Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMRDA ला आता टाळे ठोकण्याची वेळ; वाहतूककोंडी, पायाभूत सुविधांवरून महानगर नियोजन समितीची टीका

पीएमआरडीएचे लक्ष प्रामुख्याने बांधकाम परवानग्यांवर असून शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला. पीएमआरडीएची स्थापना रद्द करून त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 09, 2026 | 08:07 AM
PMRDA ला आता टाळे ठोकण्याची वेळ; वाहतूककोंडी, पायाभूत सुविधांवरून महानगर नियोजन समितीची टीका

PMRDA ला आता टाळे ठोकण्याची वेळ; वाहतूककोंडी, पायाभूत सुविधांवरून महानगर नियोजन समितीची टीका

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महानगर प्रदेशच्या नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या विकासात गेल्या १०-११ वर्षांत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) अपेक्षित यश मिळालेले नाही. विकास आराखडा, नगररचना योजना, रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांचे प्रश्न अद्याप कायम आहेत. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने अपयशी ठरलेल्या पीएमआरडीएच्या कार्यपद्धतीचा फेरआढावा घेऊन या यंत्रणेला टाळे ठोकण्याची वेळ आली आहे, असा आरोप महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे यांनी केला.

पीएमआरडीएच्या कामकाजाबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत नागरी हक्क संस्थेचे सुधीरकाका कुलकर्णी आणि कायद्याचे अभ्यासक अॅड. उमेश तारे उपस्थित होते. चाकण आणि हिंजवडी परिसरातील वाहतूककोंडी तसेच पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर उद्योजकांनी केलेले आंदोलन हे या भागाच्या सुनियोजित विकासाची गरज अधोरेखित करणारे आहे, असे भसे यांनी सांगितले. शहरालगतच्या भागाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पीएमआरडीएची स्थापना झाली. मात्र, विकास आराखडा आणि नगररचना योजनांची प्रगती संथ असून रस्ते, पाणी, वीज यांसारख्या सुविधांचेही पुरेसे नियोजन झालेले नाही.

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम ! ‘पीएमआरडीए’चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन

दरम्यान, बांधकाम परवानग्यांसोबतच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन पायाभूत सुविधांचे नियोजन व अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पीएमआरडीएच्या विकास आराखड्यासह संरचनात्मक आराखड्याच्या मुद्द्यावर महानगर नियोजन समितीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

काय केली मागणी?

पीएमआरडीएचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा आणि संरचनात्मक आराखड्याचे अधिकार काढून घेऊन बांधकाम परवानग्या व विकास आराखड्याबाबतचे अधिकार जिल्हाधिकारी आणि नगररचना विभागाकडे देण्याचा विचार शासनाने करावा, अशी मागणी अॅड. तारे यांनी केली.

पीएमआरडीएचे शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष

पीएमआरडीएचे लक्ष प्रामुख्याने बांधकाम परवानग्यांवर असून शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला. पीएमआरडीएची स्थापना रद्द करून त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली

Web Title: Metropolitan planning committee criticizes traffic congestion and infrastructure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 08:07 AM

Topics:  

  • PMRDA
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
1

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे महागात; १९ वीजचोरांवर गुन्हे, नऊ प्रकरणांत १२.४१ लाखांची दंडात्मक आकारणी
2

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे महागात; १९ वीजचोरांवर गुन्हे, नऊ प्रकरणांत १२.४१ लाखांची दंडात्मक आकारणी

Q Sports League 2026: आरसीबीसी लेजंड्सचे वर्चस्व, सलग दोन विजयांसह मारली बाजी
3

Q Sports League 2026: आरसीबीसी लेजंड्सचे वर्चस्व, सलग दोन विजयांसह मारली बाजी

Pune Prabhag Samiti: पुणे पालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी चुरस! ४५ जागांसाठी २९८ अर्ज
4

Pune Prabhag Samiti: पुणे पालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी चुरस! ४५ जागांसाठी २९८ अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.