Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Maharashtra Breaking News: मध्यपूर्वेतील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या जवळ पोहोचल्याने आशियाई व भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 09, 2026 | 05:52 PM
Maharashtra Breaking News Today 24.10.2026

Maharashtra Breaking News Today 24.10.2026

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News: 

राज्यातील स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या राजकीय फेऱ्या तीव्र झाल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घरगुती क्रिकेट हंगामासाठी तीन नवीन भागीदारांसह १३० कोटी रुपयांचे नवे व्यावसायिक प्रायोजकत्व करार जाहीर केले आहेत

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी उत्तर-पूर्व भारतात पूरपरिस्थितीमुळे नद्या काठच्या भागांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. भारत आणि जपानच्या हवाई दलादरम्यान धोरणात्मक सहकार्य वाढवण्यासाठी जोधपूर येथे १४ दिवशीय ‘वीर गार्डियन-२०२६’ या संयुक्त युद्धसरावाची आजपासून सुरुवात झाली आहे. अमेरिकेने कॅनेडियन वस्तूंवर ५० टक्के आयात शुल्क (Tariff) लादल्यामुळे आणि जीएसए (GSA) च्या यादीतून कॅनेडियन उत्पादने हटवल्यामुळे दोन्ही देशांतील व्यापारी वाद विकोपाला गेला आहे.

 

 

The liveblog has ended.
  • 09 Sep 2026 05:59 PM (IST)

    09 Sep 2026 05:59 PM (IST)

    ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे बुधवारी आंदोलनाला आक्रमक वळण मिळाले. उमरगा तहसील कार्यालयात प्रवेश केलेल्या चार आंदोलकांनी तहसीलदारांच्या कार्यालयातील खुर्ची बाहेर आणून तहसील कार्यालयाच्या आवारात पेट्रोल टाकून जाळल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

  • 09 Sep 2026 05:45 PM (IST)

    09 Sep 2026 05:45 PM (IST)

    राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज! विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती

    राज्यातील ग्रामीण राजकारणाबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. पण प्रशासकीय कारणांमुळे निवडणुका झालेल्या नाहीत, अशा ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

  • 09 Sep 2026 05:30 PM (IST)

    09 Sep 2026 05:30 PM (IST)

    मोदींच्या फोटोवरून KDMC महासभेत राडा; सभा तहकूब

    पुण्यातील एका शाळेत मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Photo) यांचा फोटो काढल्याच्या प्रकरणावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापले आहे. या वादाचे पडसाद बुधवारी (9 सप्टेंबर 2026) झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत उमटले. भाजपने या प्रकरणाचा निषेध करत महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्याची मागणी केली. अखेर महापौर हर्षाली चौधरी यांनी महासभा तहकूब केली.

  • 09 Sep 2026 05:15 PM (IST)

    09 Sep 2026 05:15 PM (IST)

    भगव्या रंगावरून वादानंतर मोठा निर्णय! भारतीय हॉकी संघ आता थेट…

    भारतीय हॉकी संघाच्या भगव्या रंगाच्या जर्सीवरून सुरू असलेला वाद आता संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ त्यांच्या पारंपरिक निळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरतील. भारतीय संघाने नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये झालेल्या एफआयएच विश्वचषक स्पर्धेदरम्यान याच रंगाची जर्सी परिधान केली होती.

  • 09 Sep 2026 03:56 PM (IST)

    09 Sep 2026 03:56 PM (IST)

    अन्यथा नगरपरिषदेवर गुन्हा दाखल करू’; भटक्या श्वानांवरून रत्नागिरीत वातावरण तापले

    शहरात भटक्या श्वानांचा हैदोस अत्यंत भीषण पातळीवर पोहोचला असून, यामुळे सामान्य नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. शहरात मारुती मंदिर, एसटी स्टैंड परिसर, माळनाका व शाळा-महाविद्यालयांच्या आसपास श्वानांच्या टोळ्या मोकाट फिरत आहेत. या हिंसक श्वानांकडून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वारांवर सातत्याने जीवघेणे हल्ले केले जात आहेत.

    अलिकडेच फगरवठार पोलिस लाइनजवळ खेळणाऱ्या एका निष्पाप छोट्या बालकावर तब्बल ७ ते ८ श्वानांच्या टोळीने अचानक हल्ला चढवला.

  • 09 Sep 2026 03:45 PM (IST)

    09 Sep 2026 03:45 PM (IST)

    विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मग्रारोहयो) पूर्ण करण्यात आलेल्या वैयक्तिक सिंचन विहिरींचे अनुदान ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाले असतानाही संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग झालेली नसल्याने पारडी (ठवरे) येथील चार लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. स्वतःच्या पैशातून विहिरींची कामे पूर्ण केल्यानंतरही अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे दाद मागितली आहे.

