Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gahunje stadium : गंहुजे येथील आंतरराष्ट्रीय मैदानाला दिवंगत नेते अजित पवारांचे नाव ? आमदार सुनील शेळकेंची विधीमंडळात मागणी

Ajit Pawar Plane Accident : बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांचे अपघाती निधन झाले. यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये एकच शोककळा पसरली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 15, 2026 | 02:13 PM
MCA International Gahunje Cricket Stadium renaming with ajit pawar MLA Sunil Shelke proposal

MCA International Gahunje Cricket Stadium renaming with ajit pawar MLA Sunil Shelke proposal

Follow Us
Follow Us:
  • गंहुजे मैदानाला अजित पवारांचे नाव देण्याची मागणी
  • सुनील शेळके यांनी विधीमंडळात केली मागणी
  • मावळमधील नागरिकांकडून समाधान व्यक्त
Gahunje stadium ajit Pawar Name : वडगाव मावळ : सतीश गाडे : राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांचे अपघाती (Ajit Pawar Plane Accident) निधन झाले. यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये एकच शोककळा पसरली. अजित पवारांच्या स्मरणार्थ अनेक निर्णय हे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घेतले जात आहेत. अशीच आणखी एक मागणी मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी विधीमंडळामध्ये केली आहे.

मावळ तालुक्यातील गहुंजे येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभा सभागृहात केली. मावळ तालुक्याच्या विकासासाठी आणि क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन ही मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा : मुंबईच्या महापौर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; रितू तावडे यांचा लाल दिव्याच्या गाडीतून प्रवास

गहुंजे येथील एमसीए मैदान हे राज्यातील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानांपैकी एक मानले जाते. या मैदानावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने पार पडले असून त्यामुळे मावळ तालुक्याची ओळख देश-विदेशात निर्माण झाली आहे. या मैदानाच्या उभारणीसाठी आणि परिसराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभे राहू शकले, असे आमदार सुनील शेळके यांनी सभागृहात नमूद केले.

या मैदानामुळे स्थानिक युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळत असून परिसरातील आर्थिक आणि सामाजिक विकासालाही गती मिळाली आहे. मोठ्या प्रमाणावर क्रिकेट सामने आणि इतर क्रीडा उपक्रम आयोजित होत असल्याने पर्यटन आणि स्थानिक व्यवसायांनाही त्याचा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या मैदानाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देणे ही त्यांच्या कार्याला योग्य अशी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

हे देखील वाचा : आसामच्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवालांची एन्ट्री; जाहीर केले 14 उमेदवारराज्य सरकारने या

गंहुजे येथील आंतरराष्ट्रीय मैदानाला दिवंगत नेते अजित पवारांचे नाव देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही आमदार शेळके यांनी व्यक्त केली. तसेच या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंद आणि अभिमानाची भावना निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Mca international gahunje cricket stadium renaming with ajit pawar mla sunil shelke proposal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Cricket Association Stadium
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
1

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
2

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
3

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.