पुणे: राज्य मंडळामार्फत यंदा राज्यभरात अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय, ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार दि. २६ मे पासून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. तसेच पहिल्या नियमित फेरीची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी ८ जूनला जाहीर होणार आहे.अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख मंगळवारी ३ जूनला फक्त, दोन दिवस बाकी आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनी लवकर अर्ज सादर करण्याचे आव्हान शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. अकरावी प्रवेशासाठी राज्यातून आतापर्यंत १० लाख ३३२ विद्याध्यर्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. पहिल्या नियमित फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना मंगळवारपर्यंत अर्ज करता येणार आहे.
संपूर्ण राज्यातून १०,००,३३२ विद्यार्थ्यांची नोंदणी.
तर पुणे विभागात
पुणे जिल्हा ९४ हजार २४३
अहिल्यानगर जिल्हा ३९ हजार ७५९
सोलापूर जिल्हा ३० हजार ९८१
पुणे विभागात एकूण १ लाख ६४ हजार ९८३
सेवानिवृत्त शिक्षिकेचा ‘डिजिटल अरेस्ट’; IPS विश्वास नांगरे पाटलांचे नाव घेऊन ८३ लाखांची फसवणूक
तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी ५ जून रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर दोन दिवस तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी याबाबत हरकती नोंदविता येईल. अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी ८ जून रोजी जाहीर केले जाणार आहे. त्याआधारे विद्यार्थी आणि महाविद्यालय निवड / वाटप प्रक्रिया पार पडेल. प्रवेशासाठी महाविद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी १० जून रोजी जाहीर होईल. प्रवेश घेणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, प्रवेश नाकारणे आणि प्रवेश रद्द करणे ही प्रक्रिया – ११ ते १८ जून दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे.
– कनिष्ठ महाविद्यालये ९,३४३
– नोंदणी केलेले विद्यार्थी……
– ‘कॅप’ अंतर्गत प्रवेशाच्या जागा १८,७५,७३५
– ‘कोटा’ अंतर्गत प्रवेशाच्या जागा २,१३,४१५
– एकूण प्रवेशाच्या उपलब्ध जागा २०,८९,१५०