  • 09 Sep 2026 03:35 PM (IST)

    09 Sep 2026 03:35 PM (IST)

    81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम

    जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विरारचे जलतरणपटू केवल चौधरी यांनी खडतर आव्हान पार करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील भागीरथी नदीत रविवारी, 6 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या तब्बल 81 किलोमीटरच्या खुल्या पाण्यातील जलतरण स्पर्धेचे संपूर्ण अंतर त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. या कामगिरीमुळे 81 किलोमीटरचे अंतर पूर्ण करणारे पालघर जिल्ह्यातील पहिले जलतरणपटू म्हणून केवल चौधरी यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

  • 09 Sep 2026 03:25 PM (IST)

    09 Sep 2026 03:25 PM (IST)

    समितीचा अहवाल शासनाला सादर! ‘डफरीन’ आगप्रकरणी चौकशी पूर्ण; दोषारोपण कोणावर हे गुलदस्त्यातच

    अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षात (एसएनसीयू) २४ ऑगस्ट रोजी पहाटे व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीप्रकरणी राज्यस्तरीय चौकशी समितीने अखेर आपला अहवाल शासनाकडे सादर केला आहे. समितीने चौकशी पूर्ण करून सोमवारी सायंकाळी मुंबई येथे आरोग्य विभागाचे सचिव यांच्याकडे अहवाल सुपूर्द केला. मात्र, या अहवालातील निष्कर्ष अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नसल्याने आग नेमकी कशामुळे लागली, कोणत्या स्तरावर त्रुटी झाल्या आणि या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यातच आहेत

  • 09 Sep 2026 03:15 PM (IST)

    09 Sep 2026 03:15 PM (IST)

    मोठा उलटफेर! क्वार्टर फायनलमध्ये Carlos Alcaraz चा धक्कादायक पराभव; Ben Shelton ने दाखवला घरचा रस्ता

    यूएस ओपन २०२६ च्या (US open 2026) पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत एक मोठा धक्कादायक निकाल लागला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्काराझला, आठव्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकन खेळाडू बेन शेल्टनने पराभूत केले. या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात, शेल्टनने गतविजेता अल्काराझचा चुरशीच्या लढतीत ६-७, ६-१, ६-३, १-६, ७-६ (टायब्रेकमध्ये १०-७) असा पराभव केला.या पराभवामुळे कार्लोस अल्काराझच्या सलग ८ ग्रँड स्लॅम विजयांची मालिका संपुष्टात आली.

  • 09 Sep 2026 03:10 PM (IST)

    09 Sep 2026 03:10 PM (IST)

    संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

    सोशल मीडियावर महिलांविषयी लैंगिक शेरेबाजी करणारी आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसिद्ध करून विनयभंग केल्याप्रकरणी संतोष पंडित यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संतोष पंडित यांना पुणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि महिला नगरसेविका यांच्याबाबत सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून आक्षेपार्ह आणि अवमानकारक शब्द वापरून त्यांची बदनामी केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

  • 09 Sep 2026 03:05 PM (IST)

    09 Sep 2026 03:05 PM (IST)

    राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा दिल्ली दौरा; रशिया भारतात आणणार नव्या पिढीची जेट इंजिने, Su-57 लढाऊ विमानांच्या करारावर

    जागतिक भू-राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Putin In India) भारत दौऱ्यावर येत आहेत. दिल्लीतील या दौऱ्यादरम्यान भारत आणि रशियादरम्यान अनेक अब्ज डॉलरच्या संरक्षण आणि तांत्रिक करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. पुतिन यांच्या या दौऱ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रशिया भारतासाठी नव्या पिढीची शक्तिशाली जेट इंजिने आणि अत्याधुनिक हवाई तंत्रज्ञान घेऊन येत आहे. याशिवाय, ५ व्या पिढीतील प्रसिद्ध ‘Su-57’ स्टेल्थ लढाऊ विमानांचे तंत्रज्ञान भारताला हस्तांतरित करण्यावरही दोन्ही देशांचे प्रमुख चर्चा करणार आहेत.

  • 09 Sep 2026 02:59 PM (IST)

    09 Sep 2026 02:59 PM (IST)

    भारतीय जनता पार्टी म्हणजे 'रझाकाराची अवलाद' : अंबादास दानवे यांची जहरी टीका

    ठाकरे गटाकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिवशी 'तुमसे ना हो पयेगा' या टॅगलाईन खाली मराठवाड्यात आंदोलन करण्यात येणार आहे. या हिंदी नावावरून पक्षावर टीका होत आहे. यावरून आमदार अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पार्टीला थेट रझाकाराची अवलाद असे म्हणत जहरी टीका केली आहे.

