Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro: पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार! ‘या’ मेट्रोमार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू

महा मेट्रोने प्राथमिक आराखडे आणि तांत्रिक मंजुरी पूर्ण केली असून, टेंडर प्रक्रिया येत्या काही आठवड्यांत सुरू होणार आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर दोन ते अडीच वर्षांत हा टप्पा पूर्ण करण्याचा मानस असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 09, 2025 | 11:24 AM
Pune Metro: पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार! ‘या’ मेट्रोमार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू
Follow Us
Follow Us:
रामवाडी-वाघोली मेट्रोसाठी महा मेट्रोकडून निविदा प्रक्रिया सुरू
पूर्व पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय
११.६३ किलोमीटरची असणार मेट्रोची मार्गिका

पुणे: शहराच्या पूर्व भागात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे आता मेट्रोचा विस्तार हा काळाची गरज बनला आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) लवकरच रामवाडी ते वाघोळी या ११.६३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेसाठी निविदा प्रक्रिया सुरू करणार आहे.

मार्गाचा तपशील

हा प्रस्तावित विस्तार मेट्रो लाईन २ (वानवडी-रामवाडी) चा पुढील टप्पा आहे. रामवाडीहून वाघोलीमार्गे विठ्ठलवाडीपर्यंत हा मार्ग जाणार असून, एकूण ११ स्टेशन उभारली जाण्याची योजना आहे. पूर्व पुण्यातील वाघोली परिसरातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

दुहेरी संरचनेचा फ्लायओव्हर

या मार्गावर महा मेट्रोकडून एक अभिनव ‘डबल डेक्कर’ फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे. म्हणजे वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका आणि खालच्या स्तरावर वाहतुकीसाठी रस्ता असेल. यामुळे जागेचा उत्तम वापर होणार असून, पुणेकरांना अखंड आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल. तो पुणे शिरूर उन्नत रस्त्याचा भाग असेल.

Pune News: पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! राज्य शासनाने ‘या’ 2 Metro मार्गांना दिली मंजूरी

वाहतूक कोंडीला दिलासा
वाघोली परिसरात दररोज प्रचंड वाहनांची गर्दी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हा मेट्रो प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर नगर रोडवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती भागाशी पूर्व पुण्याचा संपर्क अधिक वेगवान होईल.
 महा मेट्रोने प्राथमिक आराखडे आणि तांत्रिक मंजुरी पूर्ण केली असून, टेंडर प्रक्रिया येत्या काही आठवड्यांत सुरू होणार आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर दोन ते अडीच वर्षांत हा टप्पा पूर्ण करण्याचा मानस आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  रामवाडी-वाघोली मेट्रो लाईनमुळे या भागातील प्रवासाचा कालावधी निम्म्यावर येईल, रोजगारनिर्मिती होईल आणि रिअल इस्टेट क्षेत्रालाही चालना मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. या विस्तारामुळे पुणे मेट्रोच्या लाईन २ ची एकूण लांबी २८.४५ किलोमीटरवर जाणार असून, एकूण २९ स्टेशन तयार होतील. यामुळे पूर्व-पश्चिम पुणे जोडणारा हा मेट्रो मार्ग शहराच्या वाहतुकीच्या नकाशावर एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Web Title: Maha metro begins tender process for ramwadi wagholi metro pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Metro
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
2

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
3

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
4

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.