाहीर करण्याची औपचारीकता बाकी आहे. कारण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहिती नुसार येत्या आठ दिवसात विमानतळासाठी देण्यात येणारा मोबदला जाहीर करण्याची शक्यता आहे. तो जाहीर करण्यापूर्वी विधिमंडळात चर्चा घडवून आणली जात असून त्यादृष्टीने कामकाज सुरु आहे. अधिवेशनाच्या अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा यावर चर्चा होवून निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे गेली अनेक दिवसापासून संपूर्ण राज्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर येत्या आठवडाभरात मिळू शकते. याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Land acquisition process for purandar airport begins at rapid pace compensation to announced soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Purandar
  • Purandar Airport
  • Saswad

संबंधित बातम्या

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…;  150 कर्मचारी तैनात
1

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…; 150 कर्मचारी तैनात

Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित जमिनीच्या मोजणीस सुरुवात; शेतकऱ्यांना अश्रू…
2

Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित जमिनीच्या मोजणीस सुरुवात; शेतकऱ्यांना अश्रू…

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या कामाला आला वेग; 20 ऑक्टोबरपर्यंत…
3

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या कामाला आला वेग; 20 ऑक्टोबरपर्यंत…

Laxman Hake: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ निरा बंद 
4

Laxman Hake: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ निरा बंद 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.