  • 09 Sep 2026 02:50 PM (IST)

    09 Sep 2026 02:50 PM (IST)

    आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक, तहसीलदारांची खुर्ची पेटवली

    धाराशिवच्या उमरगा तहसील कार्यालयात मराठा आंदोलक अत्यंत आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी तहसीलदारांच्या खुर्चीला आग लावून तीव्र निषेध केला. या धक्कादायक घटनेमुळे कार्यालय परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • 09 Sep 2026 02:40 PM (IST)

    09 Sep 2026 02:40 PM (IST)

    कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या होमपीचवरच कामगार आक्रमक

    महिन्यातून केवळ १० ते १५ दिवसच काम देणे, नियमानुसार मिळणारा दुप्पट ओव्हरटाईम न देणे आणि ट्रेनिंगच्या नावाखाली १ ते २ वर्षे पीएफ कपात न करणे, अशा अनेक गंभीर आरोपांनंतर आता शिवांगी बेकर्सचे कामगार रस्त्यावर उतरले आहेत. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या मतदारसंघातील या कंपनीत सुमारे ४०० ते ५०० कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • 09 Sep 2026 02:31 PM (IST)

    09 Sep 2026 02:31 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत चूकीचा मॅसेज दिला जातोय : उदय सामंत

    मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा 12 वा दिवस असून त्यांनी सरकारवर आरोप केले होते. यानंतर आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत सरकारची बाजू मांडली. यावेळी त्यांनी ओबीसींच्या हक्कावर दगा न येता मराठा आरक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी सरकार काम करत आहे. पण मराठवाड्यात तब्बल 16 हजार प्रमाणपत्रांचे वाटप झाले असून फक्त 64 दाखले नाकारण्यात आले आहेत. तरीही अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत असा चूकीचा मॅसेज मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहचवला जात असल्याचा दावा सामंत यांनी केला आहे.

  • 09 Sep 2026 02:20 PM (IST)

    09 Sep 2026 02:20 PM (IST)

    विद्यानंद बापट यांच्या मागणीला भाजपच्या आमदारांचे बळ

    विद्यानंद बापट यांच्या डीजे बंदीच्या मागणीला राज्यभर बळ मिळताना दिसत आहे. दरम्यान आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर देखील डीजे बंदीच्या विरोधात मैदानात उतरले असून सांगलीच्या मारुती चौकात डीजे संस्कृती संपवूया, पारंपारिक संस्कृती जपूया, असा नारा देत दिला आहे.

  • 09 Sep 2026 02:12 PM (IST)

    09 Sep 2026 02:12 PM (IST)

    'गृहराज्यमंत्री इंडियात जन्मलेत', डीजेवरून सदाभाऊ खोतांची मंत्री योगेश कदमांवर टीका

    महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री हे इंडियात जन्मले आहेत, अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी योगेश कदमांवर केली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यात डीजेला परवानगी देणार, या केलेल्या विधानावरून सदाभाऊ खोत यांनी ही टीका केली आहे. आम्ही भारताल्या लोकांची मागणी घेऊन पुढे आलो आहोत. भारतीय लोककलेला राजाशय मिळाला पाहिजे पण एखादा मंत्रीच ग्रामीण भागातल्या कलेला कमी लेखत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, अशी खंत देखील आमदार खोत यांनी व्यक्त केली आहे.

  • 09 Sep 2026 01:55 PM (IST)

    09 Sep 2026 01:55 PM (IST)

    युक्रेन युद्धावर मोठा निर्णय? ट्रम्प-पुतिन यांच्यात ‘हॉटलाईन’वर 60 मिनिटे संवाद

    रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर राजनैतिक हालचालींना प्रचंड वेग आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Trump Putin Call) यांच्याशी दूरध्वनीवरून तासभर सविस्तर चर्चा केली. या संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी युक्रेनमधील युद्ध लवकरात लवकर संपवण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली असून, शांतता प्रस्थापित झाल्यास अमेरिका आणि रशियामधील संबंध पुन्हा एकदा पूर्णपणे सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

  • 09 Sep 2026 01:45 PM (IST)

    09 Sep 2026 01:45 PM (IST)

    एका शब्दाने सगळा खेळ बिघडला! ‘संभाजीनगर-धाराशिव’ नावांमुळे बोगस प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश

    पोलीस भरती प्रक्रियेत क्रीडा आरक्षणाचा गैरफायदा घेत बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘कुराश’ आणि ‘ड्रॅगनबोट’ या खेळांच्या नावाने बनावट क्रीडा प्रमाणपत्रे तयार करून ती उमेदवारांना विकल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, एका शब्दातील चूक या संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू होण्यामागचे महत्त्वाचे कारण ठरली.

