Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळात रस्त्यासाठी संघर्ष; आजारी रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ

Pune News: स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण होत असतानाही मावळ तालुक्यातील काही दुर्गम वाड्यांमधील नागरिकांना मूलभूत रस्ते सुविधेसाठी संघर्ष करावा लागत आहे. रस्त्याअभावी आजारी रुग्णांना झोळीतून किंवा खडतर वाटेने रुग्णालयापर्यंत नेण्याची वेळ येत असून, कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 12, 2026 | 04:32 PM
स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळात रस्त्यासाठी संघर्ष; आजारी रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ

स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळात रस्त्यासाठी संघर्ष; आजारी रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ

Follow Us
Follow Us:
  • मावळच्या दुर्गम वाड्यांना रस्ता कधी मिळणार?
  • कोट्यवधींचा निधी खर्चूनही नागरिकांची फरफट
  • रस्ते विकासाच्या दाव्यांना मावळात घरचा आहेर
  • दुर्गम वाड्यांतील रुग्णांना आजही झोळीचा आधार
सतिश गाडे , वडगाव मावळ प्रतिनिधी : एकीकडे देशाचा ८०वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना, मुंबई-पुण्यासारख्या महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मावळ तालुक्यातील धनगरवाडे, आदिवासी पाडे आणि दुर्गम भागात अद्यापही मूलभूत सोयी-सुविधा पोहोचलेल्या नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कुसवली पठारावरील एका वृद्ध रुग्णाला उपचारासाठी ग्रामस्थांनी चक्क झोळीतून नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असलेल्या मावळ तालुक्याच्या विकासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कोट्यवधींचा निधी, मात्र दुर्गम वाड्यांना रस्ता कधी?

मुंबई-पुणे या दोन महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मावळ तालुक्याला विकासाच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यात रिंग रोड, एमआयडीसी, स्कायवॉक यांसह विविध मोठ्या प्रकल्पांवर कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. अनेक भागांत रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. मात्र, याच मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी झोळीचा आधार घ्यावा लागत असेल, तर या विकासाचा लाभ नेमका कोणापर्यंत पोहोचला? असा सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहे.

Lonavala Tiger Point Road News: लोणावळ्यातील वाहतूक कोंडी फुटणार; कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती!

पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन प्रवास

कुसवली पठार आणि परिसरातील दुर्गम वाड्यांमध्ये पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते. रस्त्यांची अवस्था खराब असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. गर्भवती महिला, शालेय विद्यार्थी, वृद्ध व्यक्ती किंवा एखादा रुग्ण आजारी पडल्यास त्याला उपचारासाठी नेण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र येऊन झोळी अथवा खांद्यावरून मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकाही थेट वाडीपर्यंत पोहोचणे कठीण होत असल्याने नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण होत आहे.

स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही रस्त्यासाठी संघर्ष

कुसवली पठारावरील धनगरवाड्यांसह परिसरातील काही वाड्यांमध्ये अद्यापही रस्त्याची सुविधा अत्यंत अपुरी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती आजारी पडल्यास वाहन गावापर्यंत पोहोचणेही कठीण होते. अशा वेळी रुग्णाला झोळीतून किंवा खांद्यावरून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते. विशेषतः गर्भवती महिला, वृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती आणि शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

निवडणुका आल्या, आश्वासने मिळाली; पण रस्ता मात्र झाला नाही!

मावळ तालुक्यात अनेक निवडणुका झाल्या, विविध सरकारे सत्तेवर आली आणि लोकप्रतिनिधी निवडून आले. तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागली. मात्र दुर्गम वाड्यांमधील नागरिकांच्या मूलभूत रस्त्याच्या प्रश्नाकडे अद्याप पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. एका बाजूला कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची चर्चा आणि दुसऱ्या बाजूला रुग्णाला झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ—मावळच्या विकासाचे हे विरोधाभासी चित्र नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण करणारे आहे.

मूलभूत सुविधांचा अधिकार कधी मिळणार?

दुर्गम भागातील नागरिकांनाही शहरातील नागरिकांप्रमाणेच रस्ता, आरोग्य, वाहतूक, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ मोठ्या प्रकल्पांवर भर न देता कुसवली पठार, धनगरवाडी आणि परिसरातील दुर्गम वाड्यांना बारमाही रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. “विकासाच्या गप्पा नकोत; रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ संपवा, आधी रस्ता द्या!” अशी संतप्त भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी

Web Title: Maval remote hamlets road connectivity problem patients carried in hammock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Independence Day
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
4

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.