Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Elections: ‘अनधिकृत फलकांवर तत्काळ…’; महापालिका निवडणुकीची यंत्रणा सज्ज

आदर्श आचारसंहितेचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होऊ नये, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, तसेच उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 17, 2025 | 09:31 PM
Local Body Elections: 'Immediate action on unauthorized banners...'; The municipal election machinery is ready.

Local Body Elections: 'Immediate action on unauthorized banners...'; The municipal election machinery is ready.

Follow Us
Close
Follow Us:
  • आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी
  • अनधिकृत फलकांवर तत्काळ कारवाईचे निर्देश
  • महापालिका प्रशासनाने निवडणूक तयारीला दिला वेग
पुणे: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महापालिका (Pune) प्रशासनाने निवडणूक तयारीला वेग दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मंगळवारी (दि. १७) दुपारी १२ वाजता महापालिका आयुक्त तथा शहर निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया पूर्णतः निःपक्षपाती, पारदर्शक आणि कायद्यानुसार पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

हेही वाचा : IND vs SA 4th T20I : लखनौमधील चौथ्या T20 सामन्यावर धुक्याचे सावट! सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा हिरमोड

आदर्श आचारसंहितेचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होऊ नये, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, तसेच उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील अनधिकृत फलक, बॅनर्स, पोस्टर्स आणि अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करून शहर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यावर भर देण्यात आला.

दि. २३ डिसेंबर २०२५ पासून छापील नामनिर्देशन पत्रांचे वितरण व स्वीकार सुरू होणार असून, त्यासाठी दि. २० डिसेंबरपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक स्टेशनरी व साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.

पिंपरी-चिंचवडमध्ये १७ लाख मतदार बजावणार हक्क

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, भयमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम अधिसूचनेनुसार शहरात एकूण ३२ प्रभाग असून, एकूण १२८ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. महिला सक्षमीकरणावर भर देत एकूण जागांपैकी ५० टक्के (६४ जागा) महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्रात एकूण १७ लाख १३ हजार ८९१ मतदार असून, यामध्ये पुरुषांचे पारडे जड आहे. मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी mahasecvoterlist.in या संकेतस्थळावर ‘Search name in voter list’ ही सुविधा देण्यात आली आहे.

हेही वाचा : IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याआधी भारताला झटका! संघातील स्टार खेळाडू संघाबाहेर; कारण आले समोर

 

Web Title: Local body elections the municipal corporation has ordered action against unauthorized banners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 09:31 PM

Topics:  

  • Local Body Election 2025
  • Maharashtra Local Body Election
  • pune news

संबंधित बातम्या

‘योग्य सन्मान मिळाला तर ठीक, तुच्छ लेखलेत तर…’ शंभूराज देसाई गरजले, सांगली महापालिका निवडणुकीदरम्यान आव्हान
1

‘योग्य सन्मान मिळाला तर ठीक, तुच्छ लेखलेत तर…’ शंभूराज देसाई गरजले, सांगली महापालिका निवडणुकीदरम्यान आव्हान

Railway प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे स्थानकावर सुरू झाली ‘ही’ जबरदस्त सुविधा, काय असणार खास?
2

Railway प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे स्थानकावर सुरू झाली ‘ही’ जबरदस्त सुविधा, काय असणार खास?

Nanded News : भाजपा-शिवसेना युतीचे संकेत; खासदार अशोक चव्हाण यांची सूचक प्रतिक्रिया
3

Nanded News : भाजपा-शिवसेना युतीचे संकेत; खासदार अशोक चव्हाण यांची सूचक प्रतिक्रिया

मोठी बातमी! Election आधी ‘या’ कायद्यात बदल होणार; जिल्हा परिषद अन्…, सरकारचा निर्णय
4

मोठी बातमी! Election आधी ‘या’ कायद्यात बदल होणार; जिल्हा परिषद अन्…, सरकारचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.