  • 09 Sep 2026 01:35 PM (IST)

    09 Sep 2026 01:35 PM (IST)

    मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात

    कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक दोनचे ९९.९९ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात कृष्णेचे पाणी रामदरा तलावात सोडण्याची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

  • 09 Sep 2026 01:25 PM (IST)

    09 Sep 2026 01:25 PM (IST)

    Mira Bhayandar मध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी 24 ठिकाणी व्यवस्था

    येत्या गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मीरा भाईंदर महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. यंदा शहरात एकूण २४ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात येणार असून, त्यामध्ये ६ फुटांवरील गणेशमूर्तीसाठी पाच नैसर्गिक जलस्रोत, तर ६ फुटांखालील मूर्तीसाठी १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

  • 09 Sep 2026 01:15 PM (IST)

    09 Sep 2026 01:15 PM (IST)

    अभ्यासात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अतिवापर पडतोय महागात

    आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हा अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग बनत चालला आहे. विद्यार्थी होमवर्क, असाइनमेंट, संशोधन आणि अभ्यासाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी AI चॅटबॉट्सचा वापर करत आहेत. परंतु, OECD च्या नवीन अहवालाने AI च्या वापराबद्दल अशी बाब समोर आणली आहे, जी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी चिंतेची ठरू शकते. अहवालानुसार, अभ्यासाच्या कामात AI चा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे टेस्ट स्कोर AI चा वापर न करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी असल्याचे आढळले आहे.

  • 09 Sep 2026 01:05 PM (IST)

    09 Sep 2026 01:05 PM (IST)

    चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!

    मराठी मनोरंजनसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही चित्रपटांच्या कथा लक्ष वेधून घेतात, तर काहींची नावंही उत्सुकता निर्माण करतात. सध्या अशाच एका आगळ्यावेगळ्या नावामुळे चर्चेत आलेला चित्रपट म्हणजे ‘मांजर’. पोस्टरपासूनच या चित्रपटाच्या नावाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्याने उत्सुकता आणखी वाढवली आहे.

  • 09 Sep 2026 01:00 PM (IST)

    09 Sep 2026 01:00 PM (IST)

    Trump Putin Call : युक्रेन युद्धावर मोठा निर्णय? ट्रम्प-पुतिन यांच्यात ‘हॉटलाईन’वर 60 मिनिटे संवाद; रशियाचा युरोपबाबत मोठा खुलासा

    रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर राजनैतिक हालचालींना प्रचंड वेग आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Trump Putin Call) यांच्याशी दूरध्वनीवरून तासभर सविस्तर चर्चा केली. या संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी युक्रेनमधील युद्ध लवकरात लवकर संपवण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली असून, शांतता प्रस्थापित झाल्यास अमेरिका आणि रशियामधील संबंध पुन्हा एकदा पूर्णपणे सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

  • 09 Sep 2026 12:55 PM (IST)

    09 Sep 2026 12:55 PM (IST)

    Pune Police Bharati Scam: एका शब्दाने सगळा खेळ बिघडला! ‘संभाजीनगर-धाराशिव’ नावांमुळे बोगस प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश

    पुणे:  पोलीस भरती प्रक्रियेत क्रीडा आरक्षणाचा गैरफायदा घेत बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘कुराश’ आणि ‘ड्रॅगनबोट’ या खेळांच्या नावाने बनावट क्रीडा प्रमाणपत्रे तयार करून ती उमेदवारांना विकल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, एका शब्दातील चूक या संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू होण्यामागचे महत्त्वाचे कारण ठरली. तपासादरम्यान २०१८-१९ मध्ये तयार करण्यात आलेल्या काही प्रमाणपत्रांवर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’ अशी नावे आढळली. मात्र, त्या काळात या शहरांची नावे अनुक्रमे औरंगाबाद आणि उस्मानाबाद अशी होती. दोन्ही शहरांचे नामांतर २०२३ मध्ये झाले. त्यामुळे २०१८-१९ मध्ये तयार झालेल्या प्रमाणपत्रावर २०२३ नंतर अस्तित्वात आलेली नावे कशी आली, असा महत्त्वाचा प्रश्न तपास अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला. याच धाग्याला पकडून पोलिसांनी प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू केली आणि बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 09 Sep 2026 12:45 PM (IST)

    09 Sep 2026 12:45 PM (IST)

    गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

    Ganesh Utsav Pune Liquor Shop Closed Rules: शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत. 14 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत मद्यविक्रीवर निर्बंध घालत विविध भागांमध्ये ड्राय डे लागू राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. काही भागांमध्ये 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान पूर्णपणे मद्यविक्री बंद राहणार आहे, तर काही भागांमध्ये गणेश चतुर्थी, गणेशोत्सवातील पाचवा व सातवा दिवस तसेच अनंत चतुर्दशी आणि विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मद्यविक्रीवर निर्बंध राहणार आहेत.

  • 09 Sep 2026 12:35 PM (IST)

    09 Sep 2026 12:35 PM (IST)

    काउंटडाऊन सुरू! टेकविश्वाचे Appleकडे लक्ष, मेगा इव्हेंटमध्ये iPhoneसह नव्या डिव्हाईसवरून उठणार पडदा

