Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; 20 ते 25 दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

टिंबर मार्केटमधील दुकानांमधून पहाटेच्या सुमारास अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 18, 2026 | 11:27 AM
पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; 20 ते 25 दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; 20 ते 25 दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग.
  • आगीत सुमारे २० ते २५ दुकाने जळून खाक.
  • परिसरातील काही घरांनाही आगीची झळ, लाखो रुपयांचे नुकसान.
पुणे : शहरातील टिंबर मार्केट परिसरात पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या आगीत सुमारे 20 ते 25 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून, काही घरांचेही नुकसान झाले आहे. आगीत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

टिंबर मार्केटमधील दुकानांमधून पहाटेच्या सुमारास अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले. दुकानांमध्ये लाकूड व इतर ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आग वेगाने पसरली. त्यामुळे परिसरातील अन्य दुकाने आणि घरांनाही आगीचा धोका निर्माण झाला होता.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत अनेक दुकानांमधील साहित्य जळून खाक झाले होते. काही घरांनाही आगीची झळ बसली असून, घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यापूर्वीही लागली होती आग

पुण्यातील टिंबर मार्केट हा परिसर फर्निचर आणि प्लायवूड यांसारख्या वस्तूंच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आता या परिसरातील दुकानांमध्ये आग लागल्याची घटना समोर आली. टिंबर मार्केटमध्ये आगीची ही पहिलीच घटना नाही. गेल्या आठ वर्षांत या परिसरात आगीची ही तिसरी मोठी घटना असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

FAQ

१. पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये आग कधी लागली?
पहाटे दोनच्या सुमारास टिंबर मार्केटमध्ये भीषण आग लागली.

२. आगीत किती दुकाने जळाली?
सुमारे २० ते २५ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

३. आगीत घरांचेही नुकसान झाले का?
होय. आगीची झळ परिसरातील काही घरांनाही बसली आहे.

Web Title: Major fire at timber market in pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • Fire Incident
  • pune news

संबंधित बातम्या

पुणेकरांनो आधी इकडे लक्ष द्या! ‘हा’ मुख्य पूल वाहतुकीसाठी राहणार बंद; पण कारण तरी काय?
1

पुणेकरांनो आधी इकडे लक्ष द्या! ‘हा’ मुख्य पूल वाहतुकीसाठी राहणार बंद; पण कारण तरी काय?

Pune News : पुण्यात रिंगरोडच्या मोजणीला विरोध; ‘या’ मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले नागरिक
2

Pune News : पुण्यात रिंगरोडच्या मोजणीला विरोध; ‘या’ मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले नागरिक

६ वर्षांची शानदार सेवा, १२ दीक्षांत संचलनांचा साक्षीदार! NDA चा लाडका ‘रिलायंट रॉबिन’ घेणार निरोप
3

६ वर्षांची शानदार सेवा, १२ दीक्षांत संचलनांचा साक्षीदार! NDA चा लाडका ‘रिलायंट रॉबिन’ घेणार निरोप

Baramati Court: सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; बारामतीसह जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज ठप्प!
4

Baramati Court: सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; बारामतीसह जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज ठप्प!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.