Stock Market Today: कसा असणार आजचा स्टॉक मार्केट? कोणते शेअर्स वाढणार आणि कोणते घसरणार? जाणून घ्या
जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आज सोमवारी २ जून रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, स्थिर राहण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. शुक्रवारी, देशांतर्गत शेअर बाजाराचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले, बेंचमार्क निफ्टी २४,८०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स १८२.०१ अंकांनी म्हणजेच ०.२२ टक्क्यांनी घसरून ८१,४५१.०१ वर बंद झाला, तर निफ्टी ५० हा ८२.९० अंकांनी म्हणजेच ०.३३ टक्क्यांनी घसरून २४,७५०.७० वर बंद झाला.
आज देखील सेन्सेक्समध्ये चढउतार होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. यशस्वी ब्रेकआउटमुळे आज सेन्सेक्स ८२,९०० च्या वर जाऊ शकतो असे त्यांचे मत आहे. आणखी चढउतार देखील चालू राहू शकतात, ज्यामुळे निर्देशांक ८३,७०० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ३० मे रोजी निफ्टी ५० ०.३३% ने घसरून २४,७५०.७० वर बंद झाला होता. आज तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, निफ्टी ५० २४,२०० च्या खाली जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
शुक्रवारी स्थानिक शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स समूहातील कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, एनटीपीसी, इन्फोसिस, नेस्ले, सन फार्मा आणि टाटा स्टील यांचे शेअर्स सर्वात जास्त घसरले. दुसरीकडे, एटरनल (पूर्वीचे झोमॅटो), स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स वाढले होते.
रिलायन्स पॉवर, सुझलॉन एनर्जी, बीएसई, आरआर काबेल, वोक्हार्ट, सीसीएल प्रॉडक्ट्स आणि मुथूट फायनान्स या शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून येत आहे . या स्टॉकनी त्यांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ओलांडला आहे. त्यामुळे आजच्या शेअर बाजारात या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
AI आता जेवणंही बनवणार! या कंपनीने बनवला जगातील पहिला AI Chef, ही काम करण्यात आहे पटाईत
एमएसीडीने वेल्सपन इंडिया, माझगाव डॉक शिपबिल्डर्स, चेन्नई पेट्रो, आयएफसीआय, चंबळ फर्टिलायझर्स, फर्स्टसोर्स आणि इंडिया सिमेंट्ससाठी मंदीचे संकेत दिले आहेत. याचा अर्थ आता या शेअर्समध्ये घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे या आठवड्यात गुंतवणूक दारांनी शेअर्सची खरेदी करण्यापूर्वी प्रचंड काळजी घेणं गरजेचं आहे.
वेल्स्पन कॉर्प, एचसीसी आणि डाबर इंडिया हे तीन स्टॉक आज गेम चेंजर ठरू शकतात, असा अंदाज शेअर बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. बेंचमार्क निर्देशांक लवकरच २५,४०० वर पोहोचेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे. वेल्स्पन कॉर्प लिमिटेड, ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, पंजाब नॅशनल बँक , डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, अनंत राज लिमिटेड, युनियन बँक ऑफ इंडिया आणि कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या शेअर्सच्या किंमतींमध्ये आज मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.