    Apple Event Updates: संपूर्ण टेकविश्वाचे लक्ष आज ॲपलच्या मेगा ईव्हेंटकडे आहे. आज 9 सप्टेंबर रोजी, टेक कंपनी ॲपलने त्यांच्या बहुप्रतिक्षित ॲन्युअल सप्टेंबर हार्डवेअर ईव्हेंटचे आयोजन केले आहे. या ईव्हेंटची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. विशेष म्हणजेच या ईव्हेंटचे काही लीक्स देखील सतत समोर आहेत. सरप्राईज अँड शाईन या टॅगलाईनसह कंपनीचा ईव्हेंट आज सुरु होणार आहे. कंपनी आयोजित ईव्हेंटमध्ये आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स सादर करणार आहे. यासोबतच ईव्हेंटमध्ये एक गेम-चेंजिंग ‘वन मोर थिंग’ देखील पाहायला मिळणार आहे, हे म्हणजेच कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन. हे फोल्डेबल डिव्हाईस आयफोन अल्ट्रा नावाने सादर केले जाण्याची शक्यता आहे. आयफोन्सव्यतिरिक्त कंपनी या ईव्हेंटमध्ये ॲपल वॉच सिरीज 12 आणि एअरपॉड्स 5 देखील लाँच करू शकते. तसेच ईव्हेंटमध्ये आयओएस 27 च्या उपलब्धतेबाबत अधिकृत माहिती दिली जाऊ शकते.

  • 09 Sep 2026 12:30 PM (IST)

    09 Sep 2026 12:30 PM (IST)

    Khopoli : खोपोली नगरपरिषदेत १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेविकेच्या दाव्याने खळबळ

    खोपोली नगरपरिषदेत विकासकामांच्या नावाखाली जवळपास १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या नगरसेविका सानिया शेख यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे खोपोलीतील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खोपोली नगरपरिषदेत प्रशासकीय काळात मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी विविध विकास कामांच्या नावाखाली जवळपास 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपाच्या नगरसेविका सानिया शेख यांनी केला आहे.

  • 09 Sep 2026 12:20 PM (IST)

    09 Sep 2026 12:20 PM (IST)

    SBI Recruitment 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेकडून १२ हजार पदांवर भरती! ‘या’ पदांसाठी जागा भरणार

    SBI Recruitment 2026: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तर्फे वित्त वर्ष २०२६-२७ मध्ये सुमारे १२ हजार नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्याची तयारी सुरू आहे. एसबीआईचे चेअरमन सीएस सेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक यावर्षी क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरमध्ये सुमारे ११,००० ते १२,००० नियुक्त्या करू शकते. मात्र, सेवानिवृत्ती आणि बँकेच्या गरजेनुसार ही अंतिम संख्या बदलू शकते. मागील वित्त वर्षामध्ये बँकेने मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या केल्या होत्या, ज्यामध्ये सुमारे १,५०० स्पेशलिस्ट आयटी ऑफिसरचाही समावेश होता. मात्र, या वेळी आयटी क्षेत्रात इतक्या मोठ्या संख्येने भरतीची आवश्यकता नाही.

  • 09 Sep 2026 12:15 PM (IST)

    09 Sep 2026 12:15 PM (IST)

    एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

    MSRTC News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर (एसटी) चालू महिन्यात एक हजार ७१ कोटी रुपयांच्या थकबाकीचा डोंगर उभा राहिल्याच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने महामंडळाच्या आर्थिक व्यवहारांबाबत कठोर पवित्रा घेतला असून, एसटीला यापूर्वी दिलेल्या 200 कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाच्या परतफेडीसह विविध मुद्द्यांवर सविस्तर अहवाल मागवला आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी बुधवारी दिली. (MSRTC News)

  • 09 Sep 2026 12:10 PM (IST)

    09 Sep 2026 12:10 PM (IST)

    Pilot Recruitment 2026: जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीमध्ये पायलट पदांची भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर

    JNPA Pilot Recruitment 2026: जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPA) च्या सागरी विभागातर्फे करार पद्धतीवर ‘पायलट’ (Pilot) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती योजना-१ आणि योजना-२ अंतर्गत केली जाणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे फॉरेन गोइंग जहाजांवर चीफ ऑफिसर किंवा त्याहून वरच्या पदाचा किमान एक वर्षाचा अनुभवासह मास्टर कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. भारतीय नागरिकांकडे परदेशी कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र असल्यास, त्यांच्याकडे डीजी शिपिंगची संबंधित मान्यता असणे गरजेचे आहे. तसेच पायलट सेवा प्रवेशाच्या वेळी उमेदवाराचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. शासकीय किंवा निमशासकीय संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या उमेदवारांना योग्य त्या माध्यमातून अर्ज करावा लागेल.

  • 09 Sep 2026 12:03 PM (IST)

    09 Sep 2026 12:03 PM (IST)

    Pune News: दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; आई-वडिलांनी सांगितले धक्कादायक कारण

    पुणे: देहूजवळील भंडारा डोंगरावर ६ सप्टेंबर रोजी एकटी सापडलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीच्या आई-वडिलांनी अखेर पोलिसांसमोर हजेरी लावली. ‘कोणी तरी दानशूर किंवा चांगले कुटुंब मुलीला घेऊन तिचा सांभाळ करेल’, या आशेने तिला डोंगरावर सोडल्याची कबुली त्यांनी दिली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मुलीचा सांभाळ करणे शक्य होत नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. भंडारा डोंगरावर एकटी चिमुकली आढळल्याने ६ सप्टेंबर रोजी परिसरात खळबळ उडाली होती. अवघ्या दीड वर्षांच्या मुलीला निर्जन ठिकाणी कोणी आणून सोडले, ती हरवली आहे की तिच्यामागे बालअपहरण करणाऱ्या टोळीचा काही संबंध आहे, अशा विविध शक्यता व्यक्त होत होत्या.

  • 09 Sep 2026 11:50 AM (IST)

    09 Sep 2026 11:50 AM (IST)

    बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?

    टेक दिग्गज कंपनी सॅमसंगने काही निवडक ग्लोबल मार्केटमध्ये त्यांचा आणखी एक स्मार्टफोन लाँच केला आहे. बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये सादर करण्यात आलेल्या या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy A07s असे आहे. हा नवीन स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाईटवर तीन रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे. कंपनीने हे नवीन हँडसेट दोम रॅम आणि स्टोरेज पर्यायांत सादर केले आहे. चला तर मग या स्मार्टफोनचे इतर फीचर्स जाणून घेऊया.

  • 09 Sep 2026 11:40 AM (IST)

    09 Sep 2026 11:40 AM (IST)

    लाचेची रक्कम घेतली अन् एसीबीने पकडले; दोन तलाठी एसीबीच्या जाळ्यात,तिसरा फरार

    गौण खनिजाची वाहतूक करणारा जप्त हायवा सोडण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करून त्यातील १२ हजार रुपये लाच म्हणून स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन तलाठ्यांसह एका खासगी पंटरविरुद्ध कारवाई केली. पंटरमार्फत लाचेची रक्कम स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या लाचेच्या रकमेत तीन तलाठी वाटेकरी असल्याचे तपासात समोर आल्याने तिसऱ्या तलाठ्याचा शोध सुरू आहे. तलाठी दिनेश दिलावर दाभाडे, तलाठी मणाल शरद नगराळे आणि खासगी पंटर जयेश चौधरी अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

  • 09 Sep 2026 11:25 AM (IST)

    09 Sep 2026 11:25 AM (IST)

    रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’

    उत्तर प्रदेशच्या झांशी जिल्ह्यातून अपघाताची नवी घटना समोर आली आहे. रिल बनवण्याच्या तरुणाने आपला जीव धोक्यात घातला आणि तब्बल ३० फूट उंचावरुन धरणात उडी मारली. आपला स्टंट आणि साहस पाहून लोक खुश होतील आणि रिल व्हायरल होईल असा विचार तरुणाने केला पण हा पराक्रम त्याच्या जीवावर उठला.

  • 09 Sep 2026 11:15 AM (IST)

    09 Sep 2026 11:15 AM (IST)

    ४३ किलोमीटर, १६ गावे, ५१.७३ हेक्टर; पुणे HCMTR अन् इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग

    पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने पुणे रिंग रोड आणि HCMTR बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रिंग रोड प्रकल्प आणि HCMTR या दोन प्रमुख रस्ते प्रकल्पांसाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया आता वेगवान होणार आहे. सरकारी, वन, संरक्षण आणि रेल्वे विभागांच्या जमिनी हस्तांतरित करण्याबाबतचे मुख्य प्रस्ताव ११ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

  • 09 Sep 2026 11:10 AM (IST)

    09 Sep 2026 11:10 AM (IST)

    हिमाचल प्रदेशातील नामांकित शाळेत नववीच्या विद्यार्थ्याला मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

    हिमाचल प्रदेशच्या सोलन येथील डीपीएस डगशाई (DPS Dagshai) मधील इयत्ता नववीच्या एका विद्यार्थ्याला कथित मारहाण आणि रॅगिंगचा प्रकार समोर आला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच सीनियर विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, विद्यार्थ्याला हॉस्टेलच्या खोलीतून बळकावून बाहेर काढून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, ही घटना ५ सप्टेंबर रोजी घडली. काही सीनियर विद्यार्थ्यांनी नववीच्या विद्यार्थ्याला त्याच्या हॉस्टेल रूममधून बळचारी बाहेर आणून मारहाण केल्याचा आरोप आहे. ही माहिती समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली, ज्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला.

  • 09 Sep 2026 11:05 AM (IST)

    09 Sep 2026 11:05 AM (IST)

    लाचेची रक्कम घेतली अन् एसीबीने पकडले; दोन तलाठी एसीबीच्या जाळ्यात,तिसरा फरार

    गौण खनिजाची वाहतूक करणारा जप्त हायवा सोडण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करून त्यातील १२ हजार रुपये लाच म्हणून स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन तलाठ्यांसह एका खासगी पंटरविरुद्ध कारवाई केली. पंटरमार्फत लाचेची रक्कम स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या लाचेच्या रकमेत तीन तलाठी वाटेकरी असल्याचे तपासात समोर आल्याने तिसऱ्या तलाठ्याचा शोध सुरू आहे. तलाठी दिनेश दिलावर दाभाडे, तलाठी मणाल शरद नगराळे आणि खासगी पंटर जयेश चौधरी अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

  • 09 Sep 2026 10:51 AM (IST)

    09 Sep 2026 10:51 AM (IST)

    सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

    सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित निवडणुकीची प्रक्रिया आता निर्णायक वळणावर आली आहे. प्रारूप मतदार यादीवर दाखल करण्यात आलेल्या तब्बल ४९ हरकतींचा निपटारा कोल्हापूर विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांनी केला आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे.

  • 09 Sep 2026 10:41 AM (IST)

    09 Sep 2026 10:41 AM (IST)

    AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार

    सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे छायाचित्र एआयच्या माध्यमातून मॉर्फ करून ते साताऱ्यातील एका नृत्य कार्यक्रमाशी जोडल्याचा आरोप झाल्याने मंगळवारी साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले. संबंधित छायाचित्रांचा प्रत्यक्ष कार्यक्रमाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करत राजे समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला. नगराध्यक्ष अमोल मोहिते, भाजपचे गटनेते अविनाश कदम यांच्यासह समर्थकांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेत संबंधित यूट्यूब चॅनेलविरोधात तक्रार दाखल केली.

  • 09 Sep 2026 10:31 AM (IST)

    09 Sep 2026 10:31 AM (IST)

    ओपन स्पेस मध्ये गाळे उभारून भाड्याने दिले? महिंद्रा अँथियाला महापालिकेचा दणका

    मंजूर बांधकाम नकाशाचे उल्लंघन करून पिंपरीतील महिंद्रा अँथिया सहकारी गृहरचना संस्थेच्या आवारात अनधिकृतपणे व्यावसायिक गाळे उभारून ते भाड्याने दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते हरेश भाटिया यांनी महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाने सोसायटीला नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणी बांधकाम विभागाकडून स्थळ पाहणी करून कागदपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पिंपरीतील नेहरूनगर परिसरातील महिंद्रा अँथिया ही गृहनिर्माण संस्था आहे. सोसायटीच्या आवारातील इमारतीच्या सामायिक वापरासाठी असलेल्या जागेत मंजूर नकाशात तरतूद नसताना अंतर्गत बदल करून व्यावसायिक गाळे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. हे गाळे इतर व्यावसायिकांना भाड्याने देण्यात आल्याने सामायिक जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर भाटिया यांनी मंजूर बांधकाम नकाशाच्या प्रती आणि इतर कागदपत्रांसह महापालिकेकडे तक्रार केली. सोसायटीतील सामायिक जागेचा परवानगीशिवाय व्यावसायिक वापर होत असल्यास त्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

  • 09 Sep 2026 10:21 AM (IST)

    09 Sep 2026 10:21 AM (IST)

    गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश

    येत्या सोमवारी श्रीगणेशाचे आगमन होत असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनाची तयारी वेगाने सुरू केली आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच विसर्जन घाटांवर आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुरू असलेल्या कामांचा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून आढावा घेतला. विसर्जन घाटांवरील सर्व कामे रविवार १३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

  • 09 Sep 2026 10:11 AM (IST)

    09 Sep 2026 10:11 AM (IST)

    ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

    श्री आगमनाच्या जल्लोषासाठी सज्ज झालेल्या सातारा शहरातील राजवाडा परिसरात मंगळवारी (दि.8) सायंकाळी अचानक आगीचा भडका उडाल्याने एकच खळबळ उडाली. सह्याद्रीचा राजा मित्र मंडळाच्या श्री आगमन मिरवणुकीसाठी उभारण्यात आलेल्या भव्य ड्रॅगनच्या प्रतिकृतीला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने लगतच्या आणखी एका प्रतिकृतीला कवेत घेतल्याने घटनास्थळी अक्षरशः धावपळ उडाली. या दुर्घटनेत मंडळाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर ठेवलेला जनरेटर जळून खाक झाला. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • 09 Sep 2026 10:01 AM (IST)

    09 Sep 2026 10:01 AM (IST)

    लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट

    बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांची लेक दुआ ८ सप्टेंबर रोजी दोन वर्षांची झाली. लेकीच्या वाढदिवसानिमित्त दीपिका, रणवीर आणि दुआ यांनी खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून, त्यावर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

    या ब्लॅक अँड व्हाइट फोटोंमध्ये दीपिका, रणवीर आणि दुआ यांच्यातील खास बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. दुआ कधी चेहरा लपवताना, तर कधी वडील रणवीरसोबत खेळताना दिसत आहे. तिघांचेही हे गोंडस फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

  • 09 Sep 2026 09:45 AM (IST)

    09 Sep 2026 09:45 AM (IST)

    Pimpri Chinchwad: ओपन स्पेस मध्ये गाळे उभारून भाड्याने दिले

    पिंपरी चिंचवड: मंजूर बांधकाम नकाशाचे उल्लंघन करून पिंपरीतील महिंद्रा अँथिया सहकारी गृहरचना संस्थेच्या आवारात अनधिकृतपणे व्यावसायिक गाळे उभारून ते भाड्याने दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते हरेश भाटिया यांनी महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाने सोसायटीला नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणी बांधकाम विभागाकडून स्थळ पाहणी करून कागदपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पिंपरीतील नेहरूनगर परिसरातील महिंद्रा अँथिया ही गृहनिर्माण संस्था आहे

  • 09 Sep 2026 09:35 AM (IST)

    09 Sep 2026 09:35 AM (IST)

    Malegaon News: मालेगावात प्राध्यापकाचा पायऱ्यांवरून पडून मृत्यू 

    Malegaon News:  मालेगाव येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित म्युनिसिपल शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक सोपान बोरसे यांचा मंगळवारी शाळेच्या जिन्यावरून पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर प्राध्यापक बोरसे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांची भेट घेतली. मयत प्राध्यापक सोपान बोरसे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-Mortem) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि 'इन कॅमेरा' (व्हिडिओ शूटिंगसह) करण्यात यावे, अशी ठाम मागणी शिवसैनिकांनी पोलिसांकडे केली आहे.

  • 09 Sep 2026 09:26 AM (IST)

    09 Sep 2026 09:26 AM (IST)

    Kiran Mane Facebook Post:  बदलत्या काळाची पावलं ओळखता आली पाहिजेत; किरण माने यांची  पोस्ट चर्चेत

    Kiran Mane Facebook Post:   मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक किरण माने आपल्या परखड आणि रोखठोक मतांसाठी ओळखले जातात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या मनोरंजन क्षेत्रात आणि नेटिझन्समध्ये विशेष चर्चेचा विषय ठरली असून, यामुळे मराठी मनोरंजनसृष्टीतील बदलत्या ट्रेंडवर पुन्हा एकदा मंथन सुरू झाले आहे.

  • 09 Sep 2026 09:19 AM (IST)

    09 Sep 2026 09:19 AM (IST)

    Tamil Nadu Politics: तमिळनाडूच्या राजकारणात राजकीय वादळ 

    Tamil Nadu Politics:  तमिळनाडूमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवून सरकार स्थापन करण्यात यशस्वी ठरलेले मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय सध्या राजकीय अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या तमिळगा वेत्ती कळगम (टीव्हीके) पक्षाविरोधात राज्यातील विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगमने (AIADMK) थेट एम. के. स्टॅलिन यांच्या द्रविड मुन्नेत्र कळगम (DMK) पक्षाला सोबत येण्याचे आव्हान दिले आहे. तसेच विजय यांच्या पक्षाविरुद्ध इतर नवीन पक्षही एकत्र येऊ शकतात, असा दावा करण्यात आला आहे.

  • 09 Sep 2026 09:11 AM (IST)

    09 Sep 2026 09:11 AM (IST)

    Latur Maratha Reservation  लातूरमध्ये तरुणाच्या आत्महत्येनंतर संतापाचा उद्रेक 

    Latur Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथील ४२ वर्षीय तरुण सुनील बिरादार यांनी विहिरीत उडी मारून जीवन संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आरक्षणासाठीच हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा करत नातेवाईक आणि संतप्त ग्रामस्थांनी उदगीर-लातूर रस्त्यावर मृतदेह ठेवून तीव्र रास्तारोको आणि चक्काजाम आंदोलन सुरू केले.

Web Title: Maharashtra national to international breaking sports to crime live news in marathi 9 september 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • national news
  • pune news

संबंधित बातम्या

Navarashtra Special: जुनं पुणे, जुना रुबाब! वाड्यांमध्ये जिवंत आहे इतिहास; पाहा वाड्यांचा वारसा
1

Navarashtra Special: जुनं पुणे, जुना रुबाब! वाड्यांमध्ये जिवंत आहे इतिहास; पाहा वाड्यांचा वारसा

Baramati News : बारामतीत खुनाच्या कटाचा पर्दाफाश! मेडदचा सरपंच चार महिन्यांनी पोलिसांच्या जाळ्यात
2

Baramati News : बारामतीत खुनाच्या कटाचा पर्दाफाश! मेडदचा सरपंच चार महिन्यांनी पोलिसांच्या जाळ्यात

Cricket: अजित वाडेकर ॲकॅडमीचा जलवा; ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक‌’मध्ये सलग 2 दणदणीत विजय
3

Cricket: अजित वाडेकर ॲकॅडमीचा जलवा; ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक‌’मध्ये सलग 2 दणदणीत विजय

Student Dies By Self Immolation: दिल्लीत शाळेतच विद्यार्थीनीची पेटवून घेऊन आत्महत्या; ३ पानांच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
4

Student Dies By Self Immolation: दिल्लीत शाळेतच विद्यार्थीनीची पेटवून घेऊन आत्महत्या; ३ पानांच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.